आमचं सुखाचं “घरटं” भाग-१

Written by

भाग-१

सरिता आणि विवेकच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे सरिता खुप खुश होती. कारणंही तसच काहिस होतं. विवेकने काही दिवसांआधी तिला तिची आवडीची पेैठणी घेण्याचं वचन दिलं होतं.आणि तिला ति साडी आज मिळणार होती.

विवेक झोपेतुन उठला व लगेच आवरु लागला. सरिताला वाटलं त्याला आपल्याला सरप्राईज द्यायचं असेल त्यामुळे त्याने विश पण नाही केलं. तिने सुद्दा काहिच आठवत नसल्याचा आव आणला. व विवेकचा डब्बा भरुन दिला.

विवेक तसा खरोखरंच वाढदिवस विसरला होता. तो घराबाहेर पडला व तेवढ्यांत मित्रांचा फोन आला. मित्रांने शुभेच्छा दिल्या तेव्हा त्याला आठवलं कि आज लग्नाचा वाढदिवस आणि आपण साडी देण्याचं वचन दिलं आहे सरिताला.   तो ऑफिस मधे पोहचला. मनात विचार चालुच होते. वचन तर पुर्ण करायच होतंच परंतु घरखर्च, कर्ज यातच सगळे पेैसे सपले होते.आणि पगारही झाला नव्हता. हातात फक्त जेमतेम रक्कम शिल्लक होती. त्यात पैठणी काय तर साधा पुष्पगुच्छ घेणंदेखील शक्य नव्हतं.

संध्याकाळ झाली. घरी सरिता विवेकची वाट पाहतंच होती. आणि विवेक तेवढ्यांत घरी येतो. सरिता पटकण दार उघडते आणि स्मितहास्य करते. विवेक काहिच न बोलता घरात येतो आणि बोलायला लागतो. ”  सॉरी, सरिता मला माहिती आहे कि मी तुला आज साडी घेण्याचं वचन दिल होतं पण मि ते पुर्ण नाही करु शकत”.
सरिताचा सगळा उत्साह मावळला. आणि ती रुम मधे निघुन गेली. परंतु विवेकला माहिती होतं कि तिचा रुसवा कसा घालवायचा. तो तयारीला लागला.. क्रमशः ।.

लेख कसा वाटला ते नक्की कळवा।

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत