आमावस्येची ती रात्र

Written by
  • #आमावस्येची ती रात्र

आज सकाळी रामभाऊ तापाने फणफणलेले होते ..त्यांची बायको उषा त्यांना उठवायचा खूप प्रयत्न करत होती ..पण ते जागचे हालत पण नव्हते ..सगळेच घाबरले होते…अचानक इतका ताप तो कसा काय?
तर त्याच झालं असं रामभाऊ हे गावातील प्रख्यात किराणा मालाचे व्यापारी ..हे भलंमोठं दुकान होत त्यांचं गावात ,कोणतीही वस्तू तिथे मिळणारच.. अगदी कांदे ,बटाटे, भाजीपाला , काही व्हरायटी चे कपडे पण , अहो भांडी सुद्धा ..त्यांची पहिली पत्नी या जगात नव्हती तिला एक मुलगी होती बाकी घरी पत्नी , 2 मुली , आई अस हे कुटुंब ..गावात त्यांचं पुढे दुकान आणि मागे मोठा चिरेबंदी वाडा ..बाई बाई किती मोठा तो वाडा !!..शिवाय नोकर चाकर होतेच ..
त्यादिवशी अमावस्या होती आणि रामरावांना काही महत्त्वाच्या कामानिमित्त शहरात जावे लागले ..त्यांचा विचार होता आपण रात्री काळोख पडायच्या आत येऊ घरी ..घरचे सगळे नको म्हणत असताना पण रामभाऊ सकाळी सकाळी निघाले ..घरात 2 मोठ्या गाड्या असूनपन त्यांना त्यांची स्कुटरच आवडायची जी इतकी जुनी झाली होती की काही विचारू नका ..कधिपण बंद पडायची ..उषाताई बोलत होत्या ..अहो आज तरी ती मोठी गाडी घेऊन जा की ..पण कसलं काय ..रामभाऊच ते ..कसले ऐकतायेत ..
शहरात जाऊन त्यांची जवळपास सगळीकाम झाली आणि ते घरी निघाले ..निघतानाच एक मित्र भेटला आणि हट्टाने जेवायला आणि मद्यपानासाठी घेऊन गेला ..झालं मग तिथेच 8 वाजले रात्रीचे ..अशी काही काळजी नव्हती कितीजरी घेतली तरी रामभाऊ गाडी बाकी मस्त चालवायचे ..आता रामभाऊनी गाडीला किक मारली पण गाडी चालूच होईना ..मग चोक देऊन देऊन गाडी चालू झाली एकदाची ..आणि त्यातच तिचा सायलेन्सर पण फुटला आणि गाडी मस्त धूर आणि आवाज काढत निघाली ..घरी जायला साधारण दीड तास लागणार होता ..
रामभाऊ मस्त त्या सायलेन्सरच्या म्युसिक मध्ये गाणं गात चालले होते ..मै जिंदगीका साथ निभाता चला गया ..हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया ..आता गावापासून काही अर्धा तासाच्या अंतरावर होते ..पण तो भयाण टप्पा चालू झाला होता ..त्या एका जागेवर आमावस्या पौर्णिमेला अपघात होत असत ..आणि ती व्यक्ती कधीच वाचत नसे म्हणे ..पण रामभाऊ नशेच्या नादात ते वीसरलेच होते ..इतक्यात त्यांना बाजूला एका दगडावर एक बाई बसून रडताना दिसली ..आमचे रामभाऊ खूपच हळवे हो ..त्यांनी गाडी तिच्याजवळ नेली
रामभाऊ : अहो ताई इतक्या रात्रीच काय करताय इथं ? अहो अस बाईमानसाने एकट बसायची जागा नाही ही ..का रडताय तुम्ही ? काय झालं ? कुठं राहता ? मी सोडतो घरी तुम्हाला चला
ती बाई : तिने मान वर केलीच नाही ..मान खाली घालूनच बोलली : मी रस्ता चुकले हो
रामभाऊ : बर मग बसा गाडीवर मी सोडतो तुम्हाला ..कोणच्या गावच्या तुम्ही?
ती : अहो तुम्ही कशाला त्रास घेताय ?नको..मी जाईन
रामभाऊ : अहो नाही म्हणू नका ..चला इथे तुम्ही सुरक्षित नाही आहे हो
ती : तुम्ही खुप चांगले आहात पण नको मी जाईन हो
रामभाऊ : अहो मी काय करणार नाही तुम्हाला ..चला तुम्ही
ती : बघा बरका तुम्हीच तीनदा बोलताय म्हणून येते तुमच्या सोबत नाहीतर लोक मलाच नाव ठेवतात
रामभाऊ : हो चालेल हो चला
त्या बाईचे लांबसडक केस , हिरवीगार साडी ..गोरा गोरापान रंग ..कपाळाला भलं मोठ्ठ कुंकू दिसलं पण नीट चेहरा नाही दिसला ..त्यांनी गाडी चालू केली आणि बाई बसली गाडीवर ..बसताना वाटलं कोणीतरी बसत आहे ..पण तीच काहीच वजन त्यांना जाणवत नव्हतं .त्यांनी गाडी थांबवली आणि विचारलं बाई तुम्ही नीट बसलात ना ?पण त्यांना प्रतिसाद मिळाला च नाही ..आता मात्र त्यांची चांगलीच टरकली..ते तिच्या तावडीत सापडले होते..
हो तिच्या तावडीत..त्या गावात एक तमाशा वाली होती बकुळा नावाची.. अतिशय सुंदर तीच गावच्या पटलावर प्रेम बसलं आणि पाटलांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला पण नंतर ती लग्न करा म्हणून मागे लागली आणि पाटलाची वाट लागली ..मग त्याने तिला त्याच जागेवर यायला सांगितले जिथे ती अत्ता रामभाऊना भेटली ..पाटलांनी सांगितलं तिथे ये मग आपण दोघे गाव सोडून जाऊ मग मी तुझ्याशी लग्न करतो आणि आपण सुखाने संसार करू ..बिचारीला ते खर वाटलं ..ती खूप वेळ तिथेच वाट बघत बसली ..बऱ्याच वेळाने पाटलाचे गुंड तिथे आले ..त्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि मारून तिथेच गाडून टाकले ..तेव्हापासून तीच भूत अमावस्येला म्हणजे ज्या दिवशी तिचा खून झाला त्यादिवशी …तिच्या वेळेत जर कोणी पुरुष तिला सापडला तर तो संपलाच..
आज रामभाऊ तिच्या वेळेत तिला सापडले होते ..पण त्यांनी तिला खूप साफ नजरेने पाहिलं होतं ..मनापासून तिची मदत करण्यासाठी पुढे आले होतें ते तिला समजत होत ..रामभाऊ घाबरून गाडी घेऊन सुसाट निघाले ..तर पुढे काही अंतरावर पुन्हा ती उभी ..रामभाऊनी देवाचा धावा चालू केला …आणि चक्क सुखरुप घरी पोहोचले ..पुन्हा एक आश्चर्य घडलं त्यांना दरदरून घाम फुटला होता काहीच सुधरत नव्हतं ..त्यांनी न वाजवताच दरवाजा उघडला होता घराचा ..आणि कोनाशी काहीच न बोलता ते झोपले होते ..उषा ने तिच्या मुलांना विचारलं रात्री दरवाजा कोणी उघडला ?सगळे बोलले आम्ही नाही ..मग कोण होत ते दरवाजा उघडणार ..आणि हे दरवाजा उघडायच प्रकरण आधी पण खूप वेळा झालं होतं ..त्यांची पहिली पत्नी सुरेखा दरवाजा उघडायची त्यांची …आणि त्या बकुळाच्या तावडीतून पण साहिसलामतपणे घरी आणणारी पण तीच माऊली होती आजूनपन तिच्या अपल्याचं रक्षण करण्यासाठी ती त्यांच्या घरातच होती ..
घरात अधून मधून ती कोणा कोणाला दिसत असे …तिच्या सासूबाईंना , तिच्या मुलीला , त्यांच्या घरात तिनेच आणलेला मोती कुत्रा होता त्याला पण दिसत असावी ती कारण खूप वेळा तो अगदी प्रेमळ नजरेने एकटक कुठेतरी नजर लावून बसायचा …आता रामभाउंचा ताप हळूहळू कमी झाला ..आणि त्यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली .. सगळे गावकरी बोलत होते ..खरच रामभाऊ नशीबवान ..इतक्या वर्षात हाच फक्त वाचला आहे ..बाकीचे सगळे कुठे गायब झाले पत्ताच नाही ..
खरच किती नशीबवान ना ??

©पूनम पिंगळे

Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा