आतुरता आगमनाची… आई बाप्पा आले ??

Written by

आजी.. आज ही कसली पूजा ग..?  बाप्पा तर उद्या येणार आहेत न? ?? मग बाप्पाला कुठे बसवायचं? सगळी जागा तर या पुजेनेच घेतली ??(चिमुकल्या रेवाच्या भोळ्या मनाला पडलेले प्रश्न आणि आलेला भयंकर विचार??)

हो ग रेवा.. बाप्पा उद्याच येणार आहेत, आज की नाही बाप्पा च्या आई -बाबांची पूजा करायची असते. त्याला हरितालिका व्रत म्हणतात.

अहो आई, मगापासून ही सारखे प्रश्न विचारून मला त्रास देतेय, “हे असं का?  ते तस का?” आमच्या लहानपणी आम्ही फक्त बघायचो आई काय -काय करते ते.. आणि तिला मदत करायचो पूजेत. ही न मला काही करू देत नव्हती म्हणून मी तुमच्याकडे पाठवलं हिला..तुम्हीच सांगा आता तिला… आजची पूजा का करतात ते?  मी माझी बाकीची कामे उरकवून घेते, संद्याकाळी बाया येतील हळदीकुंकवाला आणि.. उद्याच तर विचारायलाच नको.. किती काम आहेत.. देवा.. आई तुम्ही रेवाला सांगा नीट आणि माझी काम होईस्तोवर तिला तिकडे पाठवू नका ..

ये लबाड पोरी, नीट ऐकून लक्षात ठेव बर का?… (इतकं म्हणून रेवाची आई तिचे राहिलेली काम पूर्ण करायला गेली गेली )

अग सोनू (रेवा ) आज हरितालिका पूजाअसते, बाप्पा च्या आई -बाबांची पूजा.. म्हणजे बघ.. तू आईला, मला सांगून जातेस की नाही कुठेही, आणि ते विकास काका तुला बाहेर नेतात तेंव्हा आमची (आई, बाबा, आजी, आजोबा )परवानगी घेतात की नाही,

आणि तू जेंव्हा new friend कडे जायचं म्हणतेस तेंव्हा आधी मम्मी त्या तुझ्या friend चे घर कशे आहे म्हणजे तुझ्यासाठी सेफ (सुरक्षित )आहे की नाही हे बघते न..

हो.. ग आजी पण त्याचा व या पूजेचा संबंध काय? मी तुला काय विचारतेय व तू काय सांगतेयस.. जा मी मम्मीलाच विचारते….

अग थांब जरा, सांगतेय न मी. तुम्ही आजकालची पोर म्हणजे ऍडव्हान्स आहात. सगळं कस shortcut पाहिजे असत तुम्हाला.

अग आज बाप्पाचे आईबाबा, आपण बाप्पाच्या आगमनाची तयारी नीट केली की नाही हे बघायला येतात. आपल्या कडे दहा दिवस ते त्यांच्या मुलाला ठेवतात, मग घर बघायला नको का आपल. त्यासाठी हरितालिका पूजन केल जात. त्यानिमित्ताने बाप्पाच्या आई -बाबांकडून त्यांच्या मुलाला आपल्याकडे दहा दिवस ठेवायची पण परवानगी घेता येते आपल्याला, आणि बाप्पाचे आई बाबा देखील खुश की आपला मुलगा सुरक्षित जागी जातोय..

अच्छा,, असं आहे तर हे सगळं, आता कळलं मला..तरी हरितालिका वेगळ नाव आणि बाप्पाच्या आईच नाव तर पार्वती माता आहे न ग आजी.. ???

हो पार्वतीमातेने केलेल्या व्रताला हरितालिका म्हणतात ग सोनू. अग आज पूजा करायची हरितालिका माता व शंकर  भगवानजींची, आणि उद्या यथासांग हरितालिकेचं विसर्जन करायच.आधी स्त्रिया नदीवर जात असे विसर्जनाला पण आता तर घरीच विसर्जन करतात व नंतर नदीत नेऊन टाकतात (विसर्जन ).

आणि  इकडे बापाच्या आगमनाची, पूजेची तयारी करायची असते..

बाप्पाच्या आगमनाची तयारी ही काही एक….. दोन दिवसात होत नाही बर का.. महिनाभरआधीपासून सगळी तयारी करावी लागते,

हो न ग आजी.. किती दिवस झाले बाप्पा येतोय .. म्हणून आई ने घराची साफसफाई काढली, बाबा नी इकोफ्रँकली मखर तयार केला घरीच, आजोबा म्हणाले होते “विकत येतो ना रे तो थर्माकॉलचा मखर आणि सुंदर पण दिसतो तो. ”

त्यावर बाबा म्हणाले.. “नाही बाबा पर्यावरण विरोधी काहीच करायच नाही इथून पुढे गणपतीला व त्यानंतरही. ”

अगदी बरोबर बोलले तुझे बाबा, आजोबांना कळतच नाही काही..  किती अशुद्धी सगळीकडे. हे देवाला वाहिलेलं निर्माल्य (फुले, पान, नैवद्य ) देखील नदीत, टाकतात लोक.  त्यामुळे पाणी प्रदूषित होते..

बाप्पाची मूर्ती देखील मातीची आणायची असते.. ती पाण्यात विसर्जन केल्यावर विरघळते. पाणी दूषित होतच ग पण प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीसारखे नाही होत, त्या मुर्त्या पाण्यात विरघळतच नाही.. बाप्पाच्या विसर्जनानंतर किती तरी महिन्यांनी जेंव्हा नदीपात्र कोरडे होते.. तेंव्हा त्या मुर्त्या दिसतात, आणि मन हेलावत ग सोनू ??दहा दिवस मनोभावे पूजा करायची आणि नंतर ही अशी दशा त्या बाप्पाची..

आजी बाबा म्हणाले की आपण मातीचीच मूर्ती आणूया..

हो..  आपल्यापासून सुरुवात करूया पर्यावणाचा समतोल राखण्याची. लोक काय करतात यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचे. लोक निर्माल्य नदीत, विहिरीत टाकतात म्हणून आपण पण टाकायचे का?? तर नाही बदलाची सुरुवात आपल्यापासून करायची आपण..

आजी आपण ते रोज हार आणि दुर्वा अर्पण करतो त्याच काय करायच मग? ??

तेच ग त्याला निर्माल्य म्हणतात, आपल्याकडे ती गाडी येते न दरवर्षी गणपती मध्ये निर्माल्य गोळा करणारी, त्यात टाकायचे,  शहरात जागा नसते म्हणून ग. नाहीतर गावात (खेड्यात ) अंगणात गड्डा करून त्यात हे निर्माल्य आणि रोजच्या पूजेचे निर्माल्य गोळा केले जाते.. आणि त्यापासून झाडांनाआवश्यक, पोषक असे खत तयार होते.

आपण सुद्धा सर्व निर्माल्य त्या गाडीत टाकायचे, मग ते लोक त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.

झाले का हिचे समाधान? की आणखी प्रश्न सुरूच आहे मॅडम चे? (रेवाची आई )

हिचे प्रश्न म्हणजे हनुमानजींची शेपटी आहे.. वाढतेच वाढते.. पण नशीब आपल की आपल्या रेवाला हे सगळं जाणून घेण्याची इच्छा आहे. (आजी )

हो आई…. बरोबर बोलताय तुम्ही, आजकाल कुणाला इतकी माहिती नसते, आणि परंपरागत पद्धती बदलून, आपल्याला सोपं पडेल अशा पद्धती अवलंबतात. साधे मोदक सुद्धा करण्याचा कंटाळा येतो आजकाल, ते सुद्धा स्वीटमार्ट मधून विकत आणतात. (रेवाची आई )

अग  धावपळीत नसेल जमत, नोकरीं वाल्या स्त्रीया आहेत आजकाल वेळ नसतो हे सगळं करायला आणि पैशाला कमी नाही, त्यामुळे रेडिमेड आणतात. पण खरं सांगू का, हाताने बनवलेल्या मोदकाची सर आणि चव त्या विकतच्या मोदकाला येत नाही. (आजी )

आई.. तू तर घरीच बनवले ग लाडू, ड्रायफ्रूटचे मोदक….

हो, मला आवडत करायला, आणि तुलाही आवडते न माझ्या हातचे लाडू..?

हो.. तुही तर शाळेत जातेस, तू नाही का थकत ग?  तुला कंटाळा नाही येत बाप्पाच्या तयारीचा,मोदकाचा, लाडूचा?

नाही ग बेटा मला खुप आवड आहे सगळं करण्याची. बाप्पा दहा दिवसांसाठी तर येतो आपल्या कडे. त्याला कशाला बाहेरच खाऊ घालायचं, त्याची तब्येत खराब झाली तर त्याची आई पाठवणार नाही त्याला आपल्या कडे…म्हणून मी घरीच सगळं बनवते. आधीपासून म्हणजेच  महिन्याभरापासून बाप्पाच्या आगमनाची छोटी छोटी तयारी करत असतो आपण आपल्या घरी, एक वेगळाच उत्साह असतो ग, आणि आतुरता बाप्पाच्या आगमनाची. आता जवळपास सगळी तयारी झाली आहे आपली बाप्पाच्या येण्याची.. आता चतुर्थीला बाप्पाचं आगमन आणि स्थापना.

मग पुढील दहा दिवस मज्जाच मज्जा,मोदक, लाडू खायची. होणं आजी..

हो.. सोनू… चला मग पटापट सगळं उरकवून घ्या… आणि तयार व्हा, बाप्पाच्या आगमनासाठी (आजी )

आजी मी, ती तुझ्या साडीची शिवलेली नऊवारी घालेल बाप्पाच्या स्वागतासाठी, कधी एकदाचा बाप्पा घरी येतोय असं झालय मला..???

हो.. घाल नऊवारी घाल, लहान मुलांना बाप्पा जास्त आवडतो.

“गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ”

समाप्त… ✍️जयश्री कन्हेरे -सातपुते

सहज थोडस, पर्यावरण आणि बाप्पाच्या तयारीविषयी लिहिलं, आवडलं तर like करा, कमेंट करा आणि शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. धन्यवाद ??✍️जयश्री कन्हेरे -सातपुते. फोटो साभार गुगल ??

प्रतिक्रिया व्यक्त करा