आणि…. आई शहाणी झाली…

Written by

 

@अर्चना अनंत धवड

अंजली तिच्या मुलाचा आदित्यचा…….रिजल्ट घेऊन आली…. आदित्य दुसरीत होता… रोहित ,तिचा नवरा लैपटॉप वर काम करीत होता…. आल्याबरोबर तिची बडबड सुरू झाली… रीमा च्या मुलाचा पहिला नंबर आला… याला काय कमी आहे….. पण अभ्यासच करायला नको ना…. मला रिजल्ट सांगायची पण लाज वाटत होती… … वगैरे वगैरे… अस खुप काही बोलत होती…… आदित्य खाली मान घालून बसला होता..

रोहित नी आदित्य ला जवळ बोलावले….

बेटा.. तुझी मार्क शीट दाखव…… मार्कशीट पाहताच म्हणाला… बापरे.. 92 पर्सेंट… आम्हाला तर नाही मिळाले बुवा इतके मार्क….. बेटा तुझा पहिला नंबर आला…. बाबा, बरोबर पहा…. दहावा नंबर आला.. अरे तुझ्या वर्गात किती मूल आहेत.. पन्नास…. तुझा दहावा म्हणजे तुझ्या मागे चाळीस मुले… चाळीसात तु  पाहिलाच ना….आता आणखी अभ्यास करायचा अणि पाचव्या नंबर पर्यंत यायचा प्रयत्न करायला….. नाही आला तरी हरकत नाही….. पण आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे…. आपली स्पर्धा आपल्याशीच असावी…… इतरांशी तुलना करू नये… .. … खर तर तो हे अंजली ला सांगत होता…. छोट्याशा आदित्य ला किती कळल माहिती नाही… पण बाबा आपली बाजू घेतात इतके कळले . हो बाबा… आदित्य खुष झाला. तो आदित्यच्या कानात म्हणाला.. ही आई अशीच बडबड करते.. जाऊ दे.. अणि दोघेही हसायला लागले.. अंजली परत ओरडली…. तुझ्यामुळे आदी बिघडत चालला…. तुझ्यामुळे तो जास्त लाडवला…. ती आदित्य ची खूप काळजी करायची… नेहमी रीमा च्या मुलासोबत तुलना करायची…
रोहित शॉपिंग ला चालतो का…. अग मला कंटाळा येतो.. तूच जा ना… रोहित ला गर्दीत बाहेर जाणे आवडत नसे…

ती एकटीच मॉल मध्ये गेली… चार पाच ड्रेस घेतले… ट्रायल रूम कडे गेली… तिची मैत्रीण रिमा पण शॉपिंग ला आली होती…….  एक एक ड्रेस ट्राय करीत होती…. तिचा नवर्‍याने अंगठा दाखवलं की बाजूला ठेवत होती… अंजली ला फार कौतुक वाटले … मनात आले किती छान…. पसंद करायला मदत करतो… नाहीतर हा रोहित.. एकतर यायलाच तयार नसतो अणि आला तरी…. काय उपयोग… कोणताही चांगलाच आहे म्हणतो…. काही आवड निवड तर नाहीच…. तिला स्वतः बद्दल फार वाईट वाटले… तिनी चार पाच ड्रेस घेतले… तिला एक टी शर्ट आवडले… तिनी रोहित ला फोन वर विचारले… अरे तुझ्यासाठी टी शर्ट घेऊ का… घे ना… निळ घेऊ की काळा… ..

घे ना कोणताही… तुला आवडेल तो… काय माणूस आहे ना… कसलाच काही सांगत नाही…. तिला रिमा च्या नवर्‍याचे कौतुक वाटू लागले…. स्वताची रिमा सोबत तुलना करू लागली….. मनात म्हणाली….. किती नशीबवान आहे रिमा… तिला इतका प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा मिळाला…

रिमा च्या मुलाचा वाढदिवस होता…. एका मतिमंद मुलांच्या वसतिगृहात जायचे ठरले होते…. रोहित ला काही काम असल्यामुळे तो येऊ शकत नव्हता… तिने रिमा सोबत जायचे ठरवले… रिमा तिच्या शेजारील फ्लैट मध्ये राहत होती….

रिमा कडे गेली… रिमा बेडरूम मध्ये तयारी करीत होती…. ती छान तयार झाली होती…. तिची ती डिझायनर साड़ी… हलकासा मेकअप… छान दिसत होती… तिचा नवरा तयारच होता… त्या दोघी  बाहेर आल्या … तिचा नवरा ओरडला…. काय हे… कुठे काय घालायचे.. काही सेन्स आहे का… बावळट कुठली…. लग्नाला चाललीस का…  अंजली समोर तिला तिच्या ड्रेस सेंस वरुन  खूप काही बोलला…. तिच्या डोळ्यात पाणी तरळले…… तिनी साड़ी पिन काढण्यासाठी साडीला हात लावला.. अंजली ने  तिचा हलकेच हात दाबला…

भाऊ, रिमा छान दिसते…. मी पण साडीच  नेसणार होती पण… वेळ झाला म्हणुन ड्रेस घातला…. तो थोडा शांत झाला…

अंजली ला तिचा  नवरा आठवला… ..ती  काय घालून आली याकडे सुद्धा त्याच लक्ष्य नव्हते….. मनात म्हणाली  आपला रोहितच बरा…

वाढ दिवसाच्या ठिकाणी सर्व मतिमंद मूल पाहिले अणि अंजली ला भरून आले….आपला मुलगा दहावा आला म्हणुन किती बोललो त्याला…किती वाईट वाटल असेल बिचार्‍याला…..

या मुलांच्या आई वडिलांना कस वाटत असेल…. जगात इतक दुःख असताना आपण किती शुल्लक गोष्टीसाठी काळजी करून स्वतःला दुखी करून घेतो…   रिमा नी मुलांना खाऊ अणि गिफ्ट दिले … पण अंजलीच लक्ष्य घरी होते…. कधी एकदा घरी जाते अणि आदित्य ला sorry म्हणतेय… तिला रोहित चे शब्द आठवले…. आपली स्पर्धा आपल्याशीच असावी…… इतरांशी तुलना करू नये

घरी आली… दोघा बापलेकांनी पसारा घातला होता…अंजली ला बघताच आवरायला सुरवात केली….. अंजली त्यांच्याजवळ गेली… रोहित आज आपण बाहेर जेवायला जायच का…..

का ग…. .. आज काय खास…..

आदित्य ला पार्टी देऊ या… … तुझा लेक चाळीसात  पहिला आला ना……. तिघेही हसायला लागले… … आई आनंदी तर कुटुंब आनंदी……..

माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज फॉलो करा….

लाइक शेयर अणि कमेंट…….

धन्यवाद

©अर्चना अनंत धवड

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा