आ ओ हुजूर तुम को

Written by

आ ओ हुजूर तुम को…(प्रेमकथा)

सरीताला जाग आली. डोळे उघडले तर अविनाश हातावर डोकं ठेवून तिच्याकडेच पाहत होता. “किती वाजले? अलार्म झाला नाही का?? बाप रे आता उशीर होईल.” सरु अंगावरची रजई बाजूला सारत म्हणाली. “सहा वाजलेत. काही उशीर नाही होतं.” असं म्हणतं अविने ऊठू पाहणाऱ्या सरुला स्वतः जवळ ओढली. त्याच्या अशा अचानक वागण्यानं तिला ही काही सुचलं नाही….इतक्यात तिच्या कपाळावर ओठ टेकवून “राणी वाढदिवस आहे तुझा… छान शुभेच्छा तर देऊ देत.”
” रात्री दिल्यास की बारा वाजता यथेच्छ. त्या पोचल्या…..आता आगाऊपणा बंद कर आणि आवरून खाली ये…. सगळ्यांना बोलावलं आहेस. मुलं कालपासूनच आलेली आहेत बाकीचेही सगळे यायला लागतील इतक्यात. मला पण आवरायला हवं लवकर.”

तिचा हात हातात घेऊन त्याने हलकासा दाबला “थांब ना थोडा वेळ” म्हणत बसवलं पुन्हा. तिने तोंड त्याच्या कानाजवळ नेत ” पन्नाशीची झाले आता मी. किती छळशील. सोड. जाऊ देत मला.” म्हणत स्वतः ची सुटका करून घेतली आणि पळतच दरवाजा उघडला. एक डोळा बारीक करून म्हणाली “आवर आता. भेटू रात्री….” ..अरे व्वा स्वतःहून म्हणाली म्हणजे चान्सेस आहेत…अवि मनाशी हसला…

सरु दार उघडून बाहेर गेली तर सगळी चिल्लीपिल्ली दारात. हातात बुके. “हँप्पी बर्थडे काकी, हँप्पी बर्थडे मामी, हँप्पी बर्थडे आत्या” Thank you my all lovely baccha party…. तेवढ्यात लग्न झालेली पुतणी सीमा आली. “काय काका, काकीचे गाल इतके लाल का दिसताहेत??”…” आं??हां??”.. अवि दचकला. ही सीमा पण ना….उगाच घाबरवते सकाळी सकाळीच…. सरीता तिचा हात धरून निघून गेली खाली…

सरु किती छान दिसते अजून. पन्नाशीच्या झाल्यात madam पण वाटतच नाही. केसांचा यु कट… रुळणाऱ्या केसांच्या झुबक्याखाली मानेवर काढलेला tatto तर हल्ली weak point झालाय आपला… ओठच टेकवतो आपण पटकन त्यावर….अजूनही जीव गुंततो तिच्यात. नवीन लग्न झाल्यासारखे आपण किती मागे मागे करतो हिच्या… तिला ही कदर आहे आपली. झोकून देते स्वतःला… गुंतू देते मलाही स्वतःत.

तो भुतकाळात शिरत आपलं एक एक काम यंत्रवत करत होता.

सरीता आणि अविनाशचा प्रेमविवाह. सरुच्या घरुन कडाडून विरोध. फक्त जातच नाही तर कम्युनिटीही वेगळी. ती महाराष्ट्रीयन ब्राम्हण तर तो भैय्या. खातंपितं घर त्याचं. Automobile चा डिप्लोमा होल्डर तो आणि ती पोस्ट ग्रँज्युएट. चांगल्या परिपक्व वयातलं प्रेम. खरंखोटं, बरंवाईट नक्कीच कळत होतं. तिच्या घरीही गेलो आपण. मागणीही घातली. तिच्या घरच्यांनी काही दाद दिली नाही. खुप धडपडलो त्यांचा होकार मिळावा म्हणून.

माझ्या घरून काही विरोध नव्हता. वाटतं होतं तिच्या घरच्यांनी समजून घ्यावं. एका संध्याकाळी भेटायला बोलावलं तिला. तिच्या घरच्यांच्या बाबतीत बोललो ‘काय करुया?’ घरून विरोध आहे तर. थांबायचं का अजून थोडे दिवस? काय वाटतं तुला? आपण पुढे जायचं की थांबायचं इथे? तुला काही त्रास होणार असेल तर मला नाही चालणार. तु म्हणशील तसं करु. तुझा निर्णय मला मान्य असेल. खुप वेळ गप्प असणारी ती माझ्याकडे पाहून म्हणाली. “तुझं प्रेम आहे ना माझ्यावर??”….” हो..”—–” माझ्यासाठी काय करू शकतोस??”—- “काहीही. फक्त तु बोल”—- “मग माझ्या घरच्यांच्या मागे लागणं बंद कर. रजिस्टर लग्न करुया.” “नक्की ?? जमेल तुला माझ्या सोबत यायला?? सगळ्यांना सोडून ?? आईबाबा, भाऊ ??? सगळे विरोधात आहेत. कदाचित नातही तोडतील कायमच.'”
———————————

” माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझं ही आहेच की माझ्यावर प्रेम. काय करणार घरचे ऐकत नाहीत तर. तुटतील नाती बहुधा. पण राजा, तु आहेस ना माझ्यासोबत मग मला भिती नाही कशाची.”….. बापरे! किती विश्वास आहे ह्या पोरीचा आपल्यावर. तिच्या हाताला धरून पटकन छातीशी धरली. कपाळावर ओठ टेकवतं ‘माझं जगणं फक्त तुझ्याचसाठी असेल’ सांगितले तिला. तेव्हाच ठरवलं काही झालं तरी हिला दुःखी होऊ द्यायचं नाही. हाताच्या घट्ट मिठीत तिही सामावली बराच वेळ.

एका महिन्यात लग्न झालं. मित्रमैत्रिणी होत्या लग्नाला. तिच्या घरून कोणी ही नाही. माझ्या घरी तिचं छान स्वागत झालं. आमच्या एकत्र कुटुंबात सामावली गेली. एकांत मिळणं जरा कठीण होतं. कुटुंब मोठ होतं. माझ्या नाराजीला एखाद्या सुंदर सकाळीही भेट मिळायची कोणी घरी नसताना. मिलनाच्या वेळी एका गडबडीत माझ्याकडून झालेल्या वेदनेसह तिच्या तोंडून उसाशासहित ‘रावण’ हे नाव मिळालं. आता गडबड नाही होतं पण नाव मात्र मिरवतोय गेली पंचवीस वर्षे ‘रावण’. तिच्या मैत्रीणीही “रावण आहे का” असंच विचारतात.

आपला दिवस तिच्यापासून सुरु होतो संपतोही तिच्या सोबत. आपलं अख्खं विश्व बनून राहिलीय ती. ज्या क्षणी आयुष्यात आली त्या क्षणाचे आभार मानायला हवेतं. माझ्या माणसांमध्ये मिसळताना तिची माणसं दुरावली तिला. दिवस कामात निघून जायचा पण रात्रीच्या शांततेत माहेर आठवायचं तिला. खंबीर मनाची कमजोर बाजू हमसून हमसून रडताना जाणवायची. आपल्यामुळे, आपल्या प्रेमामुळेच तिला हे भोगावं लागतं याचं वाईटही वाटायचं.. कितीदा बोलूनही दाखवलं आपण तिला. पण ‘रडून मोकळं व्हायला होतं. तु नको तुझ्यावर घेऊस.’ असं म्हणतं कुशीत शिरायची मग आपण काही चुकीचे नाही केलयं याचं समाधान वाटायचं. जीव तुटायचा तिच्या रडण्याने. सगळं विसरून तिच्या घरच्यांना भेटुन सांगितले ही, निदान मुलीसाठी तरी घरी या. त्यांच्या द्रुष्टीने रजिस्टर लग्न म्हणजे पळून जाऊन केलेलं लग्न. नाईलाज होता.

घरी सगळं मस्त चाललेलं. मोठ्या भावाला बरीच वर्षे मुलबाळ नाही. त्यामुळे सगळ्यांच्या आशा आमच्या लग्नाने पल्लवीत झालेल्या. आम्ही ही मग त्यांचं मनावर घेतलं.
———————————-
लग्नाच्या एक वर्षाने डॉली झाली. डॉली तीन वर्षांची झाली. पुन्हा दुसऱ्या बाळाची चाहूल. अजून एक परी आयुष्यात. बास्स झालं आता चौकोनी कुटुंब. सगळं छान चाललं होतं पण म्हणतात ना तशी नजर लागली कोणाची तरी. दीड वर्षाच्या परीला जीवघेण्या आजाराने हिरावून नेलं. आभाळ कोसळलं. दोघेही हादरलो. मला एका क्षणी मनात वाटूनही गेलं, हिच्या आईबाबांना दुखावलं म्हणून तर नाही ना आपल्या काळजाचा तुकडा हिरावला गेला. तिलाही ते कळलं. म्हणाली तु वाईट नको वाटून घेऊस. कदाचित परीला आपण आईवडील म्हणून आवडले नसू. म्हणून सोडून गेली आपल्याला. परीच्या आजारपणात आणि नंतरही तिचं खंबीर असणं सावरून गेलं मला. स्त्रियांना परमेश्वराने एक अद्भुत शक्ती दिलीय. त्या स्वतःच्या दुःखांतही दुसऱ्याला धीर देतात.

सरु एका रात्री खुप घाबरून उठली. मला गच्च मिठी मारून म्हणाली “सोडव यातून मला.” मी ही हबकलो. मला धीर देत उभी करणारी ही इतकी कोसळलीय आतून. बापरे, आपल्याला ही समजलीच नाही अजून. खुप समजावून डोकं मांडीवर घेऊन झोपवलं तिला. रात्रभर जागलो. सकाळी एका नव्या विचारात नव्या उमेदीने निर्णय घेतला. स्वतःजवळील पैशांमधुन मेडिकल स्टोअर सुरु केलं परीच्या नावाने. सरुवर जबाबदारी सोपवली. ती ही घराबाहेर पडली. शिक्षण होतचं सोबतीला. एकीकडे डॉली मोठी होतं होती. दुःख विरत होतं आणि स्टोअरचा व्याप वाढत होता. शरयूशी बोलून मी ही नोकरी सोडून स्टोअरमध्ये जायला सुरुवात केली.

मध्यंतरीच्या काळात सरुच्या बहिणीशी असलेले संबध सुधारले. ती ही पूर्वीसारखी होत गेली हळूहळू. काळाच्या औषधाने. एकत्र असतो हल्ली स्टोअरमध्ये. दोघांना खुप वेळ मिळतो. सरीतेसारखंच तिचं खळाखळतं हसू, तिचा बिनधास्तपणा मी परत आणण्यात यशस्वी ठरलो. आताही तशीच भेटते पूर्वीसारखी आवेशात. थट्टेने रावण चिडवतं. मी ही मग तिच्यासोबत तरंगतो तिच्या राज्यात ‘yes madam’ म्हणत.

डॉली मोठी झाली आता आणि सरुही गुंतत चालली नात्यांच्या बंधनात. लाडकी आत्या, मामी, मावशी, काकी आणि आता तर आजीही झालीयं. भाऊ गेली दोन वर्ष रक्षाबंधन, भाऊबीजेला येतो. पण नात्यांमधला ओलावा नाहीच दिसतं. भाच्यांवर भारी जीव बाईसाहेबांचा. पोरांमध्ये असताना तिच्यातलं लहान मुलं आणि मैत्रिणींच्या घोळक्यातली अल्लड सखी पाहत राहतो मी. सरु माझी, माझ्या घरची लक्ष्मी आहे ही भावना सुखावते मला.

दोन वर्षांपूर्वी heart attack आला मला. हिने स्कुटीवर बसवून hospital गाठलं. सत्यवानाची सावित्री जणू. डॉक्टरांची धावपळ संपून धोका नसल्याचे कळलं आणि जीव भांड्यात पडला हिचा. आयसीयुत आली. कपाळावर ओठ टेकवले. हात हातात घेतला दुसरा हात छातीवर ठेवत म्हणाली “तुला असं कमकुवत होण्याचा काही अधिकार नाही. मी तुला काही होऊं देणार नाही. हे माझं ह्रदय आहे. लवकर बरा हो रावण.”

घरी आल्यावर ही सगळी पथ्यपाणी, औषधे यांचा चार्ज घेतला. या सगळ्याला कंटाळलेल्या मला कधी दटावुन, कधी प्रेमाने तर कधी सुंदरसा किस घेत, तर कधी ‘माझ्यासाठी घे ना राजा’ म्हणत जागेवर आणलं. स्वतः जीम लावलीय सोबत मलाही. जगायचं आहे तिच्यासाठी. गेल्यावर्षी लेक नोकरीनिमित्त बडोद्याला गेली. आणि आम्ही दोघे राजाराणीच राहिलो…

लेक ही थेट आईसारखी झालीयं स्वभावाने. दिसतेही खुप सुरेख. दुसरी सरुच. एकदोन वर्षात लग्न करायला हवं तिचं. आता तेवीस संपलं. पण मुलगा मी पारखून घेणार. तिच्या आईच्या नजरेत जसा मी आहे तसा हवा जावई. तिने पाहिलेला असला तरी चालणार आहे आपल्याला. ती योग्य निवड करेल याची खात्री आहे.

माझा आजचा अख्खा दिवस भुतकाळात गेला. माझा डॉल्याही आला सुट्टी टाकून मम्माच्या बर्थडेला. जेवणाच्या पंगती संपल्या. मैत्रिणी, पाहुणे निघालेत घरी जायला. दिवसभराच्या दंगामस्तीने पोरंही झोपायला गेली. डॉल्याही सीमाताई सोबत झोपते म्हणाली. मी वर आलोयं. सुंदर सेंट फवारलाय तिच्या आवडीचा.

ती आली…..माझी राणी…मेरी जानेमन…बाजूला बसत गोड हसली. “छान झालं सेलिब्रेशन.” म्हणत माझा हात हातात घेऊन “thanks for everything & thanks for being with me” म्हणाली…. हळूच ओठ टेकवले हातावर तिने… अविने ही मग तिच्यासाठी आणलेली अंगठी तिच्या बोटात सरकवत “खुप जगायचं आहे ग तुझ्यासोबत राणी” म्हणाला.

मेरी जान, my love…तुझें तों हमनें मोहब्बत का खुदा माना हैं” म्हणत एकदम साँल्लिड रोमँटिक मूडमध्ये हात पसरवले….. “असु दे. असु दे. इतकं काही रोमँटिक व्हायची गरज नाही. पन्नाशी झाली की आता. आवराव स्वतः ला. जावई ही येईल, एकदोन वर्षांत” म्हणत सरु हसली. अवि वेडावला त्या हसण्याने…

“गिफ्टसाठी थँक्स” म्हणतं डोळा मारून, केसांचा झुबका उडवून वळली..आणि अविला तिच्या मानेवरचा tattoo दिसला….फिर दिल मचल उठा….थंडी हवा लहराई…मौसम भी है…माहोल भी है…और हाय ये कमबख्त दिल आज पागल भी है…अवि पटकन उठला….तिच्या मागे गेला….तिच्या खांद्यावर हात ठेवून मानेवरच्या tattoo वर ओठ टेकवले…तिने पटकन फिरून घट्ट मिठी मारली…आणि मनात गाणं वाजलं..”आ ओ हुजूर तुमको, सितारों मे ले चलूँ। दिल झूम जाएं ऐंसी, बहारों मे ले चलूँ।…”

आँ..??? पुढे काय झालं विचारताय???
तुम्हाला माहीती आहे की!!! न्या आता कथा तुम्ही पुढे…..नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसतं…??

वाचकहो तुम्ही आवडीने वाचताय तर तुम्हाला वाचनातून आनंद मिळावा म्हणून स्टोरी सलग पोस्ट केलीय……

वाचून झालं की नक्की कमेंट, लाईक आणि शेअर करा….

सौ.वर्षा विशाल ठुकरुल…Velvet Kavisha

फोटो गुगल साभार….

Article Categories:
प्रेम

Comments

  • खूपच छान, वाचत जावं,वाचत जावं…,सम्पूचं नये अश्या स्टोरीज असतात तुझ्या….खिळवून ठेवतात मस्त…डोळ्यांच्या पलक ही झपकत नाहीत वाचताना…. खूपच छान
    शब्दच नाहीत ग…वर्णन करायला???

    Lata Rathi 14th ऑक्टोबर 2019 12:38 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा