आमचं सुखाचं “घरटं” भाग-२

Written by

भाग-२

सरिताचा रुसवा घालवण्यासाठी विवेककडे एक छान कल्पना होती. परंतु त्याला हि गोष्ट सरिताला लगेच सांगायची नव्हती. तो मोबाइल मधे बघत कशाची तरी वाट पाहत होता. आणि निवांत बसल्यावर त्याला मागच्या काही गोष्टी आठवु लागल्या.
सरिताआणि विवेक यांच लग्न तस कांदेपोहे, बोलणी करुन अगदी रीतसर झालेलं होत. दोघेही खुश होते. परंतु काही दिवसानंतर विवेकच्या लक्षात आलं कि सरिता थोडीशी उदास असते . त्याने एक दिवस तिला न राहावुन विचारलं . तेव्हा त्याला कळालं कि तिला तिचं शिक्षण पुढे पुर्ण करायचं होत. सरिता शाळेत असल्यापासून प्रत्येक भाषण, वादविवाद स्पर्धेत प्रथम असायची. त्याचबरोबर शाळेत, कॉलेज मधे काही कार्यक्रम असला कि सुत्रसंचालन हे सरिताकडेच असणार हे ठरलेलं असायचं. त्यामुळे तिला मास कम्युनिकेशन चा कोर्स करुन अँकर होण्याची ईच्छा होती. लग्नांच्या अगोदर तिचे प्रयत्न हि चालु होतेच परंतु चांगलं स्थळ आल्याने आई-वडिलांनी अगोदर लग्न कर आणि नंतर काय करायचं ते कर सांगितले. आणि ति त्यांच्यासाठी लग्नाला तयार झाली होती.
विवेकने तिचं स्वप्नं पुर्ण करायचं ठरवलं कारण त्याचही असच एक स्वप्न जबाबदारी मुळे अपुर्ण राहिलं होत. घरच्यांशी बोलायला गेला तर घरच्यांकडून विरोध. त्यांचं म्हणनं होत कि तिने बाहेर जाऊन भाषणं देणं हे आम्हाला मान्य नाही. घर सांभाळणं हेच बाईचं काम. परंतु हे विवेकला काही पटतच नव्हत. त्याला सरिताची हुशारी अशी वाया जावी असं वाटत नव्हतं. त्याने दोन-तीन वेळेस प्रयत्न केला बोलण्याचा परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. शेवटी विवेकने एकदा बोलुन बघण्याचा विचार केला तर वडिलांनी स्पष्ट सांगितलं जर असे थेरं करायचे असतील तर घराबाहेर जाऊन करा. ह्या घरात हे चालणार नाही.
विवेक व सरिता खुप दुःखी झाले होते. सरिताला घराबाहेर जाणे मान्य नव्हते परंतु करिअर हा प्रश्न होताच. विवेक सरिताशी बोलला व त्यांनी भांडण करण्यापेक्षा घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकत्र राहुन मनं तुटत असतिल तर वेगळे राहुन मनाने तरी जोडले जाऊ असं त्याला वाटलं. आणि ते घराबाहेर पडले.
विवेककडे काही पैसे होते ते आणि काही कर्ज काढुन त्याने भाड्याचं घर घेतलं. सरिताने माहेरी हि काही सांगितलं नव्हतं. हातात काहिच नसल्याने सरिताने अगोदर सगळं व्यवस्थित करुन नंतर अॅडमिशन घेण्याचा विचार केला. व त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. विवेक चा पगार कमी व त्यात कर्ज त्यामुळे अगदी काटकसर करुन त्यांचा संसार चालु होता. आणि काहि महिण्यातच त्यांचं छोटंसं का असेना पण छान घरटं तयार झालं होतं. आणि त्यातच सरिताच्या बहीनीचे लग्न ठरले होते. आणि तिने सगळ्यांना सांगुन ठेवलं होतं कि तिच्या लग्नांत सर्वानी पैठणीच नेसायची. सरिताने माहेरी काही सांगितलं नसल्याने त्यांना काहिच कल्पना नव्हती व बहिनीचा आग्रह चालु होता. आणि तेव्हा विवेक तिला वचन देतो कि तो तिला त्यांच्या लग्नांच्या वाढ दिवसाला पैठणी घेऊन देईल. परंतु तो हे विसरलेला असतो. आणि सरिता त्यामुळे थोडीशी नाराज आहे.
विवेक आता सरिताचा हा लाडिक रुसवा कसा दुर करेल? जाणुन घ्यायचं आहे का? तर मग पुढचा भाग नक्की वाचा. क्रमशः

लेख आवडला तर नक्की लाइक करा.?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा