आई मी काळी का आहे?

Written by

आई मी काळी का आहे… मुलीच्या मनातील काळेपणाची खंत कमी करण्यासाठी नक्की वाचा..
जयश्री कन्हेरे – सातपुते

आज संध्या  ला लेकीने प्रश्न विचारला… “आई तू गोरी आहेस.. मी का बर काळी?मला तुझ्या सारखं गोर व सुंदर दिसायचं आहे. “……. 9 वर्षाच्या सलोनीचा प्रश्न.

अग माझ्या बाळा.. तू अशीच खूप सुंदर दिसतेस.

नाही ग आई, गोरे लोकच सुंदर दिसतात. तुझ्यासोबत बाहेर आली की सगळे कस म्हणतात, “संध्या, तुझी मुलगी बाबांसारखी झाली वाटते, नाहीतर तू किती गोरी व तुझी मुलगी बघ.. ” म्हणजे तू सुंदर आहेस मी नाही… सलोनी म्हणाली

अग बाळा आज काय हे सुंदरतेच व गोरेपणाचं घेऊन बसलीस..

मला ती टीव्ही तली क्रीम आणून देशील का मग मी पण गोरी होईल… आई आणशील न ग

अग सोनू तू तूझे फोटो बघितलेस का.. बघ किती गोड स्माईल आहे तुझी.. डोळे बघ किती बोलके वाटतात… आणि आपली दोघींची फोटो बघ… कोण छान दिसतंय तुला त्यात..?

तूच दिसतेस सुंदर.. मी नाही दिसत… सलोनी रागानेच म्हणाली. ???

अग सोनू.. काळ.. गोर असं काही नसत.. ग बाळा.. तू माझ ऐकशील का जरा..

स्वीटी कुणासारखी दिसते..?

सलोनी :- सुजल काकांसारखी..

बरोबर, तेजस कुणासारखा आहे.

सलोनी :- मामा सारखा आहे ग..

तुझी ती मैत्रिन.. अक्षरा ती कुणासारखी दिसते..

सलोनी :- तिच्या आईसारखी.. ग. त्याच काय आई.

अरे सोन्या मुलं आई-बाबांन सारखीच दिसायला असतात.. बर मला सांग तुला बाबा नाही आवडत का तुझे?

आवडतात न.. माझे बाबा खूप छान आहेत.

छान म्हणजे? दिसायला की तुझ्याशी छान वागतात?

माझे बाबा खूप छान आहेत दिसायला.. बाबा शाळेत आले होते तेंव्हा माझ्या फ्रेंड्स म्हणतं होत्या मला  “तुझे बाबा किती छान आहेत ”

अच्छा…. तू तर मला हे सांगितलं नाहीस ग..

अग आई विसरले मी.

तू कुणासारखी आहेस ग?  माझ्यासारखी की बाबांन सारखी?

बाबांन सारखीच आहे मी, बाबा आजोबांन सारखे व मी बाबांन सारखी…आणि हुशार पण.,हो न ग आई

मला तर आधीच माहिती होतं हे, की तू तुझ्या बाबांसारखी आहेस दिसायला व हुशार….पण बाबा काळे आहेत न तुझे त्यामुळे ते चांगले दिसत नाही. मग त्यांची हुशारी काय कामाची नाही का? ??

असं कस.. बाबा नोकरीं करतात,  माझे गणिताचे प्रश्न किती छान समजावून देतात मला. माझे बाबा छानच आहे. निधी चे बाबा तिला मदतच नाही करत अभ्यासात तिची आईच घेते व तिला ट्युशन पण आहे.. माझे बाबा तर मला कधी रागावत पण नाही.

तरी पण  ग पिल्लू ते काळे आहेत न.. म्हणून तू काळी झालीस न.. कारण तू तुझ्या बाबांची कॉपी आहेस दिसण्यात व अभ्यासात पण…

सलोनी :- मग काय झालं ग.. मी माझ्या वर्गात नेहमी पहिला असते… सगळ्या टीचर माझे खूप लाड करतात.. आणि ती शर्वरी आहे न खूपच गोरी आहे,तिला न नीट वाचता पण येत नाही..

मग काय झालं नाही वाचता येत शर्वरीला,ती गोरी तर आहे न.. आणि गोरे असणारे सुंदर असतात असं तूच म्हणालीस न.. ते छान असतात मग ते अभ्यासात मागे असले तरी चालेल नाही का?

सलोनी :- असं कस.. सुंदरपणा, गोरेपणा वेगळा आणि आमची स्टडी वेगळी नाही का…

बघ आता तूच मगाशी रडत होतीस की तुला गोर व्हायचं आहे…आणि मी तुला समजावत होते की रंगा पेक्षा आपले गुण जास्त महत्वाचे. एखाद्याने आपल्याला रंगावरून अपल्याला चिडवलं तरी वाईट वाटून घेण्यापेक्षा आपल्यामध्ये असणाऱ्या टॅलेंट मुळे त्याच लोकांना दाखवून द्यायचं की मी कशी आहे. कस असत बाळा.. गुण महत्वाचे असतात ग रूप नाही..

आणि मी तुझं नाव म्हणूनच सलोनी ठेवलं.. कुणीही तुला तुझ्या रंगावरून काहीही म्हणण्या आधी मी तुझ्या नावातच त्या सावळेपणाला टाकलं आहे. माझी सलोनी माझ सुंदर बाळ. आता म्हणशील का आई मी काळी का आहे ?

नाही म्हणणार… मी छान आहे माझ्या बाबांसारखी… हो न ग आई.. सलोनी हसत हसत म्हणाली

तूच बघ आता.. मला माझ बाळ नेहमीच सुंदर दिसत व सुंदरच राहील…घट्ट मिठी मारली संध्याने सलोनीला..

आणि सलोनीच्या मनातलं काळेपणाचं न्यूनगंड देखील कमी झाला..

समाप्त… ?जयश्री कन्हेरे -सातपुते

काळ्या मुलींना बरेचदा अशा अनेक प्रसंगांना सामोरे जाव लागत.. प्रत्येक पालकांनी आपापल्या परीने त्यांना समजावून सांगावं… व महत्वाचं हे की आपला रंग किंवा कोणतही व्यंग स्वीकारण्यासाठी मुलांना मानसिक तयार करा.. त्यांच्यातले गुण ओळखून त्याला वाव द्या.. ज्यामुळे मुलांना त्यांच्या रंगाविषयी कुठलीही असूया राहणार नाही..
लेख कॉपी पेस्ट करताना, शेअर करताना माझ नाव नक्की टाका.. लेखिकेची मेहनत व मोबदला म्हणजे तिच होणार नाव व नावासकट शेअर झालेली पोस्ट. बाकी तुम्ही समजदार आहात..
??धन्यवाद जयश्री कन्हेरे -सातपुते ??

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत