आई आंनदी तर कुटुंब आंनदी

Written by

 • निरोगी आई आनंदी कुटुंब

  आई, अगं ये आई…काय ग आई तुझ हे…काय करतेस? अग माझी बुक दिसत नाहिये?
  शाळेची वेळ सुद्धा झालीय???
  आई….आई …ओरडतच मनु आईच्या रूम मध्ये आली….हे काय आई तर झोपलेली..या वेळेस तर ती कधीच झोपायची नाहीं…
  आई…उठ ना! बघ किती वाजलेत.
  आईचा काहीच प्रतिसाद नाही.
  मनु घाबरली😞,लागलीच बाबांना आवाज दिला.
  बाबा(शरद)ही घाबरतच आला…
  मनु तर रडायलाच लागलीं.😢
  ———————————
  शरद आणि वसुधा एक सुखी जोडपं, लग्नाच्या तब्बलं दहा वर्षानंतर त्यांच्या संसारवेलीवर ‘मनु’ नावच सुंदर फुल उमलल.
  वसुधा जेमतेम पंचेंच्या ळीशीच्या जवळपास…
  पण हल्ली खूप रोडावत चाललेली, नेहमी थकवा जानवायचा…कधी कधी चक्कर सुद्धा यायचे….
  शरद ऑफिसला, मनु शाळेत…घरी एकटं राहून बोर होण्यापेक्ष्या घरची सगळी काम ती स्वतः च करायची. तिचा आवडता छंद म्हणजे बागकाम, फुलांची तिला भारी हौस.
  हे सगळं ती एकटीच करायची. मनु शाळेतन आली की तिचा अभ्यास…असं एकंदरीत तीच रूटीन…
  एवढ्यात तिची थोडी चिडचिड वाढली होती.शरदच्या हे लक्षातही आलं होतं.त्याने बरेचदा तिला डॉक्टर कडे जाण्यास सुचविले, पण तीच एकच पालूपद… ,”काही नाही झालंय रे मला, कदाचित जास्त exertion मुळे होत असेल असं”,आणि तसही या वयात होतोच रे थोडा त्रास…..होईल मी ठीक, काळजी करू नकोस.
  अस म्हणून टाळायची (आम्हा बायकांची सवयच ती, दुखणं अंगावर काढायची)…पण हल्ली मात्र अस बरेचदा व्हायचं…डोळ्यासमोर अंधारी, चक्कर…पण थोडयावेळाने बर वाटायचं…
  पण वसुधाने या रविवारी मात्र आपण नक्की दवाखान्यात जाऊ अस ठरवलं…
  –————————————
  पण आज मात्र जास्तच झालं.
  मनु आई… आई ओरडतेय पण आईचा काहीच प्रतिसाद नाही….बेशुद्ध पडलेली.
  शरद ने लगेच डॉक्टर ला फोन केला, dr नि चेकअप करून सलाईन, इंजेकशन दिल, थोड्यावेळाने वसुधा शुद्धीवर आली. तिने उठायचा वर
  प्रयत्न केला, पण तिला खूप अशक्तपणा जाणवत होता.
  डॉक्टरने काही रक्ताच्या तपासण्या करायला सांगितलं.
  तीच हिमोग्लोबिन बरच कमी होत.आणि त्याचबरोबर मोनोपॉज मुळे hamonl in ballnce चा त्रास सुरू झाला होता.
  डॉक्टर ने शरद ला बाजूला नेऊन काही suggestions दिले. या वयात असा त्रास बऱ्याच स्त्रियांना होतो, खूप मन जपावं लागत अशावेळेस…(मी सुद्धा या त्रासातून गेलेली आहे) ….आता तर हॉर्मोन्स थेरपी, आणि त्यावरील औषध सुद्धा आहेत. आणि सोबत योगा, मेडिटेशन ने खूप फरक पडतो.
  शरद खूप काळजी पडला,”बरी होईल ना हो माझी वसुधा”
  डॉक्टर-”अरे तिला काहीच नाही झालंय., आता औषधाने होईल ती बरी, खर सांगायचं तर औषधपेक्षा तीला तुझ्या सपोर्ट ची गरज आहे.
  दुसऱ्याच दिवसापासून शरद तिला म्हणाला,” राणीसाहेब आतापर्यंत खूप काम केलीत तुम्ही…
  पण आतां मात्र आपण कामाला मोलकरीण लावूया.
  वसुधा-,”अहो…पण!
  शरद-“पण बिन काही नाही…
  आता तुला माझं ऐकावच लागेल
  अग, आपली मनु आता मोठी होतेय,तिला आणि मला तुझी खूप गरज आहे गं!
  Please ऐक ना माझं!
  मला माहित आहे तुला मोलकरणीच्या हातच काम आवडत नाही, पण आम्हा दोघांसाठी तरी….
  वसुधा हसून म्हणाली,””हो रे बाबा, ऐकेन…जास्तच emotions नको करू मला”😊
  दुसऱ्या दिवसापासून बाई कामाला आली, फक्त स्वयंपाक मात्र वसुधा करायची.
  आता शरद रोज तिला आपल्यासोबत morning walk ला न्यायचा, ध्यान आणि योग classes लावून दिले.आता वसुधा खूप स्वस्थ आहेच…त्याचबरोबर निरोगी सुद्धा.
  योग्य वेळी योग्य सल्ला घेतल्यामुळे शरद, वसुधा आणि मनु आज खूप आंनदी आहेत.
  आज तीच कुटुंब तिच्या बगीच्यातल्या फुलांसारखं हसर आहे.
  खरंच आई निरोगी तर पूर्ण कुटुंब निरोगी…😊

  (बरेचदा पुष्कळश्या बायांच आपण बघतो, त्या बरच दुखणं अंगावर काढतात, का?तर मला काही आजार निघाला तर ….माझ्या कुटुंबाचं कस होईल? दवाखान्यात जाण्याचं टाळतात….पण मैत्रिणींनो वेळीच उपाय केलेत तर गंभीर आजारांची शक्यता कमीच .
  जेव्हा तुम्हाला कळतंय की तुमच्या शिवाय तुमचं कुटुंब पूर्ण नाही….
  मग घ्या की स्वतःची काळजी😄😄

  ©️लता राठी✍️

  आवडल्यास नक्कीच like आणि comments करा. Share करा पण नावासकट हं 🙏.

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा