” आपल्या घरासाठी… संसारासाठी!!”—भाग-१ ©दिप्ती अजमीरे

Written by

भारती आत्ता आत्ता जरा खुलायला लागली होती… नवीन कॉलेज मध्ये रुळायला तिला जर वेळच लागला होता… या नवीन कॉलेजमध्ये नवीन मैत्रीणी, त्यांच्या बिनधास्त वागण्यात आणि राहणीमानात भारतीला बरीच तफावत जाणवत होती…

तिच्या जुन्या मैत्रिणी पुढे शिकू शकणार नव्हत्या, पण भारती आणि तिची आई दोघींचीही फार ईच्छा होती, म्हणून भारतीला तिच्या आईने(अर्चनाने) खूप मेहनतीने, खटाटोप करून, या नावाजलेल्या  कॉलेजमध्ये admission मिळवून दिली होती…

हळूहळू भारती adjust व्हायला लागली होती…

Internal exam मधल्या भारतीच्या प्रगतीमुळे ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून गणली जाऊ लागली…

भारतीचा आता बराचसा छान group बनला होता… बहुतेक सगळ्याच श्रीमंत, हायफाय सोसायटीतल्या मुलामुलींचा एक ग्रुप होता कॉलेजचा… साधारण कुटुंबातील मुलामुलींचा वेगळा ग्रुप होता… त्यातही भारती अतिसाधारण कुटुंबातील मुलगी होती…

हे जाणून पण तिच्या कलासमधल्या काही जणी  खास तिला पाण्यात दाखवण्यासाठी रोज नवनवीन उपद्व्याप करायचा… पण भारती नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची…

भारती स्पोर्ट्स मध्येही अव्वल होती… कॉलेज अभ्यास आणि स्पोर्ट्स यामुळे तिची कॉलेजमध्ये एक वेगळी ओळख निर्माण होऊ लागली होती…

आता तिचं ही राहणीमान थोडं सुधारलं होतं…
ती गरीब असली तरी स्वाभिमानी होती… आईचे चांगले संस्कार होते तीच्यावर…

कॉलेज मध्ये फेस्टिव सीजन सुरू होणार होता… सगळीकडे त्याचीच चर्चा चालू होती…
Intercollege competition भारतीला sports साठी सिलेक्ट केलं होतं आणि तिने तिची टीम ची तशीच तयारीही करवून घेतली होती… त्यामुळे त्यांच्या कॉलेज ला first 3 rank मध्ये प्रथमच जागा मिळाली होती… आता भारतीचं गुणगान सगळीकडे होत होतं… कॉलेज ने तिचा सत्कार ही जाहीर केला होता…

तिला dance ची ही खूप आवड होती पण कधीच ती कुठल्याच गाण्यावर थिरकली नव्हती… पण कॉलेज च्या gathering मध्ये कोणीतरी अचानक तिला dance साठी प्रोत्साहित केले आणि कसं काय तिने perform केलं, तिचं तिलाच कळलं नाही… पण भारती कशातच कमी नाही हे सगळ्यांनी जाणलं… तिचा friend group वाढत गेला…

सगळं छान चाललं होतं भारतीचं… कॉलेज life भरभरून enjoy करत होती भारती…

Exam जवळ आल्या होत्या… सगळेच अभ्यासी वातावरणात राहू लागले… पण या दिवसांत तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… ती म्हणजे, तिचे फ्रेंड्स तिला अचानक avoide करायला लागले होते…

तिचा फोन receive न करणे, काही विचारलं च तर टाळाटाळ करणं… तिला वाटले की कदाचित अभ्यासाच्या टेन्शनमूळे असेल… पण हळूहळू तिचा भ्रम तुटू लागला… तिला खरच सगळे avoide करत होते… लक्ष असून नसल्यासारखे करणे, ती आली की अचानक सगळ्यांनी न बोलता निघून जाणे, काहीतरी सतत कुजबुज करणे, ती आली की टॉपिक change करणे…

एका विचित्र नजरेने तिला सगळे बघायचे भारतीला…

तिने खूप आठवण्याचा प्रयत्न केला की, असे आपल्याकडून काय झाले असणार की, ज्यामुळे सगळे आपल्याकडे असे बघतात… ती नजर तिला मेल्याहून मेल्या सारखी करायची…
आता फक्त friends च नाही, तर lecturer, प्रोफेसर सुद्धा तिच्याशी दुरूनच बोलायचे.. असं वाटायचं जणू ती अछूत आहे…

तिला आता ही exam ही द्यावीशी वाटत नव्हती… असा काय गुन्हा घडला एकदम की, सगळे असे अचानक वागायला लागले… ती तळपत होती…एकटी पडली होती… मन अभ्यासात लागत नव्हते…

तिची तगमग तिच्या आजीच्या लक्षात आली…

कारण ती एकचं भारतीची खूप जवळची मैत्रीण होती लहानपणापासून… आजीने च जास्त सांभाळलं होतं तिला… आजीकडून ती यथा-कदाचीत आपले हट्ट पुरवून घ्यायची…

तशी भारतीची परिस्थिती जेमतेम च होती.. वडिल सतत आजारी, अंथरुणाला खिळून… आई दिवसभर घरातलं आवरून, रात्री ची जॉब करायची… आजी घरात होती पण तिच्याकडून कामं व्हायचे नाहीत… त्यामुळे भारतीच्या आईला (अर्चनाला) रात्रपाळी चा जॉब करावा लागे… भारतीला अर्चना आजीकडे सोपवून जायची… सकाळी सकाळी परत येऊन, थोडीफार झोप घेऊन, घरातलं आवरायची…

दोन हातानी अर्चना स्वतःचं सारं कुटुंब चालवायची… तिची तळमळ दिसायची भारतीला त्यामुळे आईला ती नेहमीच होईल तेवढी मदत करायची…

आईच्या कष्टाची जाणीव होती भारतीला पण हे सगळं सांगून तिला आईला दुखवायचं नव्हतं…

भारती नेहमी विचारांत असायची पण आईला कळू नये म्हणून वर वर हसत राहायची…

भारतीच्या वागण्यातील हा बदल आजीला जाणवला आणि आईला ही… पण अर्चनाला सुद्धा, स्वतः बोलण्यापेक्षा, भारती आजीकडे मन मोकळं करेल याची खात्री होती अर्चनाला…

एक दिवस आजीने भारतीला असं विचारांत बघून, समजावलं, “बाळा, काही मनात असेल तर आपल्या आजीला, तुझ्या हक्काच्या मैत्रिणीला सांगून मन मोकळं कर… अभ्यासाचं टेन्शन आलं असेल, तर आराम कर… जास्त विचार नको करू… की आणखी काही आहे?? मला सांगितलं तर, मी तुझी शंका दूर करू शकेल का माहिती नाही… पण तुझं मन मात्र नक्कीच हलकं होईल याची खात्री देते…

भारतीला खूप रडायला आलं… तिच्या आजीच्या कुशीत शिरून ती रडू लागली… थोडी शांत झाल्यावर, तिने आजीला सांगितले की, “माझ्यासोबत आजकाल कोणी बोलत नाही… कॉलेजमध्ये मला फार एकटं वाटतं… सगळ्यांची ती विचित्र नजर खायला उठते… अपराधी असल्याची जाणीव करून देते… असा काय गुन्हा घडला, काही कळत नाही गं…

अग् , मला काही आठवत ही नाही आहे की, मी अस काय केलं, ज्यामुळे सगळे असे वागतात माझ्याशी?? बरं फक्त friends असे वागले असते, तर समजून ही घेतलं असतं… पण प्रोफेसर सुद्धा अछूता सारखे वागवतात ग् मला…” —भारती

“पण, का ग बाळा, अचानक असं काय झालं??” —आजी.

भारती काहीशी आठवत आजीला म्हणाली,
“बघ, त्यादिवशी नाही का, आमचं एका friend ने हॉटेल मध्ये पार्टी द्यायचं ठरवलं होतं… मला जया आणि रिशिका घ्यायलाही आले होते… पण बाबांची तब्येत अचानक बिघडल्याने मी जाऊ शकले नाही आणि आईलाही कामावर जायला late झाल्याने, ती, जया आणि रिशिकाला ही घाईतच भेटली आणि गेली कामावर…

त्यानंतर, दोन दिवस मी कॉलेजमध्ये गेलेच नाही आणि जेव्हा गेली, त्यादिवसांपासून च असं घडत आहे…”

भारती परत रडायला लागली…

आजी समजूत घालत होती तिची, पण विचारही करू लागली होती…
“मला वाटते, आता ती वेळ जवळ आली आहे की, तुला सगळं सांगावं…” आजी मनाशीच पुटपुटली…

क्रमशः

(माझ्या प्रिय वाचक रसिकांनो थोडा धीर धरा… तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार की असं काय घडलं की सगळे भारतीला avoide करायला लागले… लवकरच घेऊन येत पुढचा पार्ट तो पर्यंत वाचत राहा… Thank you so much … आपलं प्रेम असंच राहू द्या …)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत