आई- पडद्या मागची कलाकार….

Written by

खरंच आपले आयुष्य म्हणजे एक पिक्चर च असतो नाही का???आणि डायरेक्टर च्या भुमिकेत असतो तो वरचा…..

आणि आपण या जीवनाच्या रंगमंचावर… काम करत असतो…या मध्ये आपले शिक्षक, मित्र मैत्रिणी, घरातले, आजू बाजूचे सर्व आपल्या सोबत काम करत असतात सहाय्यक म्हणून….आपण पडतो, हरतो परत उभे राहतो….पण या सगळ्यात आपल्या पाठीशी उभी असते ती आपली आई….ती कधीच स्वतःहून स्वतःला कसले क्रेडिट घेत नाही….अगदी निस्वार्थ पणे आपली भूमिका पार पाडते…

कधीच म्हणत नाही हे माझ्या मुळे झाले, मी होते म्हणून…तुझे कल्याण झाले….

ती सर्व करत असते…न बोलता….अगदी लहानपणा पासून ती तुम्हाला घडवत असते….

बाळ जन्माला येते आणि ती आई होते…तिला पण खूप टेन्शन असते सर्व नीट होईल का??आपण हि जबाबदारी नीट पार पाडू ना?? सगळे गोळा होतात मुलगा होईल कि मुलगी??पण ती म्हणते कॊणी असो चालेल, फक्त माझे बाळ छान आहे ना…. बाळा बरोबर ती पण घडत असते,हळू हळू तिला बाळाची भाषा कळू लागतें..आणी एक नाजूक नाते बनत जाते आई आणि मुलाचे…. बाळाच्या बाळ लीला बघत स्वतः ला विसरून जाते, बाळा प्रमाणे स्वतःची सर्व कामे अड्जस्ट करते, तीचा पूर्ण दिवस बाळा भाेवती फिरत असतो…

हळू हळू बाळ मोठे होत जाते सर्वाना हसवत असते, खेळत असते आजी म्हणते अगदी त्याच्या बाबा वर गेलाय हो…बाळ मोठे होते छान काही तरी बोलून दाखवते…करून दाखवते..बाबा म्हणतात शेवटी मुलगा/मुलगी कोणाचा आहे???पण आई नुसती हसते, डोळ्यात पाणी आणून बघते काजल लावते आणि छान पापी घेते…कारण तिला माहीती असते कोणीच म्हणणार नाही कि तिच्या वर गेलाय बाळ म्हणून…

चांगले झाले किंवा…कौतुक झाले की सर्व पुढे येतात माझ्या वर गेलाय माझा गुण घेतलाय हो.. पण हे बोलताना कॊणी विचार करत नाही कि त्याचे वय काय त्याला कसे कळेल तुमचा चांगला गुण कोणता आणि वाईट कोणता???त्याला हे सर्व आई शिकवत असते….ती घडवत असते…आणि ती कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही….

वेळ प्रसंगी आई कठोर होते, तुम्हाला शिक्षा करते…पण जेव्हा साधे लागतें,खरचटते,आजारी पडलात तर तेव्हा तुमच्या पेक्षा जास्त आईचं रडते…मुले मोठी झाली की रडण्यावरून  आईची टिंगल उडवतात पण  त्यातून तीचं प्रेम वाहते…काळजी  दिसते.. पण  मुले पण बाहेरून आल्यावर  त्यांना एकच प्रश्न असतो  आई कुठे आहे???

दुसरे मूल झाल्यावर….सुद्धा पहिल्या मुलाला जेवढे वाट्त असते आई दुरावणार तर नाही ना?? तेवढेच आईला जास्त काळजी असते की माझ्या बाळा च्या मनावर काय परिणाम होईल?? तो कसे सहन करेल आई शेअर झालेली….खूप प्रयत्न करते ती तें ९ महिने आणि तयार करते आपल्या १ ल्या बाळाला….आणि कोणीतरी महाभाग येऊन बोलतात आई आता बाळा ची तूला आई बघणार नाही,घेणार नाही…झालं तीच्या ९ महिन्याचंा मेहनतीवर ९ सेकंदा मध्ये पाणी फिरवतात….परत समजूत घाला…परत सगळे…आणि एवढे करून तिलाच बोल लावणारे असतातच…

मोठेपणी सुद्धा मूल प्रगती करत असते….प्रगती झाल्यावर क्रेडिट घायला सर्व पुढे येतात पण आई मात्र डोळे भरून कौतुक पाहते आणि लांब उभी राहून आशीर्वाद देत असते…

आपण जसे मोठे होतो तसे आपल्या आयुष्यात असलेले आईचे स्थान हे U लेटर प्रमाणे होत असते….अस कॊणी तरी म्हटलं आहे आणि तें जेव्हा आपण आईच्या जागी येतो तेव्हाच समजत असते….

आपण जीवनात खूप पुढे जातो, कौतुक झाल्यावर सर्व नाती सांगतात माझा भाचा, माझा नातू, माझा भाऊ,माझा पुतण्या पण आई नेहमीच सांगतें त्याची मी आई….कारण तीचं तर तिची ओळख असते…सगळी नाती एकीकडे आणि आईचं नातं वेगळंच असत…..

म्हणूनच मी म्हणेन आई ही पडद्या मागची कलाकार असते…ती कधीच पुढे येत नाही…ती तुम्हाला न बोलता घडवत असते…तिच्या वागण्यातून, संस्कारामधून….

शुद्ध लेखनाच्या चुकांसाठी माफी

अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका….

लाइक आणि कंमेंट करत रहा….

Article Categories:
इतर

Comments are closed.