आठवेल कारे?

Written by

आठवेल का रे तुला आपल्या मैत्रीची सुरवात?
कशी अलगदपणे केली आपण अनोळखीपणावर मात

आठवेल का रे तुला आपण मारलेल्या अखंड गप्पा
नकळत ओलांडलेला मैत्रीच्या पलीकडील टप्पा

आठवतील का रे तुला आपल्या कल्पना ,स्वप्न धुंद
की विसरशील आपल्यातले नाजूक रेशिमबंध?

आठवेल का रे ‘तू’ माझा मी ‘तुझी’असणं
आठवेल का रे माझं ‘राधा’ तुझं ‘कृष्ण’ असणं

आठवेल का रे तुला मी मगितलेलं आयुष्यभराच्या नात्याचं वचन
की सहजपणे तोडून निघून जाशील माझं मन…….

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा