“आयुष्य एवढं स्वस्त झालंय का???”©दिप्ती अजमीरे

Written by

आयुष्य एवढं स्वस्त झालंय का???

आजकाल गूगल आणि youtube मुळे इतकी प्रगती झाली आहे की आपल्याला काहीही अडलं की आपण लगेच google किंवा youtube वर बघतो आणि काम फत्ते करतो…
त्यातच भर आहे facebook आणि whatsapp ची…

कुठलीही माहिती कितीही वेळा कोणालाही फॉरवर्ड करता येण्याची सोय… त्यामुळे पाहायलाच नको…

पण कोणी कधी विचार केला असेल का की खरच youtube मूळे कधी आपला जीव पण धोक्यात येईल??? श्यक्यता नाहीच…..

खरं तर तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे तरी सुद्धा सद्सद्विवेक वापरून कुठलीही कृती करावी असे माझे मत आहे…

मी एक न्युज बघितली त्यावर आधारित ही गोष्ट(काल्पनिक)…

रक्षा ही आपल्यासारखीच…

शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे तिचे स्वप्न होते…

हुशार होती त्यामुळे स्वतःच्या शिक्षणाच्या पंखातले बळ अजमावण्यास ती स्वप्नांच्या आकाशात झेप घेण्यास उत्सुक होती…

घरची परिस्थिती ही बऱ्यापैकी होती… आपल्या मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनी मोठया मनाने तिला बाहेरगावी राहण्यास परवानगी दिली…

ती शहरात आली..
Competitive exam द्यायची होती… त्यासाठी रक्षा ने classes जॉईन केले…

रूम घेतली आणि आपल्या मैत्रिणींसह ती राहू लागली…

तिला काहीही प्रॉब्लेम आला की ती प्रथम google मामा ला questions विचारी… तो तिला प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन तिचं मार्गदर्शन करीत असे… आणि youtube तिला अनेक प्रात्यक्षिके ही दाखवत असे..

त्यामुळे तिला कधी अस वाटलंच नाही की आपल्याला काही जमणार नाही…
काहीही घ्यायचं असेल, कुठे जायचे असेल,

काही पदार्थ बनवायचे असेल, कुठले सामान लागेल ही सगळी माहिती तिला google मामा आणि youtube काकी देत असे…

मग ती आयुष्यातली असो किंवा अभ्यासातली…

कोणी असो नसो facebook आणि whatsapp सोबतीला होतंच…

तिला आपलं life खूप easy वाटत गेलं…
सुरुवातीला classes आणि रूम एवढंच तीच विश्व होतं… अभ्यास ही सुरू होता…

पण हळूहळू शहरातील चमक तिला दिसू लागली… ती नकळत त्या मोहात पडू लागली झुरू लागली…
पण करणार काय???

घरून classes आणि गरजेपुरते पैसे तिला मिळत असें… त्यामुळे फार हौसमौज न करता तिला राहवं लागे…
शहरातली चमक तिला स्वस्थ बसू देईना…

अनेक वेळा तिने मनाला समजावलं पण ‘मन हे बावरे’ म्हणतात ना तसेच काहीसे झाले…

अशातच तिची श्याम शी ओळख झाली…

Facebook वर तिला friend request आली…

तिने त्याचे profile चेक केले…

फोटो बघितले …

कुठेतरी बघितल्यासारखे वाटले पण ओळख नसल्यामुळे तिने friend request accept केली नाही…

मग एक दोनदा batch मधल्या मुलांसोबत तो दिसल्यावर तिला कळलं की हाच तो ज्याने आपल्याला fb वर request पाठवली…

हळूहळू त्यांची ओळख झाली… बोलणं सुरू झालं…

आता facebook आणि whatsapp वर बोलणं ही सुरू झालं होतं…

त्यामुळे रूम वर मैत्रिणी असो किंवा नसो… ती तिच्याच विश्वात राहत होती…

ती श्याम सोबत वेळ घालवू लागली…

हळूहळू ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं…

फिरणे-खाणे-मित्रमैत्रिणी यांच्यातच तिचा वेळ जाऊ लागला…

श्याम ने पण तिला आपल्यात एवढं गुंतवून घेतलं की ती स्वतःला खूप भाग्यवान समजायला लागली…
ते दोघे प्रेमात अगदी वाहत होते…

अगदी स्वप्नतल्या सारखे तिला जग भासू लागली…
हाच तो श्याम मुरली मनोहर माझा… असंच रक्षाला वाटू लागले…

स्वतःचं स्वप्न पार मागे टाकून ती कशी श्याम ला समर्पित झाली तिचे तिलाच कळले नाही…

कधी ती त्याच्या एवढ्या प्रेमात पडली की तिला स्वतःच सुद्धा भान उरले नाही…

डोळ्यांवर जणू पट्टी च होती…

दोन दिवसांपासून पोट दुखत होतं म्हणून ती श्याम ला भेटू शकली नाही… रूमवर झोपूनच होती… पण त्रास वाढला म्हणून डॉक्टरकडे गेली तर तिथे कळले ती प्रेग्नन्ट आहे…

अचानक चपराक बसावी आणि गालांवर वळ उठावे असं काहीसं रक्षाचं झालं…

तिला काही सुचत नव्हते…

तिने श्याम ला फोन लावला पण switched off येत होता…

आपल्या कडून किती मोठी चूक झाली हे कळून चुकले…
गेल्या दोन दिवसांत श्याम ने एक फोन ही केला नव्हता की मेसेज सुद्धा केला नव्हता…

नावाशिवाय त्याच्याबद्दल काहीही माहिती ही नव्हती रक्षाकडे…

“क्लास मध्ये तर तो कधीच दिसला नाही… बाहेर क्लास झाल्यावर मुलांसोबत दिसायचा… म्हणजे तो क्लास मधला नाही???”

आता रक्षा ला सगळं स्पष्ट स्पष्ट दिसू लागले होते… डोळ्यांवर चढलेला प्रेमाचा रंगीबेरंगी goggle उतरला होता…
काय करावे काहीच कळत नव्हते…

घरी कोणाला सांगितलं तर आपल्यालाच फोडून काढेल याची ही खात्री होती…

तिने अनेकदा श्यामशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ च…

क्लास मधल्या मुलांना त्याबद्दल विचारले पण श्याम नावाचा मुलगा नाही एवढंच कळलं…

म्हणजे इथेही ती फसली होती…

रूम वर येऊन ती नको नको ते विचार करू लागली… सतत फोनवर बोटं फिरू लागली पण जीवाला चैन पडत नव्हती…

एक मन म्हणे की घरी सांग… तर कधी वाटे की श्याम येईल परत… तो असा सोडून नाही जाणार … तर कधी आता समाज, नातेवाईक, घर, बहीण-भाऊ डोळ्यासमोर येऊ लागले…

तिने google search केलं… तिने अनेक घरगुती उपाय बघितले जेणेकरून तिला यातून सुटका मिळेल पण अनेक उपाय करूनही खास फायदा झाला नाही…

नंतर नाईलाजाने तिने घरी सांगितले…

अविवाहित वरून प्रेग्नन्ट…  मग काय समाजाची भीती, चार लोक काय बोलतील, इज्जत, समाज, मान-मर्यादा सगळं धुळीस मिळवलं…

घरच्यांशी वाद झाल्यावर सगळा दोष तिच्यावर आला…
आई ने तिला abortion करण्यासाठी सांगितले पण आता वेळ निघून गेली होती…

ती सुद्धा आता खूप थकली होती…

खरं तर तिला मायेची आणि आधाराची गरज होती…

रक्षा आणि तिच्या आईवडिलांनी साधी तक्रार ही केली नव्हती पोलीस स्टेशन ला समाजाच्या भीतीपायी, लोकलाजेस्तव…

रक्षा ने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला… म्हणून घर सोडून परत ती शहरात आली… भाड्याने राहू लागली…

कोणाला काही कळू नये म्हणून सतत रूम change करू लागली…

दिवस भरत आले…

Google आणि youtube वरून बरीच माहिती तिने मिळवली…

हॉस्पिटल मधला खर्च तिला परवडणारा नव्हता… घरच्यांनीही हात काढून घेतले होते… त्यामुळे ती एकटी च होती या प्रवासात…

ज्यानी हे मातृत्व लादलं होतं तो तर कधीच सोडून गेला होता त्याला जे हवं होतं ते लुबाडून…

रक्षा मात्र श्यामची वाट पाहत होती तिचं मन तिला सतत सांगे की एक दिवस श्याम नक्की येईल…

 दिवस भरत गेले…

रक्षा youtube वर अनेक videos बघत होती…
delivery कशी होते?? , घरच्या घरी कशी करायची??, Emergency मध्ये बाळाला जन्म कसा देतात ?? 

याबद्दल तिने अनेक videos youtube वर चाळले…

ती तिच्या आयुष्यातले सगळ्यांत कठीण दिवस आनंदाचे-दुःखाचे, मिश्र भावनांचे, एकटेपणाचे कसेतरी काढू लागली…
तिने परत रूम change केली…

Owner ला आधार कार्ड details ही दिले… आई येणार ३-४ दिवसांतच असे सांगून ती तिथे राहू लागली…

तो दिवस आला ज्यासाठी तिने सगळ्यांत काटेरी वाट निवडली होती…

Delivery साठी लागणारे सर्व साहित्य तिने गोळा केले होते…

ती आज रूम मधून बाहेर आलीच नाही… तिची तयारी होती ती , स्वतःची delivery स्वतः करायची…

youtube वर बघत ती सगळं करत होती…

वेदना कळ सोसत youtube वर video बघत ती बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न करत होती…

त्रास तर होत होता…  पण सांगणार कोणाला???

जिथे आई आणि श्याम दोघेही हवे होते तिथे ती एकटीच सगळ्या वेदना सहन करत स्वतःलाच आधार देत होती…
अचानक काय झालं तिला कळलं नाही…

त्रास वाढला बाळ जन्माला आला पण रक्तस्त्राव वाढला…

आणि ती….

ती आणि बाळ दोघंही हे जग सोडून गेले…

रक्ताच्या थारोळ्यात दोघेही निपचित पडून होते…

समाप्त….

रक्ताचा लोट जेव्हा रूम मधून बाहेर आला तेव्हा सगळ्यांना हा प्रकार कळला…

पोलीस पंचनामा, पोस्टमार्टेम सगळं झालं पण जीव परत नाही आला…

पण खरंच तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी आयुष्य आपण पणाला लावू शकतो का???

आयुष्य एवढं स्वस्त झालंय का??

प्रेम करणे चुकीचे नाही पण चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत आपलं आयुष्य पणाला लावणे चूक नाही का??

Youtube आणि google वर सगळं ज्ञान मिळत असेल तर degree, कॉलेज, शिक्षण, हॉस्पिटल, मेडिकल, डॉक्टर यांची काय गरज राहील???
Technology चा उपयोग सारासार विचार न करता वागणे चुकीचे नाही का??
Google आणि Youtube च्या आहारी जाणे हे चुकीचे नाही का??

Technology, internet च वापर करा पण जरा जपून….
विचार करा…

चित्र आभार गूगल…

(शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात…. तुमच्या प्रतिक्रिया आणि suggestions नक्की आवडेल… कथा आवडल्यास like आणि share करायला आणि comments द्यायला विसरू नका…😂)

—दिप्ती अजमीरे.

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.