आई ती आईच असते नोकरी करणारी असो नसो,..

Written by

आई ती आईच असते नोकरी करणारी असो किंवा नसो,….?
©स्वप्ना मुळे(मायी)

संध्याकाळ पासून चिऊचं अंग गरम लागत होतं घसा पण दुखत होता,…. हिनं चटकन तिला औषध आणि आलं मध चाटवलं, आणि मनात म्हंटली लवकर बरी हो ग पिल्लु उद्या काही दुखणं काढू नकोस,…कारण नेमक्याच भावाच्या लग्नाला आठ दिवस सुट्ट्या उपभोगून ती कालच ऑफिसमध्ये जॉईन झाली होती,..आणि उद्याचा वर्कलोड जास्त होता त्यामुळे सुट्टी मिळणार नव्हती,…
गरम खिचडी तिनं चिऊला खाऊ घातली मघापेक्षा आता जरा जास्तच मलूल दिसत होती चिऊ,..आई उद्या शाळेत नाही जात ग मी आणि तू पण सुट्टी घे,..हिच्या तर पोटातच गोळा आला,..हिने उगाच समजवल तिला अग बरी होशील रात्रीतून आणि नाहीच वाटलं बर तर बाबा घेईल सुट्टी माझ्या चिमणी साठी,..
त्यावर चिऊ रडवेली होऊन म्हणाली,”आई मागच्यावेळेस मला ताप आला होता तू ऑफिसमधून अली नव्हती घरी तेंव्हा मला तुझी खूप आठवण आली ग, मग मी तुझी साडी घेऊन बसले होते,?”
आईला गहिवरून आलं,…आयुष्यात नोकरी जेंव्हा करिअर,पैसा, स्वतंत्र्य अश्या पारड्यात टाकली जाते तेंव्हा नेहमी ती वर असते पण जेंव्हा मुलांचं आजारपण या सोबत नोकरी तोलली तेंव्हा ती शून्य ठरते,…त्या क्षणी आपण मुलांना हवे असतो आणि नेमकं तेंव्हाच आपल्याला सुट्टी मिळणं अवघड असतं…तिचे या विचाराने डोळे भरून आले तेवढ्यात चिऊचा बाबा आला,… काय झालं माझ्या चिमणीला???चिमणी लगे गळ्यात पडली बाबाच्या,…तापू आलाय उद्या शाळेत जाणार नाही मी आणि आईला पण नाही जाऊ देणार,…ही काही बोलायच्या आत ह्यानी डोळ्यांनीच तिला खुणावले,….ती आत गेली,..बाबा चिऊला समजवायला लागला आग आईला जरी जावं लागलं तरी बाबा आहे ना तुझ्यासाठी घरी,….नाही मला आईच पाहिजे,चिऊ हट्टाला पेटली होती..नंतर रडून झोपी पण गेली,..तिच्या सुकलेल्या अश्रूंना हात लावत हिलाच रडू आलं,…त्याने समजावलं तू कळजी करू नकोस, तू जा सकाळी ती उठायच्या आत मी बघतो तिला….
सकाळी तर चिऊचं अंग खुप गरम होतं,.. तिचा पाय ओढवेना पण ती मजबूर होती,…ऑफिसमध्ये गेल्यावर 4 तासांनी फोन वाजल्या वरच तिला चिऊचा आठवण झाली इतकी कामात अडकली होती ती,..त्याचाच फोन होता,..”अग चिऊचा ताप खुप वाढला होता त्यामुळे तिला दवाखान्यात नेऊन आणलं पण मला खुप अर्जंट काम आलं त्यामुळे तिला तुझ्या आईकडे सोडून आलोय,..तू तिकडेच जा…
हिने लगेच आईकडे फोन लावला,..”आई चिऊ बरी आहे ना ग,..?ताप?”
“आई म्हणाली ताप उतरला आहे पण काय ग तुम्ही लेकरांपेक्षा नोकऱ्या महत्वाच्या बाई तुमच्या,..आईपण कस नाही ग तुमच्यात तुला ताप आला तर उश्या पायथ्याशी बसायचे मी..”
“आई तुला नाही कळणार आमची कसरत..”असं म्हणून तिने फोन ठेवला…
सहाला ऑफीस सोडलं तिने पटकन घर गाठलं आईचं,..
“चिऊ दारातून हाक मारली, आई म्हणाली हळू झोपलीये ती,…
तिने लगेच विचारलं काय खाल्लं चिऊने दिवस भरात,..आई म्हणाली नाही खाल्लं काही भूकच नाही म्हणाली…
हिने पटकन स्वयंपाक घरात जाऊन पातळ उपमा बनवला आणि अतिशय प्रेमाने चिऊला उठवून खाऊ घातलं,…चिऊला मांडीवरच घेऊन बसली,..आई म्हणाली तू खाऊन घे काही तर म्हणाली नको ग मला तिला माझी ऊब देऊ दे ती आता बरी होईल आणि तिने चिऊला आणखी घट्ट धरलं,…चिऊने पण तिला घट्ट मिठी मारली आई उद्या आहेस ना घरीच,…हो हो उद्यातर आपला हक्काचा संडे आणि फन डे उद्या सगळा दिवस मी तुझ्याच जवळ,…ते पाहून तिच्याच आईच्या डोळ्यात पाणी आलं म्हणाली,”दुपारी तुला काही बोलले ग ,पण खरं आई ती आईच असते….”
© स्वप्ना मुळे(मायी)..औरंगाबाद..

Article Tags:
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा