आयुष्याच्या संध्याकाळी..भाग दोन !!

Written by

 जेव्हा माझ्या सासूबाईंना माझ्या अपंग मुलीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी घर डोक्यावर घेतलं..मला नको नको ते बोलल्या..मला घराबाहेर काढायला सुद्धा निघाल्या  होत्या.. पण…तेव्हा….माझा नवरा मध्ये न पडता.. मध्ये दिर मधात पडले …? 

आणि मला सासूबाईंच्या तावडीतून वाचवले..मी फक्त माझ्या   दिरामुळे   त्या घरात राहू शकले..त्यावेळी मी पहिल्यांदा माझ्या दिराच्या डोळ्यात माझ्या बद्दल असलेला आदर, दया बघितली..?

माझे सासरे तर असून नसल्यासारखे असायचे…आणि हे? ह्यांची तर मी बायको होते..तेव्हा का माझ्या बाजूने बोलले नाही? त्यांचं माझ्याबद्दल कोणतेच कर्तव्य नव्हते का?मुलगी फक्त माझ्या एकटीची तर नव्हती ना? पण मी तेव्हा मनाशीच काहीतरी ठरवले आणि डोळे पुसले..? 

त्या नंतर मी माझ्या नवऱ्याशी कोणतेच संबंध ठेवले नाहीत..ते खूप प्रयत्न करायचे माझ्या जवळ येण्याचे..ते ही फक्त शरीरा पर्यंतच..कारण बायकोच्या मनात कसं शिरायचं? हे त्यांना माहीतच नव्हत..त्यांना फक्त माझ्या शरीराची ओढ होती..त्यांचा येण्याचा ‘ तो ‘ ही मार्ग  मी बंद केला होता…?

माझ्या आयुष्यात  फक्त मी आणि माझी मुलगीच उरले होते…दिवस जात होते …माझी मुलगी मोठी होत होती.. माझे दिवस , घरकाम आणि माझी  मुलगी राधाचं संगोपन करण्यात निघून जात होते..?

ती अपंग जरी असली तरी माझी मुलगी होती..काय नव्हत दिलं तिने मला??  आई होण्याचा मान मला प्राप्त झाला होता.. खरंतर , मातृत्वाच्या सुखात मी न्हाऊन निघत होते..मी केवळ तिच्यासाठी जगत होते…माझी लेक..माझी राधा…पण तिच्या जन्मानंतर ….

सासूबाईंनी मला अगदी वाळीत टाकले होते..त्यांनी माझ्याशी बोलणे सोडले..पण त्यांची ती नजर?ती मला घायाळ करायची…

काय नव्हत त्या नजरेत?? एक तुच्छ, हिन भावना? ? मी अडगळीत टाकून दिलेली वस्तू नव्हते..त्यांची सून होते..तरीही इतकी वाईट वागणूक??

पण मी राधा कडे पाहून सगळ सहन करायचे…राधा ३ वर्षांची असताना एका असाध्य आजाराणे ह्यांचं निधन झालं.. ? माझ्या डोळ्यात मात्र ह्यांच्यासाठी अश्रूंचा एक थेंब सुद्धा गळाला नाही..

का ? रडायचं मी ?? एक नवरा म्हणून कोणते कर्तव्य पूर्ण केलेत त्यांनी???

फक्त बायको नावाचं लेबल चिटकवल म्हणजे संसार होतो का ??

पूर्वी त्यांची फक्त नावापुरतीच बायको म्हणून जगत होते……

माझ्या संसाराचा पहिला अध्याय तिथेच संपला.. पण हळू हळू मला जाणवायला लागलं होत की सासूबाई सतत कसल्यातरी विचारात असायच्या.. 

त्यांच्या मनात काहीतरी चालू असायचं…पण एक दिवस …माझे दिर खोलीत आले..त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी माझ्या खोलीत पाय ठेवला होता..

त्या आधी मला आठवत नाही ते कधी माझ्या खोलीत आले असलेले…? मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते..कदाचित त्यांना माझ्याशी काय बोलावं? ते कळत नसावं..

त्यांनी राधा बद्दल विचारले..मी ठीक आहे म्हणून सांगितले..नंतर जरा वेळ ते तिथेच घुटमळले..शेवटी खूप हिम्मत करून त्यांनी त्यांचं मन मोकळ केलं.. 

पण मला त्यांच्या बोलण्यावर विश्वासाचं बसत नव्हता..कदाचित मी जे ऐकलं ते चुकीचं असेल म्हणूनच परत एकदा विचारलं…

तेव्हा ते म्हणाले की माझी सासूबाई माझ्या भासऱ्यांना त्यांना वंशाचा दिवा हवा होता म्हणून माझ्याशी संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत होत्या… 

तेव्हाच मला कळले की सासूबाई ” ह्या ” विचारात असायच्या तर…? हा धक्का माझ्यासाठी पचवणं काय कमी होता? की आणखी एक झटका मला मिळाला…

तो म्हणजे , माझ्या भासर्यांनी जर त्यांचं ऐकलं नाही तर राधाला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली… 

त्यावेळी मी मात्र एकदम निःशब्द! त्यांनाही काय बोलावं कळेचना..ते कितीतरी वेळ त्यांच्याच तंद्रीत होते..मी त्यांची बोलायची वाट बघत होते..त्यांची नजर मात्र शून्यात हरवलेली..

पण माझी मात्र त्यांच्याशी बोलायची हिम्मत सुद्धा होत नव्हती.. ते बऱ्याच वेळानंतर बोलायला लागले…कॉलेजला असताना माझ एका मुलीवर प्रेम होत..ती तशी घरची चांगली आणि दिसायलाही छान होती..

आम्ही लग्न करणार होतो.. तसं मी आईला सांगितलं सुद्धा होत..आईने तेव्हा लग्नाला होकार दिला , हेच माझ्यासाठी खूप होत.. ठरल्या प्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी तिच्याकडे रीतसर मागणी घालायला गेलो तेव्हा..

तेव्हा तिच्या घराला कुलूप होत ! मला आश्चर्य वाटल? ती अशी कशी वागु शकते? आणि मला न सांगता गेली तरी कुठे? माझी अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती..? 

* क्रमशः

? योगिता विजय?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा