उंच तुझाच झोका

Written by
  • 1 आठवडा ago

।।ॐ।।

स्वप्नांची बाग फुलवीत
प्रयत्नांशी मैत्री करून
ध्येयाच्या वाटेने गेली
नभास गवसणी घालून।

जिच्या हाती होती
फक्त दोरी पाळण्याची
घेतलाय तिने वसा
समाजाची घडी बसवण्याची।।

सौभाग्याचा हाती शोभून
दिसतोय हिरवा चुडा
वाईट वासनेतुन आज
शिकतेस नवा धडा।।

होतीस कधी आनंदी
बनलीस तूच रमा
स्त्री शिक्षणाला आज
मिळाला गंध नवा।

नाजूकपणा झिडकारून
बनवलंस नवं अस्तित्व
अंगी धाडस, साहसाने
खुलून दिसतंय स्त्रीत्व।

अबला कडून सबला
प्रवास तुझा अनोखा
शिक्षणाच्या झाडावर
उंच तुझाच झोका।
।।शुभम् भवतु।।
#मी मोरपंख(ऋचा)

Article Tags:
Article Categories:
नारीवादी

Comments are closed.