आठवण

Written by

दिवसांच्या कातरवेळी

वाफाळलेला चाहापीत असताना

न बोलवता अच्यानक येणारी

कोणाची तरी

आठवण

 

कश्याचा तरी आनंद झाल्यावर

कधी तरी दु:ख झाल्यावर

अश्रूं बरोबर वाहनारी

कोणाची तरी

आठवण

 

 

 

कोणाची तरी लकब पाहून

कोणाचा तरी चेहरा पाहून

न कळत पने मनात डोकावणारी

कोणाची तरी

आठवण

 

आयुष्यात येखाद्या संकटात सापडल्यावर

आपल्याला त्याने सोडवले असते

ह्या विचाराने हृदयात उठनारि

कोणाची तरी

आठवण

 

 

 

अनाहुत पणे कधी तरी

रात्रीच्या आंधारात

वीजे प्रमाने चमकुन जानारी

कोणाची तरी

आठवण

 

न बोलता ही खूप काही बोलनारी

मनात ठरवून ही न विसरता येणारी

सतत मनाला भुरळ घालनारी

कोणाची तरी

आठवण

 

पावसाळ्यात साचलेल्या डबक्या प्रमाणे

नको- नको शी वाटणारी

तरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात

हवी – हवी शी वाटून

जपून ठेवलेली

कोणाची तरी

आठवण

 

कोणाची तरी

आठवण

 

https://www.swamini08.ml/2019/10/blog-post_17.html

 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा