आपलंतुपलं

Written by

तुला काय वाटतं
तुच तेवढा शहाणा
अरे हाड रे हाड

तू तर अतिशहाणा
ज्याचा बैल रिकामा
मोठा आला तीसमारखाँ

अगं जा ग जा
मोठी आली मला सांगणारी
तोंड बघ आरशात
दिसतेस पोत्यावाणी

क काय बोललास
अरे तू जाडा,ढोल्या
कुसका पावटा
चिडका बिब्बा

अन् तू गं तू गं
आहेस काळी घूस
सदानकदा त्या
आरशासमोर मुरडतेस खूप

ए जा रे दाद्या
गप अभ्यास कर तुझा
नायतर येऊदेत बाबा
सांगतेच तुझ्या खोड्या

जा जा शेमडे सांग जा
तेवढच तर येत तुला
गोष्टीच पुस्तक माझं
बघ देता का मी तुला

ए दे ना रे दादा
माझा शाणा दादा
तुलापण मी देईन बघ
माझ्यातला लाडू अर्धा

ए काय चाललय तुमचं$$
ए दाद्या आई आली
आपलंतुपलं काय नाय
अशीच गं जरा मजामस्ती

——–गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.