आवडतं मला!

Written by

आवडतं मला,
स्वतःवरच निस्वार्थ प्रेम करायला,
स्वत:लाच भेटण्यासाठी तासंतास झुरायला.
माझ्यातील मला नव्याने भेटायला.

आवडतं मला,
स्वतःचीच प्रेयसी होऊन स्वतःतच रममाण व्हायला,
स्वतःशीच भांडून स्वत:वरच चिडायला,
आणि पुन्हा स्वतःचाच रुसवा घालवायला.

आवडतं मला,
स्वतःचीच सखी होऊन स्वतःलाच साथ द्यायला,
स्वतःवरच जळुन स्वतःचाच तिरस्कार करायला,
आणि पुन्हा स्वतःलाच हळुवार मिठीत घ्यायला.

आवडतं मला
स्वतःचाच गोड-गोड कौतुक करायला,
स्वतःलाच छळ-छळ छळायला,
आणि पुन्हा स्वतःलाच लाडीकपणे गोंजारायला.

आवडतं मला,
स्वतःवर निस्वार्थ प्रेम करायला,
माझंच माझ्याशी नवीन नातं जोडायला,
स्वतःच्याच मनात स्वत:ला जपायला.
मनातल्या झुल्यावर अलगद झुलायला.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत