आपत्कालीन निधीचे नियोजन(इमर्जन्सी फंड)…

Written by

मित्रांनो आज आपण आर्थिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या परंतु दुर्लक्षित केला जाणाऱ्या विषयाचा मागोवा घेऊ. तो म्हणजे आपत्कालीन निधी ( इमर्जेन्सी फंड) नियोजन.

आपत्कालीन निधी म्हणजे काय हे अगोदर जाणून घेऊ. आपत्कालीन निधी म्हणजे असा निधी जो आपल्याला गरज लागली तर आर्थिक अनपेक्षित संकट समयी(उदा. नोकरी गमवावी लागणं, व्यवसाय असेल तर ती काही कारणाने बंद ठेवावा लागणे ) अगदी वेळेवर उपयोगी पडेल. आपल्याला माहीतच आहे की संकटे काही सांगून येत नाहीत. त्यामुळे जर आपण अश्या आर्थिक संकटातून निधी जमा करून नाही ठेवलं तर आपले सगळेच आर्थिक धोरण कोलमडू शकते.

इथे हे लक्षात घेणे महत्वाचचे आहे की हा निधी तुमच्या इतर investments पेक्षा वेगळा आहे. हा निधी तुम्हाला पाहिजे तेव्हा लगेच वापरता आला पाहिजे म्हणून तो तश्याच स्वरूपात असावा. उदाहरणार्थ सविंग अकाउंट, liquid फंड इत्यादी. घर प्लॉट जमीन हे इमेर्जन्सी फंड साठी लक्षात घेता कामा नये कारण ते पाहिजे तेव्हा लगेचच पैसे पुरवू शकत नाही.

आपत्कालीन निधी किती असावा तर तो साधारणपणे सगळे खर्च मिळून ६ महिने पुरेल इतका तरी असावा. जास्त असेल तर हरकत नाही पण कमी मात्र असू नये. समजा तुमचे मासिक उत्पन्न/ पगार ५०००० आहे आणि तुमचा खर्च २५००० आहे. याशिवाय तुमचे वाहन कर्ज ,इन्शुरन्स व इतर हप्ते यासाठी दर महा १५००० लागतात. तर ह्या उदाहरणात तुमचा एकूण मासिक खर्च आहे ४००००. हा खर्च ६ महिन्यासाठी होईल २४००००. हा आहे तुमचा आपत्कालीन निधी. ही रक्कम तुमच्याकडे कायम स्वरुपी सुरक्षित ठिकाणी असणे आवश्यक आहे.

आपत्कालीन निधी किती असावा हे आपण बघितले. पण ही रक्कम लक्षात घेता असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की इतकी रक्कम कशी जमा करायची. तर ह्या साठी आपण साधी पद्धत बघुया. जर तुमचा पगार / उत्पन्न १ तारखेला जमा होत असेल तर त्यातला एकही रुपया खर्च करण्याआधी आपण त्यातला ठराविक हिस्सा (२०, ३०%) दुसऱ्या अकाउंटला पाठवावा. आणि मगच उरलेल्या रकमेचे महिन्यासाठी नियोजन करावे. एकदा का ठराविक रक्कम दुसऱ्या दुसऱ्या अकाउंट ल पाठवली की त्या रकमेचा आपण दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी वापरायचे नाही. हीच पद्धत दर महा वापरली तर साधारणपणे दीड दोन वर्षामध्ये तुमचा आपत्कालीन निधी तयार होईल. हा निधी अतिशय महत्वाचा असल्याने तुम्ही जितके लवकर हा तयार कराल तितके अधिक योग्य. त्यासाठी तुम्ही तुमचे बोनस, इतर अचानक मिळालेले कोणतेही इन्कम त्या आपत्कालीन निधी अकाउंट का ट्रान्स्फर करू शकता.

पुढचा टप्पा येतो की चांगली रक्कम जमा झाल्यावर ती इतर कारणासाठी खर्च करण्याचा होणार मोह. जसे की तुम्ही प्रयत्न करून १ लाख रुपये ह्या अकाउंट ल जमा केले पण मध्येच तुम्हाला नवीन गाडी, टीव्ही किंवा सहलीला जावे वाटू शकते. ह्या गोष्टी जोपर्यंत तुमचे आपत्कालीन निधी पूर्णपणे जमा होत नाही तोपर्यंत टाळावं.

हा निधी तुम्हाला तुमच्या दुसऱ्या investments मोडण्यापासू न, किंवा नवीन कर्ज घेण्यापासून वाचवू शकतो. चला तर आजपासूनच सुरुवात करुया आपत्कालीन निधी बनवायला.

लेख कसा वाटला जरूर कळवा([email protected]) आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा जेणेकरून याचा फायदा अधिकाधिक प्रमाणात होईल.

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा