ईद : एक आनंदपर्व…!!

Written by

? ईद : एक महान आनंदपर्व …!!

भारत हा देश सर्वधर्मसमभावनेने नटलेला आहे.येथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.मुस्लिम लोक आपले सण दिमाखात साजरे करतात.त्यातील मुस्लिम लोकांचा ईद हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.ईदच्या दिवसामध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद खुललेला असतो .ईदला नविन वस्र परिधान करुन मुस्लिम बांधव मशिदीत किंवा ईदगाहमध्ये नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना अलिंगन देतात.या दिवशी मित्र असो वा शत्रू गळाभेट घेउन शुभेच्छा देतात .
ईदच्या दिवशी महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसुन येतो .ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करुन आप्तजनांना शीरखुर्मा खाण्यासाठी आपल्याकडे आमंत्रित केले जाते.ईदच्या शुभपर्वाला गरीब अनाथ मुस्लिम बांधव वंचित रहात असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी चांगली नाही असे मानले जाते.मुस्लिम धर्मातील तळागाळातील ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा , यासाठी जकात
फितराची मुस्लिम शरियत कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे.
मुस्लिम लोकांमध्ये एकोपा,बधुत्व टिकून रहावे यासाठी ईद हा सण मोठ्या उत्साहानं मुस्लिम बांधव साजरा करतात.ईदच्या मुस्लिम बांधवाना खुपसार्या शुभेच्छा ..!!

धर्म , जात यापेक्षाही शक्ती असते माणुसकीची ..

एकमेकांची गळा भेट घेउन शुभेच्छा देऊया ईदची…

? ईद मुबारक ..!!

✍नामदेव पाटील .

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा