आईपणाचा समतोल…

Written by

 

स्नेहाच्या  चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. आज तिच कुटुंब पूर्णत्वास गेलं होतं. हातात छोटस बाळ आलं होतं.दवाखान्यात भेटणाऱ्याची वर्दळ सुरू होती. भेटवस्तूनी टेबल भरून गेला होता.

छोटी अस्मि आता ताई झाली होती.सकाळी ताई झाली म्हणून किलबिल करणारी, खूप खुश असणारी अस्मि संध्याकाळपर्यंत हिरमुसली होऊन एका ठिकाणी शांतपणे बसली होती. स्नेहाला काही कारण उमजेना. तिने अस्मिला जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ..ती तशीच अबोलपणे बसून राहिली. थोड्यावेळाने स्नेहाची छोटी बहीण सायली बाळाला बघायला आली.

आल्या आल्या आधी तिने अस्मिला जवळ घेऊन सुंदर बाहुली भेट दिली व म्हणाली मोठी ताई झाली ना तू म्हणून तुला खास भेट.अस्मिच्या चेहऱ्यावर हास्य खुलले, मग सायलीने स्नेहाला व बाळालासुद्धा भेटवस्तू दिल्या.आज सकाळपासून सगळ्यांच लक्ष केंद्रित होत ते फक्त बाळावर आणि स्नेहावर. सगळ्या भेटवस्तू ,कौतुक, फोटोज फक्त त्यांच्याबरोबर होत.कितीतरी नातेवाईक येऊन गेले मात्र अस्मिच्या वाट्याला फक्त “आता तू मोठी ताई झालीस,खुश ना.

“एवढंच वाक्य आलं.तिच्या बालमनाचा कुणी विचारच केला नव्हता. सायली येताच तिचे विश्व बदलले होते.स्नेहाच्या वेळेतच हे नजरेस आले.मोठ्या बाळा समक्ष छोट्या बाळच सगळं करण आणि मोठयाच्या मनाचा विचार लक्षात घेणे ही जरा आव्हानात्मक प्रक्रिया आहे हे एव्हाना स्नेहाला कळून चुकले होत. एकच बालक असतानाची परिस्थिती वेगळी आणि दुसऱ्या बाळाचे आगमन परिवारात होताच ती परिस्थिती फार वेगळी होत असते.


  • एका बाळासाठीचे आईपण निभावताना दुसऱ्या बाळाला मी तुझीसुद्धा आई आहे आणि दोघांचीही सारखीच काळजी करते,समतोल राखते हे पटवुन देणे एक परीक्षाच असते.स्नेहाने घरी येताच अगदी बाळाच्या आंघोळीपासून ते बाळासाठी अंगाई गीत म्हणण्यापर्यत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अस्मिला सहभागी करून घ्यायला सुरुवात केली.

अस्मिला सुद्धा मग जबाबदारीची जाणीव होऊ लागली,मोठी ताई होणं किती महत्त्वाचे आहे,सगळ्याच माझ्याकडे पण लक्ष आहे,मलासुद्धा बाळा साठीची कामे सांगतात ही भावना तिच्यामध्ये रुजली आणि हळूहळू स्नेहा अस्मिच मायलेकिच प्रेमाचं नात अजून घट्ट झालं.आधी कुणालाही एक खेळणसुद्धा न देणारी अस्मि आता प्रत्येक गोष्ट वाटून घ्यायला शिकली होती.स्नेहा आता मनापासून आनंदी होती.आपल्याही कुटुंबात होणाऱ्या मोठ्या ताई किंवा दादाची मानसिक तयारी करणे ,त्यांना सगळ्या गोष्टीत सहभागी करून घेणे खूप आवश्यक आहे.यामध्ये परिवाराची साथ असेल तर सगळं काही शक्य आहे कारण जगण्याची ऊर्जा आणि उत्साह बालकांना कुटुंबाकडूनच मिळत असते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत