आई.. आमचा संसार आहे…. कळत आम्हाला 😏😏

Written by

आई कळत ग आम्हाला..
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

©जयश्री कन्हेर -सातपुते

सविता.. हो मीच ती.. जिने संपूर्ण आयुष्य मुलं, नवरा, घर, संसार यांचं करण्यात आणि त्याच्या हिताचा विचार करण्यातच घालवले. आणि आता मला ऐकावं लागतंय की “आई कळत ग आम्हाला, तू नको सांगू ”

लग्न झाल्यापासून घरची सर्व जबाबदारी सांभाळली मी . सासूच्या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या, सर्व सूचना समजून घेतल्या आणि स्वतःला झोकून दिलं संसारात. त्यात इतकी गुंतल्यागेली कि स्वतःसाठी मला वेळच मिळाला नाही. स्वतःचं मन मारून, तर कधी इच्छा असूनही मुलांसाठी त्या इच्छा पूर्ण न करता मनातच दाबून ठेवल्या.
नवऱ्याची फिरती नोकरीं आणि त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची होणारी परवड… या सगळ्यांना कंटाळून मी  एका जागी कुठेतरी सेटल होण्याचं ठरवलं. शहराचं ठिकाण बघून जिथे मुलांच्या शिक्षणात अडचण येणार नाही आणि यांना देखील येण्या जाण्याला सोईस्कर होईल असं शहर निवडून मी मुलांना घेऊन राहत होते. हे विकेंडला यायचे.
घराची मुलांची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मग त्यांच्या शाळेविषयी असो वा  कपड्यांविषयी. शाळेतील मिटिंग, कोणतेही कार्यक्रम असो मी एकटीने अटेंड केले. मुलांच्या आवडी निवडी जपून त्याच्या पसंतीचे कपडे मीच आणायची.
त्या सगळ्या कामांची इतकी सवय झाली की आताही, म्हणजे मुलं मोठी झाली जबाबदार झाली तरी देखील त्यांना प्रत्येक गोष्टीत बोलण्याची सवय झाली.
जस ” नवीन कपडे आणले त्यांनी तर कितीचे आणले, कापडं असा आहे, आपल्या नेहमीच्या दुकानातून का नाही घेतले.” असं विचारते.. तर मुलांना वाटत “आई सारखी टोकते आम्हाला.आम्हाला काय कळत नाही का? कस घ्यायचं ते ”
परंतु मुलं हे विसरतात की आपण लहान होतो तेंव्हा “हिच आई आपल्यासाठी सगळी खरेदी करायची व आपल्याला ते आवडायच.”
माझी अपेक्षा इतकीच असते की त्या विषयी माझ्याशी बोलाव, माझा अनुभव ऐकावा पण मुलांना वाटत “आई मधे मधे करते.”
परवाच उदाहरण घ्या…शैलजा.. माझी सून मैत्रिणीशी गप्पा करत होती मोबाईल वर… दूध तापवलं तिनी पण गॅस बंद न करताच रूम मधे गेली तिच्या… ते पातेले जळून काळकुट्ट झालं.. आणि मी त्यांना नेहमी म्हणतं असते “दूध गरम करताना लक्ष ठेवा, गॅस बंद केला की नाही ग शैलजा? ”

तर ती म्हणते “तितकं कळत बर मला, गॅस वाया जातो म्हणून.. शेवटी माझा नवरा कमावतो तर तितकी काळजी घ्यावी लागते आणि कळत आम्हाला.”
रात्री झोपताना सिलेंडर बंद केलं की नाही, दरवाजे निट लावले की नाही, गेट लॉक केलं की नाही हे बघायची सवय झाली आहेत, इतक्या वर्षात मीच केलं न हे सगळं त्यामुळे अंगवळणी पडलं आहे. त्या सवयी नुसार मी सुना आल्यावर देखील हे सगळं झोपण्याआधी विचारते. तर मुलंच सुनेच्या आधी म्हणतात “अग आई कळत ते माझ्या बायकोला. त्यांचही घर आहे. तू उगाच मधे मधे करतेस. लक्ष काढ यातून आता. आमचं आम्हाला करू दे “
मी यांना टोकत नाही बर.. मला सवय झाली हो इतक्या वर्षाची त्यामुळे आपसूकच तोंडातून निघत. यात माझी हिच चूक आहे…की मी आता पर्यंत मुलं, आणि घर यांच्या आनंदातच आनंद मनाला.
आता जेव्हा मुलांची लग्न झाली, सुना आल्या घरी, मुली सासरी गेल्या, जावई आले, नातवंड झालीत, तरीसुद्धा मला त्यातून मुक्त होऊन. स्वतःचा असा वेगळा आनंद बघता येत नाही. त्यात माझ्या मातृत्वाचा दोष आहे.सारखा घराचा व मुलांचा विचार येतो, ममतेपायी.
सगळेजण आपापल्या सुखामध्ये आणि संसारांमध्ये रमलेले आहे. हे कळत मला. माझ्या बोलण्याची त्यांना अडचण होते. “मी असले काय…आणि नसले काय” त्याचा काही फारसा फरक पडत नाही मुलांना.
हे कटू सत्य माहिती माहित आहे मला….तरी देखील माझं मन त्यांच्या या गोतावळ्यातून निघत नाही. तिथेच घुटमळत आहे. अशा वेळी खरंच गरज आहे या सगळ्यातून अलिप्त होण्याची. संसारातून मन काढून, स्वतःसाठी जगण्याची. पण “माझ्या माघारी घर नीट चालेल की नाही” ही अनाठाई चिंता मला सतावत असते. अशावेळी गरज आहेमला यातून मुक्त होण्याची….सगळं काही मुलांवर -सुनांवर सोपवून…आपलं राहिलेलं आयुष्य जगण्याची.. सगळं कळत मला पण वळत नाही मला. सारखी चिंता वाटत असते सगळ्यांची. आता ते कस सांभाळतील याची.
कदाचित माझी अनाठायी चिंता त्यात दडलेल प्रेम, काळजी कळत नाही मुलांना म्हणून, मुलं ही असं म्हणतं आहे.. “आई….आम्ही मोठे झालो आहोत कळत आम्हाला.. काय करायचं व काय नाही ते. नको तिथे तुझे सल्ले नको देत जाऊस. “

सुना म्हणतात.. “आई जरा विश्रांती घ्या संसारातून, आमचाही संसार आहे.आम्हाला आमच्या मनाने करू द्या ”
असं ऐकल्यावर वाटत खरंच आपण चुकतोय का कुठे?मुलांच्या काळजीपोटी करतो हे सगळं आणि त्यांना वाटत मी त्यांच्या संसारात लुडबुड करतेय..
असच असते का आईच नशीब.
भावनिक गुंतागुंत….असते तिची मुलांशी, घरात त्यामुळे हे नकळत घडत जात… पण असो… या नंतर मुलांना असं म्हणण्याची वेळ येऊ देणार नाही मी… जितकं जमेल तितकं लक्ष संसारातून काढण्याचा प्रयत्न नक्की करेल.
ही कहाणी आहेत प्रत्येक सासूची जी फक्त संसारात गुंतली असते आणि सून आल्यावरही ती त्यातच गुंतून असते. कुठेतरी या सगळ्यातून मन काढून, जबाबदारी समोरच्या पिढीवर सोपवण्याची गरज आहे…
काय पटत का माझं?? पटत असेल तर आणि नसेल पटत तरीदेखील यावरील तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील मला, आवडलं असेल तर like करायला विसरू नका. आणि शेअर करायचा असेल तर नावासहित करा. ©जयश्री कन्हेरे -सातपुते. फोटो साभार गुगल. माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा. 🙏🙏🙏🙏

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा