आजी?

Written by

रेवा शाळेतून नुकतीच घरी आलेली. तिची आई सानेकाकूंशी गप्पा मारण्यात मग्न होती. काकू तिच्या आईला सांगताना तिने ऐकले की, “सुमितच्या आजीने त्याच्या आईच्या जाचाला कंटाळून जीव दिला म्हने आणि तिला हल्ली रात्रीचं गच्चीवर फिरताना बिल्डिंगमधल्या खूप जणांनी बघिलय..असे म्हणतात, कधी कधी तर ती गच्ची च्या कठड्यावर पाय मोकळे सोडून बसलेली असते. तेव्हा पासून कोणीही रात्रीच गच्चीवर फिरकत नाही.”
आणि त्याच रात्री अभ्यास करताना रेवाचे लक्ष सहज गच्चीकडे गेले. तर तिला तिथे खरचं कोणीतरी बाई उभी दिसली आणि ती रेवाला बोलवत होती. रेवाने घाबरून डोळे गच्च बंद केले. तेवढ्यात आईची हाक आली, “रेवा झोप आता पुरे झाला अभ्यास!!”

~समाप्त~

(ही कथा 100 शब्दांची आहे..वाचकांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती..)

Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा