आयुष्याच्या संध्याकाळी…भाग एक!!

Written by

मी लक्ष्मी !

वयाची सत्तरी पार केलेली…पण अजूनही आयुष्य जगायचं राहून गेलंय, असंच वाटतंय…? वयाच्या १८ व्या वर्षी लग्नं झाले आणि २ महिन्यातच मी  गरोदर राहिले …?

इतक्या लवकर मला मातृत्व नको होते..मला ह्यांचा नीट स्वभावही कळलेला नव्हता..? हे डॉक्टर होते..२००  लोकांच्या गावात ह्यांचा एकच दवाखाना ! त्यामुळे सतत घरी पेशंट्सची वर्दळ राहायची..?

सासू सासरे , आम्ही दोघे आणि माझे दिर असं माझं कुटुंब! माझ्या दिराने लग्नं नव्हतं केलं,का ? माहीत नाही..ह्यांनी कधी सांगितले नाही आणि मी ही कधी विचारले नाही..?

हे मुळातच अबोल..आम्हा दोघांमध्ये ७ वर्षाचं अंतर ! मला वाटायचं ह्यांनी माझ्याशी मोकळेपणाने बोलावं..मला हवं नको ते बघाव..पण असं कधी व्हायचं नाही..?

ते त्यांच्या कामात आकंठ बुडालेले असायचे आणि मी घरकामात ! सासूबाई सतत माझ्या कामात चुका काढून मला नको ते बोलत राहायच्या..अगदी जीव नकोसा करून टाकायच्या ..?

हे सर्व मी ह्यांना सांगायचा बऱ्याचदा प्रयत्न करायचे..पण ह्यांनी माझं कधी ऐकलचं नाही..

घरात सगळ्यांना मी फक्त काम करायला हवे होते..मी पहाटे चार ला उठायचे आणि रात्री १ ला झोपायचे..  घरात दर चार दिवसांनी पाहुणा हजर असायचा आणि १५ दिवस राहूनच परत जायचा..?

अख्खं घर मी एकटीच सांभाळायचे..सासूबाई कधीच कामात मदत करायच्या नाहीत..कधी कधी वाटायचं इथून पळून जावं …पण माझ्यात तेवढी हिंमतच नव्हती…आणि जाणार तरी कुठे?? माहेरी?? जिथे आधीच ४ बहिणी लग्नाच्या होत्या???

माहेरी गेलेही असते..पण.. माझ्या आई वडिलांनी मला आधार दिला असता का?? मुलींनी शिकून तरी काय करायचं?? ह्या विचारांचे माझे पालक ! फक्त सातवा वर्ग शिकून मला शाळा सोडायला लावली..घरात सर्वात मोठी , त्यामुळे घर कामात निपुण झाले..?

दिसायलाही बऱ्यापैकी …म्हणूनच की काय?? इतकी कमी शिकले असूनही ह्यांनी मला पसंत केले..का?? कशासाठी??  फक्त त्यांच्या वंशाला दिवा आणि बिनपगारी मोलकरीण मिळावी म्हणूनच ना?? ?

मी गरोदर राहिले तेव्हा आणि सातवा  महिना लागला तेव्हा  , माहेरी पत्र पाठवून कळवले होते..

सात महिने पूर्ण होत आले तेव्हा माझे बाबा मला घ्यायला सुद्धा आले होते…पण माझ्या सासूबाईंनी मला जाऊ दिलं नाही..मी माहेरी गेल्या नंतर घरातली कामे कोण करणार म्हणून माझ्या बाबांना उलट प्रश्न केला ?? ?

बाबा त्यावर काहीच बोलले नाहीत पण त्यांच्या डोळ्यातून माझ्यासाठी दोन अश्रू मात्र पडले..?आणि तसेच आल्या पावली परत गेले..बाबा गेल्या नंतर मी खूप रडले..पण माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंना त्या घरात कवडीचीही किंमत नव्हती..?

बाबांचं न बोलण्याच कारणही मला माहित होत.. माझे लग्नं ठरले तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझ्या बाबांना एक अट घातली होती की लग्नानंतर माझ्या  माहेरी कायमचा संबंध तुटेल…?

माझे आई – बाबा त्यांच्या अटी पुढे हतबल झालेत.. एकतर इतक्या श्रीमंत घरातून मला मागणी आलेली.. त्या घरात जाऊन माझं नशीब उजळून निघेल ..ह्या अपेक्षेने आई बाबांनी त्यांची अट मान्य केली..?

त्या दिवशी घरात कुणीच जेवले नाही..एक उदासीनता घरात भरून गेलेली..मला काय करावं? सुचेना..मी जर तेव्हाच लग्नाला नाही म्हणाले असते तर?? माझे आयुष्य कसे असते?? आता हे सगळे आठवले की हसूही येत आणि खूप रडावसं ही वाटतं..?

कारण लग्नानंतर माझे आयुष्यच बदलून गेले..?
श्रीमंती आणि गरिबीच्या मधात मी मात्र अडकून गेले..मला कायमचं माहेर दुरावले..मला कधीच श्रीमंती नको होती..मला फक्त  दोन वेळचं जेवण आणि  माझ्यावर भरभरून प्रेम करणारा नवरा हवा होता..?

प्रेमाने , मायेने जपणारी  घरातली  माणसे हवी होती..पण लग्नानंतर मी प्रेमाचा अर्थचं विसरून गेले..फक्त चार भिंतींनी घर उभे राहत नसत..त्यासाठी घरात प्रेमळ माणसं असावी लागतात..सुख समाधान हवे असते..? घरातली लक्ष्मी आनंदी असावी लागते..?

पण…त्या घरात माझ्या मनाचा विचार करणार कुणीच नव्हत..जीव गुदमरून जायचा माझा!..गरोदर असूनही मी सतत दडपणाखाली आणि उदास राहायचे..? त्याचाच परिणाम की काय?? मला मुलगी झाली  तीही अपंग..हे मला ६ महिन्यांनी कळाले…तिची हालचाल इतर मुलांसारखी सामान्य नसायची…?

हे जेव्हा माझ्या सासूच्या लक्षात आले तेव्हा…..

*  लक्ष्मीच्या आयुष्यात पूर्वी काय झाले होते ?? हे जाणून घेण्यासाठी…भेटू पुढच्या भागात! तोपर्यंत stay tuned…?

१९/६/१९

? योगिता विजय ?


Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा