ईराची वाटचाल समृद्धीच्या दिशेने….!!

Written by

🌹ईराची वाटचाल समृद्धीच्या दिशेने …!!

शब्द जे घडविती ..
मन प्रसन्न करती ..
शब्दांच्या करामती ..
ईरामध्ये उमटती..

जेंव्हा एखाद्या गोष्टीची आवडच अमर्याद आनंद देते तेंव्हा मनातुन काय तरी चांगले घडणार असे वाटते.कितीही कष्टप्रद काम व दमल्याभागलेला जीव असुदे मनात विचारांचे मंथन चालुच असते.एखाद्या माध्यमांवर अपार प्रेम कराव..त्यामुळे आनंदाने बेभान होऊन लिहावे … वाचकांनी ते मनमुराद वाचाव यासारखे समाधान रसाळ आंब्यासारखे रेंगाळत राहते…. हे सारे ईरामुळे घडते आहे हे त्याहून महत्वाचे वाटते…कदाचित काळ बदलेल , माध्यमांची रेलचेल येईल पण ज्या माध्यमांने शब्दांच बाळकडू पाजले आहे ते कदापिही मी विसरणार नाही…जीथ दररोजच शब्दांचा मेळा भरलेला असतो..आदरणीय लेखक , लेखिका आपले मनाचे तरंग उमटवत असतात…ज्या प्रतिभेला सतत वंदन करणारा वाचकवर्ग अष्टोप्रहर प्रोत्साहित करत असतो तो ईथल्या विचांरानी समृद्ध होताना दिसतो आहे… अनेक नवे लेखक या ताफ्यात सामिल होऊन ” ईरा ” हे विचारांचे नवे पर्व उदयास येत आहे.. पुढील काळ निश्चितपणे ऊज्वल आहे तो दैदीप्यमान रहावा यासाठी मनापासून शुभेच्छा देतो…

🔴नामदेव पाटील.

प्रतिक्रिया व्यक्त करा