इंतहा हो गयी इंतजार की- भाग २ (अंतिम)

Written by

इंतहा हो गयी इंतजार की- भाग २ (अंतिम)

©Velvet Kavisha

शंकरने रोजच्या पेक्षा लवकर घरं गाठलं. मंजूला कधी एकदा सांगतोय असं झालेलं. शंकर घरी आला तर राजू अभ्यास करत बसलेला. त्याच्याकडे पाहत मंजूने डोळ्यांनीच विचारलं. ‘काय झालं म्हणून..??’
पाणी प्यायला आत जात ‘सांगतो नंतर’ म्हणाला. वेळ पाहून त्याने मंजूला सांगितलं. मंजू ही शहारली. चार दिवसांनी भेटणार नवऱ्याला. उत्सुकता, धडधड आणि दडपण.

शंकरशी तोंडओळख होतीच थोडी. गरीब असला तरी लाखांत एक आहे. झोपडपट्टीत राहूनही व्यसन नाही कसलं. व्यायामाचं वेड आहे खुप. देखणा दिसतो एकदम. पिळदार शरीर पाहिलं की काळीज धडधडतं. चाळीस पंचेचाळीस दिवसांत खुपच आवडू लागलाय. त्याच्या प्रेमात फुल्लं लट्टू ना आपण. जवळ आला तरी संयम सुटतो की काय असं वाटतं. मिठीत गेलेयं बऱ्याचदा. किती आवडतं मलाही. वाटतं निघूच नये त्याच्या बाहूपाशातून. ओढ असलेलं “ते” सुख मात्र अजूनही हुलकावणीच देतयं–“दोघांनाही.” शंकर समजूतदार आहे. अस्वस्थ होतो तरी चिडचिड नाही करत. घरात वयात येणारी दोन भावंडे आहेत याचं नेहमी भान असतं त्याला..

वेळ पण इतकी हळूहळू का चाललीय…?? शनिवार यायला अजून दोन दिवस आहेत. सुनिता ताई ही मनातून खुश होत्या. नायर साहेबांच्या रुपाने बाप्पानेच त्यांची व्यथा जाणली होती जणू. जाऊ दे, पोरांना निदान दोन दिवस तरी हक्काच्या एकांताचे. शंकर आणि मंजू दोघेही खुश दिसताहेत.

वाट पाहत असलेला शनिवार कासवाच्या गतीने का होईना आलाच. शंकर सकाळीच चावी घ्यायला गेला. तेव्हा नायर सर म्हणाले, ” शंकर, madam गेल्यापासून घरात साफसफाई नाही. थोडीफार झाडझुड करतो मी. टिफीन लावलेला आहे त्यामुळे जेवण नाही बनवत. झोपायला येण्याआधी तु जरा थोडीशी साफसफाई करुन घेशील तर बरं होईलं. हे घे ‘हजार रुपये.’

“हो चालेलं ना सर, दुपारी मंजूला घेऊन येतो. दोघे मिळून अख्खं घर स्वच्छ करून घेतो. काळजी नका करु सर.” शंकर म्हणाला.

शंकर चावी घरी घेऊन आला आणि मंजूला म्हणाला, ” दुपारी जाऊन जरा सरांच्या घरी साफसफाई करायची आहे. लवकर आवर घरातलं. मग जाऊ दोघं.”

दुपारची झोप न घेता दोघेही सरांच्या घरी पोहोचले. शंकरने झाडून घ्यावं आधी आणि नंतर पुसून घ्यावं. मंजूने भांडी, किचन इत्यादी पहावं. बादली, झाडू, पायपुसणी, फिनेल सगळं सज्ज झालं. मंजूने साडी वर खोचली आणि वाकलेल्या शंकरचं लक्ष तिच्या अर्धवट उघड्या पायांकडे गेलं. पहिल्यांदा असं इतकं मोकळेपणाने पाहिलं त्याने. एवढं मोठ्ठं घर आणि दोघेच त्या घरात.

शंकर उठून मंजूजवळ गेला. तिने त्याच्याकडे पाहिलं. ‘देवा!!! याचा मुड काही वेगळाच आहे. आपण तर रात्रीच्या अपेक्षेत होतो.’ विचारातल्या मंजूला त्याने मिठीत घेतलं. तिच्या हातातला ओला कपडा तसाच हातात राहिलेला. ‘अहो, आता कामं आवरुया ना….. रात्री येणार ना आपण इकडे झोपायला तेव्हा….’ असं म्हणताच शंकर दूर झाला थोड्या नाराजीनेच.

मंजूला वाईट वाटलं, ‘किती जपतो हा आपल्याला. याच्या जागी दुसरा कोणी असता तर इतकी काळजी केलीचं नसती. इतका संयमी. नको म्हटलं तर लगेच बाजूला झाला. खुप प्रेम करतो हां. माझं ही आहेच की प्रेम याच्यावर. नुसत्या “त्या” विचाराने शहारतो आपण.

दोघांनी शांत राहून कामं उरकली. विचारचक्रातच मंजूने हातपाय, चेहरा स्वच्छ धुऊन फ्रेश झाली. शंकर ही सगळं आवरून मोबाईल पाहत बसलेला. मंजू नायर सरांच्या गेस्टरुममध्ये गेली. दरवाजाच्या मागे लपत, “अग, आई गं ” म्हणाली. “मंजू, काय झालं गं” म्हणत शंकर धावतच रुममध्ये पोहोचला.
आवाज तर आतूनच आलेला पण मग मंजू कुठेय..?? मास्टर बेडरुम तर lock आहे. “मंssजू कुठेयस तू ” म्हणत तो जायला वळला. तसं मंजूने त्याच्या कमरेला हातांचा विळखा घालत , डोकं पाठीवर टेकवत “इथे आहे मी..” म्हणाली. थोडा वेळ तो तसाच उभा राहून मागे वळला. मंजूने चेहरा हातात लपवलेला. “काय झालं..?? रात्रीपर्यंत धीर नाही निघत का…??” खोडकरपणे विचारत त्याने तिचे दोन्ही हात पकडले. ती लाजून हसली तसं त्याने तिच्या डोळ्यांत पाहत हळूहळू पुढे चालायला सुरुवात केली. तिचीही पाऊले उलट दिशेने चालू लागली. त्याने थोडं थांबून हलकासा धक्का दिला तिला आणि ती बेडवर पडली.

त्याने वाकून कपाळावर ओठ टेकवत एक छानसा किस घेतला. तिच्या पायाकडे बसत त्याने पायांवरून हात फिरवला. बोटांनी पैंजण हलवले. छुमछुम आवाज आला. त्याने पायांवर बोटं फिरवली. वीज चमकावी तसं अंग चमकून उठलं मंजूचं. तिने स्वतः उठून बसत शंकरलाही बाजूला बसवलं. त्याच्या गालावर ओठ टेकवले. त्याने तिच्या कानापाशी हात नेत तिला स्वतःकडे ओढली. ओठांनी ओठांना कुलूपबंद केलेलं. त्याचा हात तसाच अंगाखाली घेऊन तिने बेडवर झोकून दिलं. साहजिकच शंकर ओढला गेलेला मनाने आणि शरीराने ही. पालथी ती आणि तिला पाठीवरचा त्याचा भार अगदीच आवडलेला. त्याने मंजू म्हणून दिलेली हलकीशी साद आणि तिने हुंकारात दिलेला प्रतिसाद. त्याच्या हातांनी दुर होत जाणारा पदर आणि तिच्या जीवाची घालमेल. श्वासासोबत शरीरंही उबदार झालेली. आपण कुठे आहोत यापेक्षा दोघेच आहोत ही भावना जास्त प्रबळ.

दोघांच्या मनात गाणं वाजलेलं..

दो दिल मिल रहे हैं

दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं

मगर चुपके चुपके

सबको हो रही है

हाँ सबको हो रही है
खबर चुपके चुपके

हो दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके
सांसों में बड़ी बेकरारी

आँखों में कई रत जगे

कभी कहीं लग जाये दिल तो

कहीं फिर दिल ना लगे
अपना दिल मैं, ज़रा थाम लूं

जादू का मैं, इसे नाम दूं

जादू कर रहा है

जादू कर रहा है

असर चुपके चुपके
दो दिल मिल रहे हैं

मगर चुपके चुपके
ऐसे भोले बन कर हैं बैठे

जैसे कोई बात नहीं

सब कुछ नज़र आ रहा है

दिन है ये रात नहीं

क्या है कुछ भी, नहीं है अगर

होठों पे है, ख़ामोशी मगर
बातें कर रहीं हैं

बातें कर रहीं हैं
नज़र चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं

मगर चुपके चुपके
कहीं आग लगने से पहले

उठता है ऐसा धुंआ

जैसा है इधर का नज़ारा

ओ वैसा…

घट्टावलेल्या मिठ्या. अंग आणि मन घुसळवून काढणारे क्षण. अंगावरच्या कपड्यांनी एक एक करत सोडलेली साथ आणि पराकोटीच्या एकरुपतेची स्थिती. दोन जीव एक होत असलेले. अधीर तरीही संयमी तो. आवेगातही काळजी घेणारा. काळजी घेणाऱ्या त्याला उत्कट साथ देणारी मदनाची ती रति.

पुन्हा तेच. श्वासांची वाढलेली गती. धपापणारे ऊर. ह्रदयांची स्पंदने तीव्र झालेली. कपाळावर घामाची हलकीशी लकेर. घोगरा झालेला आवाज. फुललेलं नाक, अंगावरुन त्याचा वेगाने फिरत जाणारा हात आणि तिनेही त्याच्या सर्वांगावर हात फिरवून दिलेली साथ. तापलेली अंग एकमेकांना भिडलेली. ओठांचे स्पर्श वाढलेले. सगळंच नविन दोघांसाठी तरीही मनासहीत तनानेही वाहणारे ते. वेडावलेले दोघे समर्पणासाठी तयार.

…..आणि आणि डोअरबेल वाजलेली…!!

My god तुम्ही सगळे अजून इथेच…?? त्यांना राहू देत की एकांतात. लग्नानंतर महिन्यांनी हे क्षण आलेत त्यांच्या आयुष्यात… आपण नको डिस्टर्ब करायला.

तुम्ही चला माझ्यासोबत. आपण बघुया डोअरबेल कोणी वाजवली ते… अरे, हे तर सँम्युअल अंकल बाजुच्या flat मधले. नायर सर जाणार होते ते गेले की नाही त्याची चौकशी करायला आलेत…

वाचकहो, तुम्ही ही कथा माझ्या लेखणीतून वाचलीत. जगलातही ती इथपर्यंत. अब आपकी बारी.. सँम्युअल अंकलमुळे आता डाव बिघडला की घडला ते राहू देत बाजूला… रात तो अभी बाकी है ना..। करा शेवट कथेचा.. नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसत…!!!

कथा समाप्त…!

© Velvet Kavisha

माझी मैत्रिण सौ. सरीता दातिर हिने कथेचं नाव दिलं आणि मी कथा लिहिली. सांगा आवडली का..

आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, follow करा.

 

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.