..आणि शेवटी तिने तोडला सोन्याचा पिंजरा (भाग-5 अंतिम)

Written by

अंजली ने पुस्तक लिहिलंय हे समजल्यावर तिच्या सासरी खळबळ माजली. पण ते काही बोलायच्या आत सागर म्हणाला, “काका, तुम्ही तुमच्या प्रचारसभेत सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी असा उल्लेख करतात ना ? मग घरात त्याच स्त्रियांवर अशी बंधन ? स्त्रियांना बंधनात ठेवल्यावर कुठलाहि पुरूषार्थ प्राप्त होत नाही, उलट त्यानां, त्यांच्या कर्तृत्वाला चालना दिली तर तिच्या लोकांना समाजात आदर मिळतो आणि पुस्तक प्रकाशीत करण्याचं तिच्या डोक्यात वगैरे काही नव्हतं. ती बिचारी कॅलेंडर च्या मागच्या पानांवर आपला छंद म्हणून लिहत होती. मी जर ते पहिल नसत तर ती कादंबरी कधी अस्तित्वातच अली नसती. तिच्या नकळत मी हि कादंबरी प्रकाशित केली “

अंजलीच्या सासऱ्यांनी ते पुस्तक सागर च्या हातातून घेतले, आणि चाळले.

ते कडाडले, “यावर माझा सुनेचे नाव का नाही ?”

ते असे बोलले आणि सर्वजण चक्रावले, त्यांचं मत परीवर्तन झालं होतं.

अंजलीच्या नवऱ्यालाही त्याची चूक समजली.

अंजलीची सासू पुढे आली आणि म्हणाली, “मी एक स्त्री असून सुद्धा तुला समजू शकले नाही ज्या बंधनांमध्ये मी अडकले तिथेच तुलाही अडकवून दिलं , मला माफ कर ! “.

अंजलीचे सासरे परत म्हणाले , “तुझा नवरा तुझ्या सासूच्या पोटात होता तेव्हा मी सतत म्हणायचो की मला मुलगाच हवाय, पण आज असं वाटतंय की माझ्या पोटी मुलगी म्हणून तूच का नाही जन्माला आलीस ?”

अंजलीला भरून आले, आजपर्यंतच्या तिच्या सहनशील वृत्तींचं फळ तिला मिळालं होतं.

पुस्तकाचं पुन्हा एकदा प्रकाशन आणि तेही अंजलीच नाव टाकून करायचं असं ठरलं. पुस्तक जस मार्केटमध्ये गेले तसे वाचकांचे अमाप प्रतिसाद आले, कित्येकजण दारी भेटायला येऊ लागले, आता येणाऱ्यांच स्वागत अंजलीची सासू करत होती, अंजलीचा नवरा आणि सासरे आपल्या सुनेचं कौतुक ऐकायला आवर्जून बसत होते.

सागर ने एक गोष्ट सुचवली, अंजली वहिनींना निवडणुकीला का नाही उभे करत? सर्वाना पटले, अंजलीही तयार झाली.

अंजलीच्या सच्चेपणाचा, कुशल वक्तृत्वाचा आणि सेवाव्रतांचा फायदा निवडणुकीत झाला. अंजली भाषणात शिक्षणाचे, स्री स्वातंत्र्याचे आणि आधुनिकीकरणाचे मुद्दे मांडत होती, जे अंजलीच्या नवऱ्याला कधीच जमल नाही.

अंजली निवडून आली, घरात आनंदी आनंद झाला, अंजलीच्या नवऱ्याने तिच्यासाठी एक सरप्राइज ठेवले, अंजलीचे डोळे झाकत त्याने तिला खोलीत आणले, आणि बघते तर काय, खोलीचा एकदम कायापालटच केला होता.

अंजलीसाठी महागडी खुर्ची, टेबल, तिला लिहायला महागडी पानं, महागडी पेन, वाचायला उत्तमोत्तम साहित्य, गाणे ऐकायला एक आयपॉड आणि ताजतवानं वाटावं म्हणून टेबलावर गरमगरम कॉफी ठेवली होती. अंजली खूप आनंदली, तिने सहज भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पाहिलं, ती पहाते म्हणून नवऱ्यानेही पहिलं, दोघांनीं एकमेकांकडे पहिलं आणि दोघेही हसायला लागले.

मौत्रिणींनो कथा जरी काल्पनिक असली तरी त्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे.

अंजलीने परिस्थितीला दोष देत न बसता आहे त्या परिस्थितीतुन मार्ग काढत यश मिळवलं होतं.

आपण तक्रार करत असतो, की नवरा करू देत नाही, सासरचे एकत नाही, मुलांमुळे जमत नाही, पण लक्षात ठेवा,

“परिस्थिती बदलल्यावरच कर्तुत्व करता येते असे नाही, तर कर्तुत्व सिद्ध झाले कि परिस्थिती आपोआप बदलते”

वेळ आली आहे आता आपणही अंजलीसारखा बनायची, जरुरी नाही की मी लिखाणच करेल, कुणाला पाककला येत असेल तर ‘मधुराज रेसिपी’ सारखं घराघरात पोहोचण्याचं स्वप्न पाहू शकतो, चित्रकला येत असेल तर त्याचे प्रदर्शन भरवू शकतो, चांगलं बोलता येत असेल तर अपर्णाताई सारखं व्याख्याती बनू शकतो.

आपली परिस्थिती अंजली एवढी बिकट नक्कीच नाही ना ? विचार करा …

कथा आपल्याला आवडल्यास नक्की लाइक, आणि कमेंन्ट करा.

|| धन्यवाद ||

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा