आई तू खुश असलीस की घर आनंदी असत..

Written by

आई तू खुश असलीस की घर आनंदी असत..

सेजल:- ..आई किती चिडचिड करतेयस ग आजकाल. काय झालं जरा चहा तर सांडला.. त्या साठी घर डोक्यावर घेतेस.

आजकाल काय झालं तुला.. सारखी रागवतेस आणि कधीकधीतर हात देखील उचलतेस.

त्या दिवशी ग्लास चुकून पडला व फुटला तर तू मला किती रागावलीस.

“काही कळत नाही, पैशाची किंमत नाही तुला, लक्ष कुठे असत तुझं ”

इतकं काय ग त्यात. काही पहिल्यांदा तर नाहीतर फुटला ग्लास माझ्या हातून.

आई….. गेली काही महिने बघतेय मी तू छोट्याश्या गोष्टीवर खुप रियाक्ट होतेस. आधी किती छान समजून सांगायचीस. आम्हाला.

परवा छोटीच्या हातून बॉर्न विटा सांडला किती किती बोललीस तिला.. आणि दोन धपाटे देखील दिलेस पाठीत.. आधी तर तू असं नाही करायचीस “सांडलं तर सांडू दे.. नीट बघत जा असं म्हसणयचीस ” आणि आता??? सारखी ओरडतेस

“दिसलं नाही का तुला, मोठी होतं आहेस, लक्ष कुठे असत, केलंस न नुकसान ” असं बोलतेस जस काही खुप मोठा गुन्हा केला.

का ग आई… असं का?  तुझ्या या रागवण्यामुळे खुप भीती वाटते ग. आधी कस वातावरण असायचं आपल्या घरी. सगळं हसत खेळत आणि आता. तुझ्या सारखं चिडचिड करण्यामुळे तुझ्याशी बोलण्याची हिम्मत होतं नाही.

आई तू खुश असलीस की आम्ही देखील खुश असतो ग. तू अधिसारखी हो न.. आनंदी.

लेकीच्या या बोलण्याने अन्विता विचार करू लागली. खरंच बदललो आपण. छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो लवकरच आपल्याला. असं का होत आहे आपल्या सोबत. या विचारा विचारातच अन्विताने  सर्व कामे आटोपली.

रात्रीच्या जेवणाला चौघेही सोबत बसलेली होती. पण आधी सारखं मनमोकळेपणाने कुणीच बोलत नव्हते.

छोटी तर आईवर जाम रागावली होती. आणि सेजल तिने तर आज आईला बरच काही ऐकवलं होतं. त्यामुळे दोघींनीही गपगुमान जेवण आटोपले आणि झोपायला गेल्या.

सुयश म्हणजेच सेजल चे बाबा. आज अन्विता ला या विषयी बोलायचं म्हणून, मुली झोपण्याची वाट बघत होते. मुलींसमोर नको बोलायला आपण हिला काही..आणखी रागवायची नाहीतर.

मुली झोपल्या आणि अन्विता रूममध्ये आली. सुयश ने लगेच विषयाला हात घातला.

“अन्विता तुला नाही का वाटत तुझ्या मध्ये खरच बदल झालेला आहे. अगदी शुल्लक गोष्टीवरून तू सगळ्यांवरच रागवत असतेस. आधी तर तु सगळं काही हसत-खेळत निभावून न्यायचीस, आता अचानक असं काय झालं? मला तुझ्यातला हा बदल बऱ्याच दिवसापासून नाही ग महिन्यापासून दिसत आहे. पण मला वाटलं की जास्तीच्या कामामुळे तू अशी करत असशील.

आज मात्र जेव्हा सेजलने तुला या विषयी विचारलं, त्यामुळे मी देखील हिंमत करून तुझ्याशी बोलण्याचा विचार केला.

अन्विता तुला आठवतं का  तुझी आवडती साडी जेव्हा सेजलच्या हाताने खराब झाली होती, सेजल इतकी घाबरली होती आई आता आपल्याला काय म्हणेल या विचाराने धास्तावली होती. त्यावर तू काय म्हणालीस आठवतं का? “होउ दे ग खराब मी तुझ्या बाबा कडून दोन साड्या घेईल. त्याही या साडी पेक्षा छान आणि महागड्या बर का”

तुझ्या अशा बोलण्या मुळे घरातील वातावरण देखील हलक फुलक होऊन जायचं.  मुली सर्व गोष्टी न घाबरता तुला सांगायच्या. आता मात्र तुझी सारखी चिडचिड आणि रागावणं सुरू असतं.त्यामुळे मुली सुद्धा गोष्टी तुझ्याशी शेअर करत नाही. त्याच्या मनात भीती असते “आपण सांगितलं तर आई रागवेल का? “याची.  काय झालं तरी काय आहे तुला? कामाचं टेन्शन येते का?

मगाची गोष्ट घे, छोटीला किती रागवलीस तू आणि दोन धपाटे देखील दिलेस तिच्या पाठीवर. ती बिचारी रागारागात तशीच जाऊन झोपली, न जेवता. माझं लेकरू जेवलं नाही म्हणून तू तिच्यासाठी पास्ता करून तिला प्रेमाने उठवून खाऊ घातलंस.  मग इतकं प्रेम करतेस तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी का बरं रागवतेस मुलींना?

तुझ्या मध्ये बदल होत आहे. गेली सात-आठ महिने घरातील वातावरण बदलून गेलेले आहे. आधी सारख खुशीचे वातावरण राहिलेलं नाही. आनंदी आपल्या घराला कुणाची नजर लागली का ग अनु.

आणखी एक उदाहरण देतो तूला,  त्या दिवशी माझ्या शर्टला इंक चा डाग लागला , किती रागवलीस तू.

“कसं कळत नाही तुम्हाला… नेहमी असे कपडे खराब करून आणता,  लहान आहात का?.”जे तुझं बोलण सुरु झालं ते बंद व्हायला काही तयार नाही.

अगं वॉशिंग मशीन आहे आपल्याकडे तरीसुद्धा इतकं बोललीस तू तेही सतत अर्धा तास..  इतका काय रागवायचं ग त्यात.

आणि या आधी का माझ्या शर्टला इंक चे डाग लागले नव्हते  का?

तेव्हा काय म्हणायचीस तु आठवतं का?

“अरे वा आज साहेबांनी जास्त काम केलं वाटतं ऑफिसमध्ये. त्याचं प्रुफ म्हणून की काय शर्ट ला इंक चा  डाग”

आणि आता मात्र सगळे उलट झालय.  चूक असो वा नसो तू त्यामध्ये चुका शोधतेस. आणि विनाकारण रागवतेस. कधी कधी वाटतं तू मुद्दामून छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत आहेस, तुला आमचा राग येतोय का? काय झालंय तुला?

मला देखील कळत नाही हो मला नेमकं काय झालं ते? कामाचा व्याप वगैरे नाही ते तर नेहमीचेच आहे. आणि मला ते आवडतात देखील करायला पण तरीही अचानक काय होऊन जातं माहित नाही. कोणत्याही गोष्टीचा राग येतो,  मन बेचैन होतं आणि मग तो राग सगळा  मुलींवर व तुमच्यावर निघतो.

अन्विता तू खुश असलीस की घर देखील खुश असतं बघ.

तू हसलीस की घर देखील हसतं …

तू रडलीस की घर हिरमुसतं…

 

तू म्हणजे घराचा श्वास,

तू म्हणजे आमचा विश्वास…

 

तुझ्या असण्याने घराला घरपण आहे…

तुझ्या नसण्याने वाड्याला ही पोरकेपण आहे..

सांग काय कराव तुझ्यासाठी…

तुझं निखळ हास्य परत आणण्यासाठी…

सुयश ने जरा आपल्या शैलीत अन्विताला.. विचारलं..

माहित नाही हो मला काय झालं पण मलाही जाणवतं की “काहीतरी बदल होत आहे आपल्यात ” असं नको व्हायला पण तरीही माझ्या कडून  तसं होत आहे काय करू मी?

अनु एक बोलू तुला वाईट नाही वाटणार न.

बोला हो माझ्या भल्यासाठीच बोलणार आहात वाईट काय वाटायचं त्यात.

तुझा एकदा रुटीन चेकअप करून घेऊया का? हार्मोनल इनबॅलन्स मुळे अशी चिडचिड होत असते, असे मी ऐकले आहे त्यामुळे एकदा चेक केलेल बर.

मला माहित आहे ग तुला काहीही झालेलं नाही आहे पण वयानुसार ही चिडचिड होणं शक्य आहे. तरीदेखील आपल्या घरासाठी, आपल्या घरातल्या आनंदासाठी, कारण तू आनंदी असणं खूप गरजेचं आहे. तू आनंदी असलीस की घर आनंदी असत. तू आनंदी तेव्हाच राहशील जेंव्हा तू हेल्दी राहशील

अहो कळतय मला माझ्या चिडचिडेपणा मुळे मुलीसुद्धा धास्तावलेल्या  आहेत. मलाही वाटतं की आधीसारखं  हसतखेळत घर असाव. तुम्ही म्हणताय तर जाऊया आपण एकदा डॉक्टरांकडे.

दोघेही दुसऱ्या दिवशी त्यांच्या फॅमिली डॉक्टर कडे गेले, चेकअप झाल्यानंतर. जेव्हा रिपोर्ट आले त्यात थायरॉईडची Tsh  लेव्हल खूप वाढलेली होती, अन्विताचं  रागवणं, चिडचिड करणं हे सर्व त्या थॉयराइड मुळेच होत होतं.

डॉक्टरांनी सांगितलं “यात घाबरण्यासारखे काहीही नाही फक्त थोडासा व्यायाम, योग्य तो आहार आणि नियमित औषध यामुळे तुमच्या थायरॉईडची लेव्हल कंट्रोलमध्ये येऊ शकते. तुमची होणारी चिडचिड, राग हे सर्व देखील कमी होईल हळूहळू.

मनशांतीसाठी थोडासा प्राणायाम सकाळी फिरायला जाणे आणि मेडिटेशन यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल,

कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही कारण टेन्शनमुळे थायरॉईडची लेव्हल वाढते आणि  थायरॉईडची लेवल वाढली की टेन्शन वाढते. ”

डॉक्टरकडून आल्यावर अन्विताने, डॉक्टर च्या सल्ल्याने वागायचं ठरवलं..

त्यानंतर.. आज सहा महिन्यांनी.. त्यांच्या  घरातील वातावरण बदलून गेले. मुली आता धास्तावलेल्या राहत नाही. , अधिसारखं तिच्याशी सर्व गोष्टी शेअर करतात.

आधी जस खुशीचं वातावरण आणि आनंदी घर राहायचं तस आता सुद्धा आनंदी आणि खुशीच वातावरण  त्याच्या घरी आहे.

खरंच स्त्रीची साधीशी चिडचिड देखील कोणत्यातरी आरोग्याच्या समस्या अशी निगडित असू शकते.

त्यामुळे अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.

स्त्री घराचा पाया आहे. ती आनंदी असली तर अख्खं घर आनंदी असते.

आणि ती जर दुःखी असली तर त्याची झळ घरालाही लागते. आणि त्याची जास्त झळ पोहोचते ती मुलांना. एक आई आपला राग फक्त मुलांवर काढू शकते.

म्हणतात न आई खुश तर घर आनंदी..

समाप्त… ©®जयश्री कन्हेरे -सातपुते

वाचकांनो लेख आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जास्तच आवडला तर शेअर करा पण माझ्या नावा सहीत मला फॉलो नक्की करा.  ©®जयश्री कन्हेरे- सातपुते. धन्यवाद? फोटो साभार गुगल.

Article Categories:
नारीवादी

Comments

  • थायराइड मुळे असे बदल होत असतात चीड चीड वाढते. काम करावंसं नाही वाटत आणि शुलक कारणावरून पण खुप राग येतो. या मुळे खरंच घरातील वातावरण बिघडते. आरोग्याकडे खरंच लक्ष दिले पाहिजे. छान लेख

    त्रिवेणी 12th ऑक्टोबर 2019 6:22 am उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत