“आई….!”

Written by

“आई…!”

● प्रत्येक आई एक हिरकणी असते…

हो.. प्रत्येक आई एक हिरकणी असते… अन प्रत्येक आई मध्ये एक हिरकणी असते. आपल्या मुलाला(हिऱ्याला) पैलू पाडण्याचे काम ती करीत असते…अन हे करत असताना तिचं सारं लक्ष आपल्या पिलांभोवती असतं… जोपर्यंत ते उंच भरारी घेण्यास सक्षम होत नाहीत तोपर्यंत आई हेच मुलांचं संरक्षक कवच असते आणि म्हणूनच… ‘घार उडे आकाशी, ‘चित्त तिचे पिलांपाशी’… हि उक्ती आईला तंतोतंत लागू पडते. या जगात निस्वार्थी प्रेम कोण करणारं असेल, तर ती म्हणजे आई!

● अजारी पडल्यावर रात्र-रात्र जागणारी ती असते… ‘आई!’

● स्वतःच्या तोंडचा घासही काढून स्वतःच्या मुलांना देणारी ती असते… ‘आई!’

● दिवस-रात्र कष्ट घेणारी आणि जिच्या मनात सदैव स्वतःच्या मुलांचाच विचार असतो ती असते… ‘आई’!

● आपल्या मुलांसाठी काढलेल्या खस्तांची परतफेड त्यांनी करायला हवी, असा साधा विचारही जिच्या मनात कधी येत नाही, ती असते आई…!

● मुलं कितीही मोठी झाली, तरी त्यांच्यावर निरागस बाळाप्रमाणे प्रेम करते ती असते आई…!

मग ती झाशीची राणी असो… शिवरायांची जिजाऊ असो… साने गुरुजींची शामची आई असो… नोकरी करणारी स्त्री अथवा गृहिणी असो किंवा कामवाली असो… या सर्वांमधील आई एकच आहे. वेळप्रसंगी कधी ती दुर्गा होते तर कधी हिरकणी… आपल्या पिलांसाठी लढण्याची ताकद तिच्यात जन्मजात असते. आणि म्हणूनच… “प्रत्येक आई हिरकणी एक असते…!”

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.