..आणि शेवटी तिने तोडला सोन्याचा पिंजरा..(भाग 4)

Written by

मागील भागात आपण पाहिलं की सागर ते कॅलेंडर घरी नेतो, इकडे अंजली सैरभैर झालेली असते..इतक्या वर्षांपासून आपलं लिखाण आता सागर च्या ताब्यात गेलं होतं….सागर त्याचं काय करेल? त्याने घरी सांगितलं तर? या विचारांनी ती असह्य झाली…सागर ने ज्या दिवशी कॅलेंडर नेलं त्याच दिवशी तिची कादंबरी पूर्ण झाली होती…

तिकडे सागर ने कादंबरी वाचायला सुरुवात केली, इतकं सुंदर लिहिलं होतं की सागर स्वतःला थांबवू शकत नव्हता.. संपूर्ण 2-3 दिवसात त्याने ते वाचून काढले…त्याचा डोळ्यात पाणी आलं..त्याला हेही लक्षात आलं की अंजली किती हुशार आहे पण घरच्यांनी लादलेल्या बंधनांमुळे तिला हे कॅलेंडर मागे लिहावं लागतंय…

काही दिवसांनी सागर घरी आला, त्याला एकट्यात गाठून अंजली ने कॅलेंडर बद्दल विचारले, सागर म्हणाला 

“वहिनी, घाबरू नका…सर्व लिखाण माझ्याकडे सुरक्षित आहे…आणि तुमच्या सासरी ते कोणालाही कळणार नाही याची जबाबदारी मी घेतो”

सागर चा समजूतदार पणा पाहून अंजली ला हायसं वाटलं.. ती निश्चिन्त झाली…

काही महिने लोटली…अंजली च लिखाण आता बंदच होतं…

अंजली च्या नवऱ्यामध्ये एक बदल जाणवू लागला…तो त्याच्या राजकारणात सकारात्मक रित्या भाग घेऊ लागला, त्याचा स्वभाव आधीपेक्षा खूप शांत झाला…आणि सक्रियपणे तो नव नवीन गोष्टी करू लागला…

एक दिवस अंजली साठी त्याने गुलाबाचे फूल आणले…अंजली चा विश्वासच बसेना…इतका बदल? अचानक?? पण आपला संसार आणि आपला नवरा आपल्यात येतोय याचा तिला आनंद झाला..

एक दिवस तो अंजली ला म्हणाला…

“अंजली, एखादी गोष्ट आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकते, यावर आहे का तुझा विश्वास?”

अंजली विचारात पडली…कशाबद्दल बोलताय हे?

“अंजली मी एक पुस्तक वाचलं, त्यात मी स्वतःला बघितलं, मला जगण्याचाच नाही तर राजकारणात कसं वागायचं, दुसऱ्याला कसं आपलं करायचं हे सुदधा त्या पुस्तकाने शिकवलं..खरंच हे जे कोणी लिहिलंय ना त्याला माझा सलाम, त्याला भेटायची खूप इच्छा आहे, पण बघ ना, लेखकाने आपलं नाव जाहीर केलं नाहीये, अनामिक लेखक म्हणून उल्लेख आहे…आणि आता तर मार्केट मध्ये बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक गाजतय”

त्याला वाचनाची गोडी लागली म्हणून अंजली खुश झाली…

तिने विचारले, “कोणतं पुस्तक? बघू जरा..”

त्याने तिला पुस्तक आणून दिलं..

नाव होतं, “सोन्याचा पिंजरा”

वाचायला सुरुवात केली, एकेक पान.. प्रत्येक पान भराभर उलटवतांना तिची धडकी वाढत चाललेली..तिचे हात थरथरू लागले…

“कुठून आणलं हे पुस्तक?”

“सागर ने दिलंय”

अंजली ला समजलं, सागर ने तिच्या नकळत तिची कादंबरी प्रकाशित केली होती…

तिला काय करावं सुचेना…

अंजली चा नवरा बाहेर गेला आणि काही वेळात सागर त्यांच्या घरी आला, घरी कोणीही नव्हते, नोकरांनीं चहा पाणी देऊन ते कामाला निघून गेले तसं अंजली ने सागर ला गाठलं..

दोघे एकमेकांसमोर उभे होते, अंजली च्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, तिच्या डोळ्यात पाणी आलं..

“वहिनी, बास झालं आता, वेळ आलीये सत्य सर्वांसमोर आणण्याची…”

अंजली घाबरली,

“सागर भाऊ, आमच्या घरात मी असलं काही केलंय हे समजलं तर वादळ उठेल”

“पुढे काय होतंय बघू आपण”

सागर घरातली सर्व मंडळी येइपर्यंत थांबला..

घरी सर्वजण आले…

अंजली चे सासरे सागर ला पाहून खुश झाले,

 “सागर, तुझ्यामुळे माझ्या मुलात खूप बदल झालाय, तुझे मनापासून आभार”

इतक्यात अंजली ला हॉल मध्ये बघून त्यांनी डोळे मोठे केले…आणि तिला आत जायचा इशारा केला…

“काका थांबा, वहिनी आत जाणार नाहीत…तुम्ही म्हटले ना तुमच्या मुलात बदल घडून आलाय? तो माझ्यामुळे नाही तर या अंजली मुळे…”

काय??

सासरे चक्रावले…नवरा कोड्यात पडला आणि सासू गोंधळली…

ज्या पुस्तकामुळे तुमच्या मुलात बदल झाला ते अंजली ने लिहिलंय,

“तुम्ही तिच्यावर इतकी बंधनं आणली पण तिने त्यातूनही मार्ग काढत कठीण परिस्थितीत हे पुस्तक लिहिले, आणि बघा ..ज्या गोष्टीला तुम्ही तिला विरोध करत होते त्याच गोष्टी मुले तुमचा मुलगा चांगल्या वाटेवर मार्गी लागलाय…”

“अंजली ने हे पुस्तक कधी लिहिलं?, कुठे लिहिलं? मी तर खोलीतले सगळे कागद….” सागर समोर खरं बोलता बोलता अंजलीचा नवरा थांबला…

खरी गोष्ट पुढे आहे, घरातील सर्वाचं मतपरिवर्तन कसं होतं आणि अंजली राजकारणात कसा पायंडा रोवते हे बघाच..

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा