आरोग्यम धनसंपदा..( खावुन खावुन संपवा)

Written by

  

    सासऱ्याचे पोट नव्वा महीना… भासऱ्याचे पोट सातवा महीना… नवऱ्याचे पोट पाचवा महीना… ???

आणि माझे वजन ४९ किलो… ??

     हो बरोबर वाचताय तुम्ही…  लग्नाच्या वेळेला माझे वजन ४९ किलो होते… आल्या आल्या मला टेंशनच आले.. हे काय कोणालाच आरोग्याची चिंता नाही… आरोग्यम धनसंपदा….. कि आरोग्य खावुन खावुन संपवा अगदी असच…  खाण्यापिण्याच्या सवयी सगळया आरोग्याला हानीकारक अश्याच… 

       आठवड्यातुन एकदा गोड केलच पहिजे… पुरण टाकल की आठवड्याभर पाहायच काम नाही… खाणारे इनीमिनी सहा लोक पण चार शेर पुरण शिजलच पाहिजे.. मग काय…!  खा रोज़ एक एक पोळी दाबुन… वाटी वाटी तुपात एक एक तुकडा बुडवुन बुडवुन आठवड्याभर… बासुंदीच तर सोडुनच दया… गोडात गोड चार पट गोड अशी… 

बर एख़ाद वेळेस नाहीच केल तर Haldiram’s आहेच जिंदाबाद… रसगुल्ला, चमचम,  रबडी, रसमलाई घरात दोन तीन दिवसा आड पाहुण्या बनुन यायच्याच… ? गोड खाण्यात सगळे शेराला सव्वाशेर असेच…

            नाश्ता असा कि जेवणालाही लाजवेल… चना / मटकीची उसळ केली की मस्त दोन दोन- तीन तीन प्लेट तेच…  ऑमलेट केली तर छान २-३ अंडयांची खाल्लीच पहिजे.. पराठे केलेत तर एक एक जण दोन दोन खाईल… ईडली आणि डोसे सोडुनचदा आपण करताच करा आणि सगळे खाताच खातील… ? बर एवढ खाल्ल्या नंतर भला माणुस जेवेल काय…?  नाही ना…?   पण यांच तस नव्हत ना… हे ही आणि ते ही.. म्हणजे करणाऱ्याच मरण निश्चितच….?

       त्यातल्या त्यात शुद्ध मांसाहारी.. रविवार रिकामा जाता कामा नये… म्हणजे एक किलो लागेल तर त्याऐवजी दिढ किलो भाजी आणायची आणि उरलेली फ्रिजमध्ये ठेवुन मग ती मस्त दुसऱ्या दिवशी जमवायची.. ? मग मध्ये बुधवार येतोच… आपला आवडता बाजाराचा दिवस.. त्या दिवशी कधी मासोळी तर कधी झिंगे….?भाज्या अस्सल तरीच्या पाव किलो तेल एका एका प्लेट मध्ये तरंगायच….

    आठवड्यातन एकदा पालक पूरी तर कधी साधी पूरी… कधी पापड… तर अगदी सासऱ्यांचा जिव कि प्राण असलेले आलु बोंडे… ? म्हणजे १२*७ बारा महीने सातही दिवस Food Festival असायचा… 

    आsssssss ह्न्न्न्न्न्न्न्न्न्न पिक्चर अभी बाक़ी है मेरे दोस्त….?

        सासऱ्यांना High BP… नेहमी १७० – ११०…. ? सासुबाईंना High suger… नेहमी २५०-१६० …?भासऱ्यांना साॅंडेलायटीस… त्यात भर घालणारा ओबेसीटी चा वेगळा त्रास ?आणि आमचे हे… hard core बिरयानीचे fan… अर्ध्या रात्रीही दिली तरी चटकण खायला बसतील… अस खावुन खावुन मस्त highper acidity ?ने त्रस्त..  अज़ुन दुधात साखर म्हणजे कोणालाही फ़िरण्याची….व्यायामाची आवड नाही.. बस खावो ऐश करो… ☹️

        प्रत्येक जण कोणत्यानकोणत्या आजाराने त्रस्त आणि ग्रस्त पण तरीही खाण्यापिण्यावर एक कहिही नियंत्रण नाही… 

    बर ते जावु दया…. मी एवढ्या आपल्या ४९ किलो वजनाच्या बोंबा शेकणारी लग्नाच्या सहा महिन्यानंतर ७२ किलो…? 

          लहानपणी पासन परीचयाची लोक मला ओळखे ना… ?  सगळयांसाठी माझ वजनदार होण हे एक नवलच होत… 

       सासरच्या उलट माझ माहेर होत… माझी आई एकदम शिष्तप्रिय डायट follow करणारी.. तेलकट-तुपकट-मांसाहार वर्ज… आजाराची चाहुल ही घरात नव्हती… रोज़ फिरणे, योगा, व्यायाम, दुधीचा रस, हिरव्या पालेभाज्या, ऋतुजन्य फळांचे सेवन, दुग्ध पदार्थ सगळयांचा समावेश असायचा… त्यामुळे वजनाचा काटा constant एकाच जागी ठबकुन बसायचा… 

     ईकडे आल्या आल्या सगळच पालथ झाल… सुरवातीला style म्हणुन मी खुप डायट follow करण्याचा प्रयत्न केला पण मग पडली ना तोंड घाशी… ?? “अग खावुन घे ना….!!!! एका दिवसानी कोणत तुझ वजन वाढतय… ??? घे की… छान झाल आहे… उद्यापासन follow कर तुझ डायट बियट”… अस म्हणुन म्हणुन मलाही स्वतःच्या रांगेत येवुन उभे केल… 

          मला हव्या नको त्या सगळया सवयी चटकण… वेताळुन गेल्या…. जिभेचे चोचले पुर्ण करता करता माझ शरीराला टाचणी टोचली की फुटेल अस झाले होते… फक्त खाणे पिणे आणि फक्त खाणे असाच programme असायचा बाक़ी व्यायाम – फिरणे या गोष्टींना किंमतच नव्हती…

मला बघुन माझे बाबा जाम नाख़ुश होते… ?

         “ हे काय तुला अजिबात आरोग्याची काळजी राहिलेली नाही.. याचे खुप विपरीत परिणाम होतील.. तु सगळयांना सावरायच सोडुन स्वतःलाही त्या प्रवाहात वाहुन घेतल…. अज़ुनही वेळ गेली नाही… कामाला लागा….. व्यायाम वगैरे कर”…. 

    ते मी माहेरी गेली की हे वाक्य बोल्ल्या शिवाय नाही राहायचे…

   मैत्रीनी पण नेहमी रागवायच्या…

“ बस तु खा खा के अपनी खुबसुरती खो डाल… कुछ तो खयाल कर अभी उमर ही क्या है… ईन सबके लिए… अभी तो खुद को सवारने के दिन है और तु गवा रही है”…. ऐकुन डोकच खराब व्हायच..?

       

       पण खरच होत… कमी वजनामुळे नाज़ुक दिसणार माझ सौंदर्य आता विरत चालल होत…

      “अब्बा जब्बा डब्बा”… होवुन गेली होती.. ना साडीत धड दिसायची ना ड्रेस मध्ये”… आरसा बघीतला की तो ही हसतोय की काय माझ्यावर अस वाटायला लागल होत… पण सासरची मंडळी मात्र मोठया गर्वाने म्हणायची “आता छान खाते पिते घर ची दिसतेस नाही तर होतीस सुकडा माय”…..

     एकदा एका लग्नाला गेलो मस्त DJ सुरु होता… नाही म्हणता म्हणता मलाही नाचण्यास ओढल… तशी मला हौस होतीच… मग काय केली मी सुरवात… अवध्या पाचच मिनटातच मला धाप लागली… घामाचक्कड झाली… जिव घाबरु लागला… श्वास लागला… घस्याला कोरड पडली… आणि चक्क डोक फिरायला लागल.. लगेच येवुन बसली… पाणी वगैरे पिऊन थोडी विश्रांती घेतली… पण हे सगळ माझ्या साठी धक्कादायकच होत. दोन दोन तास डांसची प्रॅक़्टीस करणारी मी अवघ्या ५-१० मिनटातच फस्त झाली.. खरच टेंशन आल होत मला…. 

         दुसऱ्याच दिवशी डाॅक्टरचा मार्ग गाठला… मैत्रीनच होती माझी… ४९ किलो ते ७२ किलो चा रमणीय प्रवास तिच्या पुढे वर्णीला …? ती जाम चिडली माझ्यावर… तिने सगळया टेस्ट केल्या… माझ्या शरीराप्रमाणे सगळच मस्त वाढलेल होत… पण काळजी करण्याची गरज नव्हती… तिने proper diet plan दिला आणि follow करायला लावला… 

    मग काय लागली ना मी कामाला पण यावेळेला मी एकटीच सगळी मेहनत करणार नव्हती… माझ्या या खडतर प्रवासात मी त्यांचा ही समावेश करुन घेतला जे मला वजनदार बनवण्यास कारणीभुत होते… ?

      एका काठुन सगळयांचा diet chart बनला…तो ही अगदी कडक… ?

    सगळयांनी निमुटपणे होकारही दिला… 

           पहिल्याच दिवशी अर्ध्या तासापासन व्यायाम करायला सुरवात झाली… मग हळुहळु वेळ वाढवायचा….ज्याला जिथे आणि जसा करायचा आहे तस करा पण अर्धा तास करायचाच… नाश्त्यात फक्त ज्यूस किंवा फळ….भाज्या फक्त पाले भाज्या…  त्यातही तेल फक्त छोटे २ चमचे…. दोनच चपात्या… भाताला टाटा बाय बाय…… भरपुर सॅलेड… दही…. संध्याकाळी ७ ला जेवण… मग शतपावली आणि भरपुर पाणी… ?

     मांसाहार, तेलकट-तुपकट पदार्थ, Haldiram’s चे जिव घेणे products, गोड शर्करायुक्त सगळया पदार्थांना सध्या तरी राम राम ठोकला… ??

    जस सांगीतलेल आहे  खरच सेम तसाच diet follow करुन जवळपास आम्ही सगळयांनी दोन महिन्यात ५ ते ७ किलो वजन कमी केल आणि शरीरही energetic वाटु लागल.. ??

        आम्ही सगळयांनी स्वतःला वेळीच सावरल… आता सगळे एकदम फिट आहेत… हव तेव्हाच सणावाराला गोड धोड होत… तेही मोजकच… मांसाहार अगदीच कमी झालाय… महिन्यात एकदाच… जेवढया जमेल तेवढ्या प्रमाणात कमी तेलाच्या भाज्या बनविने सुरु आहे… व्यायामाला No सुट्टि… असाच रुटीन सुरु आहे… 

      आता माझे वजन ५६ किलो झाले आहे…  मी आणि माझे आरोग्य जवळपास खडयात पडता पडता वाचले… लट्ठ होणे… गुटगुटीत दिसणे… सुदृढ दिसणे… हे एकीकडे असत… आणि…. महत्वाच म्हणजे फ़ार सोप ही असत… पण त्याच्या चार पट कठीण असत निरोगी आणि वजन आटोक्यात ठेवुन शरीर आजरमुक्त ठेवणे.. खाल्ल की जिभेला चव लागतेच पण आरोग्य ढासळत.. जिभेची चव आणि आरोग्य याचा समतोल राखणे आजच्या युगात फार गरजेचे आहे नाही तर नको ते आजार आपला समतोल बिघडवितात…

     हा माझ्या आयुष्याचा एक मजेदार क़िस्सा होता… पण मैत्रीनींनो तुमच्या सोबत अस अजिबात होता कामा नये… आपल आरोग्य हे आपल्याच हाती असत त्याला जपन आपल पहिल कर्तव्य आहे…

     म्हणुनच आरोग्यम धनसंपदा…. त्याला अजिबात खावुन खावुन नको संपवा…?

       

लेख आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा… 

 

शुद्धलेखनाच्या चुकांना कृपया माफी द्यावी…. ??

धन्यवाद…!

©️अश्विनी दुरगकर ?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत