इट्स हर चॉईस…आणि नेहा धुपिया

Written by

रोडीज हा टीव्ही शो आणि वाद याचं समीकरण तसं नवीन नाही..इथले परीक्षक हि अतिशय उच्च विचारसरणीचे दिसून येतात(या विषयी मी अजूनही संभ्रमात आहे)..म्हणजे स्पर्धकांमधील उकृष्ट रोडी निवडण्यासाठी हा सगळा खटाटोप म्हणे..बरं एन्ट्री फॉर्म मधेच वादग्रस्त प्रश्न विचारलेले असतात म्हणजे एखाद्या स्पर्धकाने याच वेगळं उत्तर लिहलं कि त्याचा गेम कसा वाजवायचा हेही यांचं ठरलेलं..आता परवाचंच उदाहरण बघा..एका स्पर्धकाला समोर बोलावण्यात आलं आणि त्याला नेहमीचे प्रश्न विचारून झाल्यानंतर एन्ट्री फॉर्म मधील नेहा धुपिया या अभिनेत्री कम सोकॉल्ड (so cold हं..)महिला परीक्षिकेने  वादग्रस्त प्रश्न विचारला.”तू कोणत्या महिलेवर हात उचलला आहेस का?” स्पर्धकाने उत्तर दिलं “हो..मला जेव्हा कळालं माझी girlfend मला धोका देत आहे तेव्हा मी तिच्यावर हात उचलला..”आता यावर नेहा मॅडम भडकल्या आणि अत्यंत घाणेरड्या शिव्यांचा त्याच्यावर भडिमार केला..इथे विशेषतः मी सांगू इच्छितो ..आई वरून शिव्या दिल्या ओ त्या बाईने..(हि नक्की माहिलांच्याच बाजूने आहे का हा प्रश्न उपस्थित व्हावा इतपत)..आणि एक उत्कृष्ठ विधान केलं “इट्स हर चॉईस”.. याच कार्यक्रमात हिच्याच उपस्थितीत या आधी एक मुलगी स्पर्धक म्हणून आली होती..4-5 बॉयफ्रेंड सोडून दिले होते तिने तिला चिट केले होते म्हणून..तेव्हा मॅडम तिला काय म्हणाल्या “त्यांच्या मुस्कटात देऊन यायचं..मुलीला फसवतात म्हणजे..” हि 4-5 मुलांसोबत फिरते तेव्हा चालतं तुला ..तिने मुलांना मारण्याविषयी सल्ले देते तू..आणि तेच जर एका मुलांसोबत घडलं तेव्हा मुलीवर हात का उचलला म्हणून आईवरून शिव्या देतेस..

आणि वरून स्वतःच सांगतेस मी 5 जणांसोबत फिरले आहे. काय आदर्श ठेवायचा तुझा आजच्या मुलींनी..महिलांची बाजू समजून घ्यावी म्हणून तुला तिथे परीक्षक केलं..आणि तू काय मुलींनी 4-5 जणांसोबत फिरण्याचा ट्रेंड सेट करत आहेस का?

तू लग्नाच्या तीन महिन्या नंतर लगेच बाळाला कसा जन्म दिलास ..हा जर प्रश्न लोक उपस्थित करत असतील तर या बाबत तुझा आक्षेप नको..

ज्या मुद्यावरून तू भांडलीस त्यासाठी तुला पाठिंबा न देता मुलीही तुझ्या विरोधात बोलत  आहेत.यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहता तुझा इट्स माय चॉईस तुला चांगलाच महागात पडला असं म्हणाव लागेल.

Comments are closed.