आठवणीतल्या पावसासाठी…. मनातील शब्द

Written by

 

प्रिय, पावसा

पत्रास कारण… तू का रुसलास आमच्यावर,
तू हल्ली लहान मुलांसारखा का रुसतोस रे..?
तुझी येण्याची चाहूल जून मधेच लागायला हवी की नाही..? तूच सांग…
पण जुलै संपत आल्यावर तू तुझं दर्शन देतोस…
अरे किती आतुरता असते तुझ्या आगमनाची माहिती आहे का तुला?
मी लहान होते तेंव्हा तू अगदी वेळेवर यायचास… आम्ही मनसोक्त भिजायचो तुझ्या प्रत्येक सरीसोबत…
आणि तुला आठवत का.. आमच्या मालकीचे जहाज, बोट, काटा बोट देखील चालायच्या तू (पाऊस )ओसरल्यावर साचलेल्या पाण्यावर… नालीतील पाण्यावर..कुणाची नाव जिंकेल याची पैज लागायची रे आमची खूप मज्जा यायची रे..
ती नाव कागदाची असायची त्यामुळे पाण्यानी ओली व्हायची व मधेच पाण्यात बुडायची… तर कधी कधी तुझी अचानक सर यायची आणि आमच्या नाव डुबवून द्यायची तेंव्हा मात्र फार राग यायच्या तुझा… तरीही तू आवडायचास मला व आताही आवडतोस.. पण तू आता आधीसारखा येत नाहीस रे..
तुला माहिती आहे.. आई किती रागवायची आम्हाला तुझ्या सरी मधे भिजण्यासाठी..”अरे सर्दी.. खोकला होईल. ताप येईल, तब्येत खराब होईल. चला व्हा आत..कुणी भिजणार नाही पावसात”….असं रागवायची..

आणि शाळेतून येतानी आम्ही मुद्दाम साचलेल्या डबक्यात उड्या मारत यायचो…त्यामुळे खराब होणारे कपडे, सॉक्स, शूज आणि आम्ही स्वतः देखील ???…हा सर्व अवतार बघून तर आईचा असा संताप व्हायचा.. ती तुला शिव्यांची लाखोळी व्हायची व मला जाम बदडायची..
आणि दुसऱ्या दिवशी युनिफॉर्म नाही घालून गेलं की शिक्षक देखील रागवायचे..
तेंव्हा राग यायचा सगळयांचा…पण खूप मज्जा यायची रे ते सगळं करण्यात..
आईच्या म्हणण्यानुसार खरच आमची तब्येत खराब व्हायची..जास्त भिजलो की.आणि मग शाळेला सुट्टी भेटायची…
खूप आठवणी आहेत रे तुझ्या सोबतच्या..तू पहिल्यांदा यायचास न तेंव्हा मातीचा सुवास दुरूनच यायचं…तो सुवास आल्यावर असं वाटायचं ती माती उचलून खावी..आणि तो सुवास श्वासात भरून ठेवावा.
हल्ली तुला काय झालं…?
ढग तर येतात पण तू नाही येत..का रे?
रुसलास का आमच्यावर?

तुझ्या उत्तराची वाट बघतेय…
नक्की ये, वेळेवर ये.. लिहिण्यात चूक झाली असेल तर माफ कर मला..तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेली….
तुझीच
❤ पाऊसवेडी ❤
जयश्री कन्हेरे -सातपुते..

आवडल्यास.. like करा.. तुमच्या पावसाळ्यातील आठवणी कमेंट मधे सांगा.. आणि अशाच आठवणी असतील तर शेअर नक्की करा पण नावासहित ©®जयश्री कन्हेरे -सातपुते

फोटो साभार गुगल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा