आणि ती जागी झाली… 100शब्दांची कथा

Written by

आणि ती जागी झाली… 100शब्दांची गोष्ट

        सरीता व ललिता दोघी बहीणी आणि आई-बाबा अस चौकोनी कुटुंब. घरची परिस्थिती बेताचीच.ललिता तशी फार सुंदर नाही,मात्र हुशार होती… हुशारीने पुढे छान सरकारी नोकरी मीळवली तीने..त्यामुळे घरची परिस्थिती सुधारली..
काही दिवसांनी श्रीमंत स्थळ आले व थाटामाटाने लग्न पार पडले ललिताचे . तीला खुपच आनंद झाला जी श्रीमंती स्वप्नवत होती त्याची ती मालकीण झाली होती. चार दिवसाची नवलाई संपली..आणि सासरच्यांची श्रीमंती दिसली…

महिन्याच्या पगार झाला व नवरा म्हणाला तुला त्रास कशाला जॉईन अकाउंट करून घेऊ…केल तिने.
मग ATM काढल तेसुद्धा त्याच्याच ताब्यात कारण  त्रास नको…
हळूहळू कळल तिला आपण  कमावत असुनही अधीन आहोत…हा विचार सुरू असतांना शाळेची घंटा झाली..आणि ती जागी झाली… आता त्रास झाला तरी चालेल पण आर्थिक व्यवहार आपण करायचा.. आर्थिक स्वावलंबी बनून दाखवायचं..
©जयश्री कन्हेरे सातपुते..
बऱ्याच स्त्रिया नोकरीं करतात पण व्यावहार त्याचे पतीदेव बघतात.. आणि अशा माझ्या काही भगिनी या आर्थिक स्वावलंबी असूनही परावलंबीच असतात..
ही माझी पाहिली 100शब्दांची गोष्ट आहे…माझ्या लेखनाची सुरुवात..धन्यवाद ?✒️?©जयश्री कन्हेरे सातपुते

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत