इराने ठेवली परीक्षा

Written by

आम्हा ब्लॉगर वाल्यांसाठी
इराने ठेवली एक परीक्षा….

इथल्या लेखिका म्हणे लिहितात खूप छान
पण कागदावर नव्हे तर
मोबाईलवर…..
खूप झालं यांचं लेखन
बघावं जरा यांचं हस्ताक्षर….
मग काय???
टाकला message इराने….
आता खरी झाली आमची परीक्षा सुरू…😢
मोबाईल आल्यापासन पेनच घेतला नव्हता हो हातात…
कधी घेतलाच समजा …
तो ही फक्त हिशोबापूरताच..
शाळा सोडून झाले आता
बरेच हो वर्ष….
लग्न जुळल्यानंतर लिहिले हो बरेच लेटर…(मोबाइल नव्हता तेव्हा)
माझ्यापेक्षा माझं अक्षरच आवडलं यांना फार…😊
असं आता म्हणतात कधी कधी……😍😍
खर तर परीक्षेच्या अटीत
लागत नाही आमचा नंबर…
(अहो अट म्हणजे वयाची अट हो…काय न तुम्ही पण…)
आलाय चान्स , तर मग म्हटलं देऊन बघावी ही परीक्षा..
मुलांना मागितलं सगळं साहित्य…
लेटर पॅड, कागद, पेन…
मुलं सुद्धा लागली उत्सुकतेने बघायला…
आईचा हा अवतार…
बस आता मी लिहिणार…
म्हटलं….बघावं एकदा कंमेंट वर जाऊन….
अरे बापरे!!!!!
अहो… तिथे तर मोत्या सारख्या अक्षरांचा पडला होता नुसता खच….👌👌
काय बर करावं आता…
लिहू की नको लिहू….
प्रश्न होता मोठा गहन???
मुलं बघू लागली🤔
अहो…शेवटी माझ्या प्रेस्टीज चा प्रश्न!!!
काहीही होवो आता लिहावंच…म्हणून लिहूनच काढलं एकदाच…
आपण तर लिहलय बरोबर…
आता शिक्षकांना आवडलं आपलं अक्षर तर पास… नाहीतर नापास….
©️®️ लता जुगल राठी
अक्षर आवडलं तर नक्की like करा हो…please😂😂

Article Categories:
शिक्षण

Comments are closed.