” आपल्या घरासाठी… संसारासाठी!!! “—भाग-२

Written by

भारतीचे डोळे रडून रडून पार सुजून गेले होते…  तेवढ्यात भारतीची एक मैत्रीण, रक्षा, बऱ्याच दिवसांनी आली… तिची आणि भारतीची परिस्थिती सारखीच होती… ती आजारी असल्याने कॉलेज ला गेली नव्हती पण भारतीबद्दल तिला कळले होते… म्हणून मुद्दाम ती भारतीला भेटायला आली होती…

भारतीचे डबडबलेले डोळे बघून रक्षा धीर देऊन भारतीला म्हणाली, “भारती, रडू नको ग… मी आजारी होती म्हणून कॉलेज ला नाही आले पण मला कळलं की, कॉलेजमध्ये सगळे तुला वाळीत टाकल्यासारखं वागतात… यांत तुझी काहीच चूक नाही ग… तू सांभाळ स्वतःला… अपल्यासारख्यांना या परिस्थितीतून जावंच लागतं ग् …”

“म्हणजे, असं काय झालं??? काय वाईट केलं मी कुणाचं??? असा कोणता गुन्हा घडला ग्???—भारती

अग गुन्हा तुझा नाही…  वाईट वाटून नको घेऊ… आपण गरीब, आपली पायरी सोडली असं वाटत असेल त्यांना…—रक्षा

“म्हणजे ??” भारती

“अग, त्यादिवशी नाही का पार्टीला जायला जया आणि रिशिका आल्या होत्या… एक तर त्या या एरिया त पहिल्यांदाच आल्या होत्या… काकांमुळे तू नाही आली पण जाताना त्या काकुला भेटल्या होत्या आणि मग मी त्यांच्यासोबतच गेले होते…

मग…

मग, मग अग … सांग ना लवकर…

अर्चना घरांत आली…

तिला बघताच रक्षा गप्प झाली… अर्चना रक्षाला बघताच, ती, ही दचकली च… थोडी विचारपुस करून अर्चना आंत गेली पण अर्चनाच्या चेहऱ्यावरील रंग उडालेला भारती आणि रक्षा दोघींच्या ही लक्षात आले…

रक्षा शांत झाली…

भारती मात्र रक्षाला कुचके देत विचारत होती की सांग काय झालं ???

आईची आणि रक्षाची झालेली नजरानजर भारती ने हेरली होती???

ती त्याबद्दल ही रक्षाला विचारत होती, पण रक्षा ला घाम फुटला होता… बोलू की नको या संभ्रमात च ती होती …

अर्चना फ्रेश होऊन बाहेर आली आणि रक्षाला म्हणाली, “काय ग कशी झाली त्या दिवशीची पार्टी???  अभ्यास चालू आहे ना चांगला??? अभ्यास करा… मोठे व्हा!!! म्हणजे अमच्यासारखी तुमची घुसमट होणार नाही…

आमचं सगळं हे तुमच्या चांगल्यासाठीच चाललंय… तुमच्या नशीबात आमच्यासारखे भोग येऊ नये म्हणून ही सगळी खटाटोप…

काय ग रक्षा कळलं ना…”

हो… हो काकू…

अर्चना झोपायला गेली…

भारती ने मात्र सगळं जाणून घेण्याचा चांगलाच चंग बांधला होता… म्हणून ती रक्षाला बाहेर घेऊन गेली… कारण तिला लक्षात आले होते की, आई घरी असताना रक्षा तिला काहीच सांगणार नाही….

बऱ्याच वेळानंतर भारती घरी आली ती हिरमुसला चेहरा घेऊन…  लालबुंद डोळे, सुजलेला चेहरा, तिरस्कार तर टपटपत होता नजरेतून…

आजी आणि अर्चना भारतीचा असा अवतार बघूनच घाबरल्या… अर्चना लगेच भारती जवळ जाऊन, कवटाळून, तिला म्हणाली, “बाळ, काय झालं?? असा अवतार का करून घेतला?? काही प्रॉब्लेम आहे का?? मला नाही सांगणार का पिल्ल्या ??”

तशी भारती चवताळली, “तूच सगळ्यांत मोठा प्रॉब्लेम आहेस माझ्या आयुष्यात… तू… तुझ्यामुळे मला काय काय सहन करावे लागत आहे… तुला काय फरक पडतो म्हणा तसंही!! मी काय समजत होते तुला अन् तू काय निघालीस.. छे!! लाज… नाही नाही.. किळस!! हा शब्द सुद्धा कमी आहे !!!”

अर्चना पार कोसळून गेली… भारतीचं असं झिडकारणे तिला सहन झाले नाही… ती न बोलताच तिथून नवऱ्याच्या पायाशी बसून रडू लागली आणि माफी मागू लागली…

आजी हे सगळं बघत होती दुरून आणि ऐकलं होतं तिनेही सगळंच…

भारती तावातावात निघून जाणार, तोच आजीने तिला अडवलं… आता मात्र आजीने भारतीलाच फैलावर घेतले…

“ये भारती, आईला असं बोलतात का??
खबरदार, माझ्या अरचू ला काही बोललीस तर !!” आजी रागात…

“अग आजी, तुला काय माहिती तुझी ही मुलगी काय गुण उधळते बाहेर… काय काम करते!! विचार.. विचार तिला !! मग तू पण काय बोलते बघते मी…” भारती चिडून..

“ये भवाने, काय बोलतेस कळते का तुला?? आपल्या आईविषयी असं बोलतांना जीभ का गळून जात नाही तुझी??” आजी ही चिडून बोलत होती…

“आजी, ही… ही आई म्हणायच्या लायकीची तरी आहे का ग??? का?? का अशी फसवणूक केली हिने??? ही एका हॉटेलमध्ये बार मध्ये गाणे म्हणते… रात्री भडक मेकअप करून… छि!! मला बोलायलाही लाज वाटते!!!
आई का केलंस तू??? अग चार घरची भांडीकुंडी केली असती, तर मला तुझा गर्व वाटला असता ग्… पण हे असं हॉटेल्समध्ये
रात्रीचं डान्सर म्हणून?? छी!! हे असलं काम करतेस तू??”

“ड्रिंक सर्व्ह करते customer ला!!!  काय विचार करत असतील लोकं तुझ्याबद्दल???”

“त्या दिवशी माझ्या friend ने जिथे पार्टी दिली तिथे तू गाणे म्हणत होती असे कळले माझ्या कॉलेजमध्ये आणि आता त्यामुळे सगळ्यांनी मलाच वाळीत टाकले… माझे अस्तित्व मिटवले तुझ्या या कामाने… सगळे माझा राग करतात मला तुच्छतेने वागवतात, तुझी मुलगी आहे म्हणून…”

“बाबांच्या तब्येतीची अशी अवहेलना का??? स्वतःचे शौक पूर्ण करायला???”

भारती रागात च आईला बोलत होती खूप आणि रडत होती…

आजीने, तशीच रागात येऊन, भारतीच्या कानाखाली चांगलीच चपराक ठेऊन दिली… भारती मात्र तेव्हढ्याच आश्चर्याने आजीकडे बघून विचार करू लागली की, “असं सत्य, आईबद्दल च ऐकूनही, आजीने आईला न बोलता, मलाच का मारले??? मी काही चुकीचं बोलले का???”

अर्चना मात्र आपल्या मुलीचे असं भयानक रूप पाहून पार कोलमडून पडली होती…

आपण चूक केली का? हे काम करून असा विचार डोक्यात धावू लागला… जीव मुठीत घेऊन ती कशीतरी उभी राहिली पण अर्चना जागेवरच चक्कर येऊन पडली…

आजी तिला सावरायला गेली, पण भारती मक्ख उभी होती… तिला काहीच कळत नव्हतं की आजी आईला एवढं का support करत आहे…

अर्चना मात्र काही केल्या शुद्धीवर येत नव्हती… तिला डॉक्टरकडे न्यायची ईच्छा ही होत नव्हती भारती ची… पण आजीसाठी म्हणून नेले तिने…

डॉक्टरांनी saline लावली आणि आराम करण्यास सांगितले म्हणून अर्चनाला दवाखान्यात ठेऊन आजी आणि भारती घरी आल्या…

अर्चनाला संध्याकाळी सोडतो म्हणून डॉक्टरांनी सांगितले…

क्रमशः

(माझ्या प्रिय वाचक रसिकांनो थोडा धीर धरा… तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार… खरच कोणी चुकलं होतं का?? आई की भारती??  लवकरच घेऊन येत पुढचा भाग… तो पर्यंत वाचत राहा… Thank you so much … आपलं प्रेम असंच राहू द्या …)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा