..आणि शेवटी तिने तोडला सोन्याचा पिंजरा..(भाग 1)

Written by

. अंजली.. 

लहानपणापासून सर्व गोष्टीत तरबेज…अगदी अभ्यासापासून ते खेळण्यापर्यंत… एका राजकारणी घरात तिचा जन्म झालेला..अशा घरात मुलीला जास्त बाहेर जाऊ देत नसत..पण तिच्या घरात मात्र तिला संपूर्ण पाठिंबा होता..ती हवे ते करू शकत होती…वडील पक्षाच्या कामात व्यस्त असत, आई पाहुण्यांच आगत स्वागत पाही, पण अंजली कधीच या गोष्टीत मिसळली नाही, स्वप्नांच्या दुनियेत ती कायम विहरत असे… अंजली चं शिक्षण संपलं, विद्यापीठात ती पहिली आली.. तिच्या वडिलांनी मोठी पार्टी केली…पार्टी मध्ये एक मोठे मंत्री आलेले…अंजली ला पाहून त्यांना वाटलं की हिला आपली सून करून घ्यावं.. पण ही बोलण्याची वेळ योग्य नाही म्हणून नंतर बोलणं करू असं त्यांनी ठरवलं… शिक्षण झालं आणि अंजली ला विविध ठिकाणाहून नोकरी साठी बोलावणं आलं… भरपूर पगार आणि सर्व सुविधा असलेल्या सगळ्या कंपन्या होत्या.. अंजली ने नोकरी करायचं ठरवलं… तिचे वडील म्हणाले “अंजली तुला खरच नोकरी करायची आहे का?त्यापेक्षा तू पक्षाचं काम बघ, दुपटीने पगार देतो की तुला…” अंजली ला पैशांसाठी नोकरी नकोच होती, काहीतरी नवीन शिकायला, बाहेरचं जग अनुभवायला आणि तीच्या शिक्षणाचा योग्य वापर करायला तिला नोकरी हवी होती.. तिने वडिलांची ऑफर धुडकावली, आणि नोकरी करायचा निर्णय घेतला..तिच्या वडिलांनी काहीही हरकत घेतली नाही, उलट अंजली चा त्यांना खूप अभिमान वाटला… इकडे त्या मंत्र्यांनी अंजली च्या वडिलांना आपला हेतू कळवला.. वडिलांना आनंद झाला, इतक्या मोठ्या मंत्र्याची सून होणार माझी पोर..पैशांमध्ये खेळेल नुसती…मुलगाही चांगला आहे…काहीही हरकत नाही.. अंजली ला हे कळलं तेव्हा ती हिरमुसली, नुकतीच नोकरी लागलेली आणि लग्नाचं लगेच सुरू केलं म्हणून तिला वाईट वाटलं… त्या मंत्र्यांनी स्वतःची इमेज खूप रंगवून उभी केलेली, मात्र त्यामागचं सत्य फार कटू होतं.. तो मंत्री आणि त्याचा मुलगा..अत्यंत जुनाट आणि खालच्या विचारांचे…मुलीच्या जातीला गुलाम म्हणून वागवणारे आणि आपल्या वर्चस्वाखाली ठेवणारे असे ते लोकं होते…त्यांना आपला राजकीय हेतू फक्त साध्य करायचा होता… बघण्याचा कार्यक्रम झाला, मुलगा तसा देखणा होता, आणि समोर एकदम सालस मुलाप्रमाणे वागला..अंजली त्याच्या या वागण्याला फसली आणि तिने होकार दिला.. आता लग्ना नंतर अंजली च्या वाट्याला काय येतं, ती त्यावर कशी मात करते, आणि स्त्री चं वर्चस्व कसं प्रस्थापित करते हे वाचा पुढच्या भागात…

पुढचा भाग वाचण्याची इच्छा कंमेंट मध्ये नक्की कळवा…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा