आई , तू खरचं चुकलीस…

Written by

प्रिय ,

 आई…?

लोकांच्या गर्दीत मी स्वतः च अस्तित्व हरवून बसले होते..पण जेव्हा जाग आली तेव्हा बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..किती सुंदर होत माझं आयुष्य , असं मी म्हणणार नाही ! कारण दादा आणि माझ्यात किती फरक होता?? ह्याची तू प्रत्येक वेळी जाणीव करून दिलीस..त्यात तुझा दोष नव्हता..त्याला पिढ्यानपिढ्या चालत आलेला ” भेदभाव ” कारणीभूत होता..?

आई, तुला आठवतं का ग??माझ्या वाढदिवसाला मी तुला डायरी मागितली होती?? तू म्हणालीस , महाग होईल..आपल्याकडे वहीचे कोरे पेजेस आहेत ..त्याची डायरी कर..तेव्हा मी नाक मुरडल व हो म्हणाले…? 

त्या नंतर दादाचा वाढदिवस आला त्याने तुला मोबाईल मागितला..आणि तू त्याला लागलीच घेऊन दिलास..आई, खरंच का ग ?? डायरी मोबाईल पेक्षा महाग होती?? आईच प्रेम मोजता येत नाही …ते समुद्राएवढं अथांग असतं..

पण त्याला सुद्धा कुठेतरी किनारा असतो..तुझ्या मनात सुद्धा माझ्यासाठी भरपूर प्रेम असेल.. पण मला कधी जाणवलंच नाही…? कारणं मायेच्या तराजूत ⚖️ जेव्हाही  दादा आणि माझी तुलना करायचे तेव्हा दादाकडील मायेची , प्रेमाची बाजू जास्त भरायची…?

मी लहान असताना तू आपल्याकडे एक गुलाबाचे रोपटे आणले होते..ते रोपटं तू अंगणात लावून म्हणाली होतीस , ह्याला लहान मुलासारख जपायच..तू त्या रोपट्याला जीवापाड जापायचीस म्हणून मी त्यालाच मनातलं सगळ सांगायचे..

मी जेव्हा त्याला स्पर्श करायचे तेव्हा वाटायचं, जणू तू मला कुशीत घेतलंस व मायेने आणि प्रेमाने  माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहेस..काही महिन्यातच ते रोपट वाळायला लागलं म्हणून ते तू उपटून टाकलस , अगदी मुळासकट ! ते फक्त रोपटं नव्हत ग आई..ते माझ बालपण होत..?

एकदा मला स्वप्न पडल होत..मी लेखिका झाले आणि छानशी कादंबरी लिहिली.. त्याचं कादंबरी साठी मला पुरस्कार सुध्दा मिळाला..हे जरी स्वप्न असले तरी मला ते अस्तित्वात उतरवायचा होत..त्यावर तू म्हणालीस, स्वप्न पाहण्याचा अधिकार मुलींना नसतो..?

दादासाठी मात्र दरवाजे उघडे करून ठेवले होतेस स्वातंत्र्याचे..तुला आठवत नसेल कदाचित, पण एकदा आज्जीला बरं नव्हत म्हणून तू दादाला औषध आणायला लावलीस , त्यावर तो म्हणाला ‘ नेहमीच बर नसत तिला अग ! एकदाचं वृद्धाश्रमामध्ये  पोहचवून  का देत नाहीस???

त्यावर तू मात्र काहीच बोलली नाहीस..तू जर त्याच्यावर आधीच संस्कार केले असतेस तर दादा असं कधीच बोलला नसता..बाबांना लहानाचं मोठं केलं आज्जीने ! ज्यांच्यामुळे तू ह्या घरात सून म्हणून आलीस..कशावरून ग , पुढे चालून दादा तुला घराबाहेर काढणार नाही?? कारण आपण जस वागतो ना?? नकळत तेच संस्कार मुलांवर होत असतात..?

मला असं म्हणायचं नाहीये की तू आईची भूमिका नीट निभावू शकली नाहीस ,  मला फक्त  एवढच सांगायचं आहे की आपल्या वागण्याची पुनरावृत्ती कायम होत असते..मग  ती मुलांच्या मार्फत का होईना???

तुला कळवळून सांगावस वाटतं, मी माझ्या मुलांमधे कधीच भेदभाव केला नाही..मला दोघेही सारखेच.. शेवटी मुलगा काय? नी मुलगी काय?? त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले तर कुणावरही वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही ! आणि सर्वात महत्वाचंआपली चांगली वागणूक आपल्याकडे परत येईल..☺️

माझ्या आणि दादा मध्ये जो तू भेदभाव केला आहेस ना?? त्यासाठी आई ,तू खरचं  चुकलीस !

असो,मी एवढं लिहून माझं पत्र संपवते..पण शेवटी एक सांगावस वाटतं , मी तुझ्या प्रेमासाठी कायम आसुसलीये ग आई …मला एकदा तुझ्या कुशीत घेऊन मायेने कुरवाळशील का??? 

फक्त तुझीच,

मुलगी …

# हे पत्र काल्पनिक आहे.. ह्याचा ,माझ्या किव्वा तुमच्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही..संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.. 

?योगिता विजय ?


Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत