उशिरा का असेना पण कृष्ण अवतरला..

Written by

अग… कावेरी आहेस का घरी…

हो.. या काकू.. काय म्हणताय

काय म्हणताय काय… गोकुळाष्टमी आली दोन.. चार दिवसावर आणि तुझी नेहमीसारखी लगबग दिसत नाही आहे.. साजरी करण्याची.. म्हणून मुद्दाम आले विचारायला… काय झालं ग?

काही.. नाही हो काकू.. थकले मी सगळं करून, आणि कंटाळले देखील… देव आहे म्हणतात न सगळे.. मग मला का त्रास देतोय हा देव?   ???

लग्नात आलेला बाळ कृष्ण बघून सगळे म्हणाले होते… “आता घरात लवकरच पाळणा हलणार.. बाळ कृष्ण येणार.. ” हे ऐकून किती लाजले होते मी.. आणि आपण आई होणार या भावनेने वेगळी शिरशिरी गेली सर्र अशी….

खरंच काकू… काय दिल हो या बाळकृष्णाने मला..?  लग्न झालं तेंव्हापासून पूजा करायच्या वेळी… याची प्रतिमा मनात साठवायचे… आपल्यालाही बाळ होईल असेच गोडुल, नटखट, असेच विचार यायचे मनात..

दिवसामागून दिवस गेले…. महिन्या मागून महिने गेले… आणि आता तर पाच वर्ष होत आले… पण माझी ओटी नाही भरली या बाळ कृष्णाने…. ???

मुलगाच हवा हा अट्टाहास नव्हता माझा.. पण निदान आई होण्याचं सौभाग्य तरी द्यायचं न..

लग्नात.. गणेश मूर्ती यासाठी देतात की संसाराचा श्रीगणेश हा निर्विघ्न होवो.. आणि त्याला बाळकृष्णाची जोड असते ती स्त्रीत्वाच्या परिपूर्णत्वासाठी… म्हणजे आई होण्यासाठी… मला या बाळकृष्णाने काहीच नाही दिल…. जे कि मी त्याच्या जन्माची तयारी सांग्रसंगत करू. आता सगळं देव देव करणं सोडणार मी काकू..  रागावले आहे या कृष्णावर..

काही मेडिकल प्रॉब्लेम असता तर तो औषधं घेऊन, ऑपरेशन करून सॉल्व केला असता आम्ही.. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत दोघांचेही… तरीही बाळ होत नाही.. म्हणजे नेमक काय ????  हेच कळत नाही मला.

सगळे सांगत असतात हा उपवास कर, या देवाला नवस कर,  या देवाला जा…. त्या देवाला जा. सर्व केल आम्ही तरीही आम्हाला फळ मिळालं नाही.. आता मी देव देव करणं सोडल. आता बाळकृष्णाची जन्माष्टमी तेंव्हाच साजरी होईल जेंव्हा माझ्या ओटीत माझ बाळ येईल.. ??

तुझं बरोबर आहे ग पोरी .. तुझी देवावरची नाराजी पण मानते मी. तरीही आपल्या घरची परंपरा विसरू नकोस.  आणि अशी खचून जाऊ नकोस.. केशव (कावेरीचा नवरा ) म्हणाला होता न मागे दत्तक बाळ घ्यायच ते.. मग का नाही घेतलंस..?  अग एका पोरक्या मुलाला घर व आई -वडील मिळाले असते.. आणि तुझं घर लहान बाळाच्या आवाजाने, आनंदाने भरून निघालं असत बघ..  कर तो विचार आणि दत्तक बाळ घेऊन या..

नाही काकू… आमच्यात उणीव काहीच नाही.. डॉक्टर म्हणाले आहेत असं. त्यामुळे मी आई होऊ शकते याची ग्यारंटी आहे न..  दत्तक बाळ मला आई होण्याचा मान देईल..  पण गर्भात ते अनुभवण्याच काय????  ते मला नाही न अनुभवता येणार..  डॉक्टर म्हणाले असते की “तू आई होऊच शकत नाही ” तर मी स्वतः दत्तक बाळ आणलं असत.. पण आता मी नाही करू शकत तस.. माझ मन नाही तस करायला तयार.. सगळं मान्य मला.. एका अनाथाला आई -बाबा व घर मिळेल.. मी पण याच समर्थन करते.. तरीही माझ मन हे मानायला तयार नाही..

आता पर्यंत मी या बाळकृष्णाच्या विनवण्या केल्या.. आता रुसून बसते… बघते मी कसा नाही पाळणा हलवत हा बाळ कृष्णा माझ्या घरी..  ???

तुझ्या मानाची घालमेल समजते ग पोरी मला… तरीही तुझी इच्छा.. मी काहीच नाही म्हणणार तुला.. तुझं दुःख तुलाच माहिती. आमचं काय जात दत्तक घे म्हणायला…  मी मनातून प्रार्थना करेल त्या बाळ कृष्णाला… तुझ्या घरी पाळणा लवकर हलावा म्हणून.

काकू दत्तक घेणं वाईट नाही हो… कृष्णाची यशोदा व्हायला आवडले असते मला.. पण काहीच मेडिकल प्रॉब्लेम नाही म्हंटल्यावर… मनात एक चीड निर्माण झालीय.. मीच का?  मलाच का नाही हे मर्तुत्वाचं सुख उपभोगता येत ?  ???

पोरी नशिबावर आणि देवावर विश्वास ठेव…. मी बघितलं आहे बऱ्याच जोडप्याना.. लग्नानंतर 10..12वर्षांनी कोणतीही ट्रीटमेंट न करता बाळ झालेलं आहे.. हा ही त्या लड्डुगोपालचा एक खेळ असेल… तुझ्या सोबत चाललेला.  आधी तुला त्रासून सोडायचं असं ठरवलं असेल त्या बाळ कृष्णाने….  बघ तुला जस पटत तस कर..

मी म्हणेल तू जन्माष्टमी नक्की साजरी कर..  आणि हो यशोदा होण्याचा पुन्हा एकदा विचार कर. देवकीने आठ बाळाला जन्म देऊनही त्यातील एकाही बाळाच्या बाललीला अनुभवल्या नाही.. इकडे यशोदा त्या बाललीलानी तृप्त होऊन निघाली होती. आपल, आपल्या गर्भात वाढलेलं बाळच सर्वस्व असत असं नाही ग कावेरी… आता विचार करत बसायचा की मी आई का होत नाही?  आणि वाट बघायची तुझं बाळ होण्याची?  की असाच एखादा कान्हा किंवा राधा आणून यशोदा बनायचं हे तू ठरव?  चल येते मी..

काकू गेल्यावर किती विचार करत बसले मी…

खरंच माझ चुकतंय का कुठे? 

स्वतःचं बाळ हवं हा हव्यास आहे का माझा?

मी बाळ दत्तक घ्यायला हवं का?

मी त्याला प्रेम देउ शकेल का स्वतःच्या बाळा सारखं?  

काय करू मी? कृष्णा मार्ग दाखव मला.  द्विधा मनस्थितीत अडकले मी.. एक मन म्हणतं, “मला आई होण्याचा प्रत्येक क्षण अनुभवावासा वाटतोय.. यात काय चूक आहे? “

दुसरं मन म्हणतं ”  दत्तक घे बाळ आणि यशोदा मय्या होऊन दाखव जगाला ” हे ही कळतंय रे मला पण वळत नाही आहे रे कान्हा. मला मार्ग दाखव

देवा सोडावं रे मला या विचारांच्या कात्रीतून…, ??????

(केशव येतो) “काय ग कसला विचार करतेयस.”  असं केशव म्हणताच त्यांच्या मिठीत शिरून इतका वेळचा दाबून ठेवलेला मनातील भार ती रडून मोकळी होते…

अच्छा आता जन्माष्टमी येत आहे.. मग मॅडम रुसल्यात का पुन्हा कान्हा वर?  अग तुला छान पर्याय दिलाय न कान्हाने  दत्तक घ्यायच बाळ आणि “कृष्णाची यशोदा आई व्हायचं ” पण तू ऐकत नाहीस न…

तुम्ही पण मलाच बोला चुकते म्हणून.. पण एका स्त्रीची.. आई होण्याची ओढ नाही समजू शकणार तुम्ही… ???

अग.. पण आता आपण काहीच करू शकत नाही.. नसेल देवाची इच्छा आपल्याला वासुदेव.. देवकी बनवायची. त्या कृष्णाची लीला असेल ही एखादा कृष्ण किंवा राधा दत्तक घेऊन आपल्याला नंद.. यशोदा बनवण्याची..तर. विचार कर या गोष्टीचा  ??

मला भीती वाटते हो.. मी त्या बाळाला आईसारख प्रेम देईल की नाही? आणि ते बाळ कृष्णा सारखं सोडून गेलं तर आपल्याला??? ???

अग किती विचार करतेस… ज्यांची स्वतःची मुले आहेत ते तरी कुठे त्यांच्या जवळ राहतात… ती पण सोडून जातातच की..  विचार कर… दत्तक घेण्याचा. मी एक छान परी बघितली देखील आहे. चार महिन्याची आहे ती फक्त. मला फार आवडली ती तू म्हणतं असशील तर आपण जाऊन येऊ आणि दत्तक घेण्याची प्रोसिजर सुरु करू या.  कान्हा समजव रे हिला…, ??

तो दिवस… अख्खा विचार करण्यात गेला तिचा… आता काय करावं.. सगळे मुद्दे पटले तिला केशवचे आणि काकूंचे देखील.. रात्र विचारात कधी सरली ते कळलं नाही तिला..

प्रभातीचा दिनकर एक नवी विचारांची किरण घेऊन आला… कावेरीने सकाळी उठून लवकर आवरलं… प्रसन्न चित्ताने देवपूजा केली….आणि केशवला उठवून म्हणते कशी “अहो उठा लवकर, तयारी करा आपली परी वाट बघत असेल आपली. तिला आणण्याची तयारी नको का करायला.. उठा लवकर”

केशव दचकून उठला.. अग आज सूर्य पूर्वेलाच उगवला न?

हो.. पूर्वेलाच उगवला. चला आवरून घ्या लवकर.. दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागतो. ती पूर्ण करून माझी राधा कृष्णजन्माष्टमी ला घरी आणायची आहे..

हो.. मी… मी लगेच आवरतो… ?????

केशव व कावेरीने.. परी(राधा ))ला दत्तक घेतले.. आणि कावेरी परीच्या स्पर्शानेच मातृत्वाच्या आनंदाने भरून पावली होती…  या वर्षीचा जन्माष्टमीचा पाळणा कावेरी कडे.. परीच्या पाळण्या सोबतच हलला…

पाच वर्षाची परी होत आलेली आणि अचानक कावेरीला चक्कर आला… असेल अशक्तपणा म्हणून तिने लक्ष दिले नाही. पाळी पण चुकली होती… तरी तिच्या डोक्यात तस काही आलेलं नव्हतं.. आता लग्नाला 10वर्ष होत आलेली होती आणि परी सोबत ती खुप खुश होती..  तिचे चक्कर येण्याचे प्रमाण वाढले होते.. आणखी काही नको व्हायला म्हणून केशव तिला दवाखान्यात घेऊन गेला.. सर्व टेस्ट केल्या.. आणि आश्चर्य 10वर्षानी कावेरी आई होणार होती..

डॉक्टर देखील विचारात होते त्यामुळे दोनदा टेस्ट केल. आणि केशव.. कावेरी ला ही गोड बातमी दिली..

कावेरी व केशवला तर विश्वासच बसेना.. हे असं कस?, ??आणि 10वर्षानंतर.. आपल्या परीला सोबत करायला कृष्णाची लीला आहे का ही… या सगळ्या विचारांनी दोघेही बुचकळ्यात ही होते आणि आनंदी देखील होते.

सगळं नॉर्मल होत.. या बाळाच्या येण्याने परी कडे तसूभरही दुर्लक्ष झालं नाही तिच.. कारण ती आधी यशोदा मय्या झाली होती, ती परीमुळे. परीच्या येण्याने तिच्या मनात असलेली निगेटिव्हिटी कमी झाली होती आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच आला होता तिच्यात. त्याच साकारात्मक शक्तीने तिला आईपण बहाल केल होत.

डिलिव्हरी डेट गोकुळाष्टमी च्या नंतरची होती… बघता बघता दिवस भरत आले.. नेहमी प्रमाणे कृष्णजन्माष्टमीला, कृष्ण  जन्माची तयारी कावेरी कडे सुरु होती.. तिला डिलेव्हरीला वेळ होता अजून.  पण अचानक तिच्या पोटात दुखायला लागला… आणि तिला दवाखान्यात ऍडमिट केल… असह्य वेदना सहन करत शेवटी रात्री कावेरीने मुलाला जन्म दिला… आज खरंच कृष्ण तिच्या घरीच नाही,  तर तिच्या पोटी जन्माला आला होता… उशिरा का होईना पण त्यांच्या घरी कृष्ण अवतरला होता.. जन्माष्टमीलाच..

परीला भाऊ झाला होता… आणि उशिरा का होईना पण कावेरीची इच्छा देखील लड्डुगोपालने पूर्ण केली होती.. मुलाच्या येण्याने… परीच्या लाडात किंवा प्रेमात तसूभरही कमी झाली नाही.. कारण परीमुळे त्या घरात सकारात्मकता आली होती…

समाप्त…. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते

ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे.. आधी आई का होत नाही या विचाराने त्रासलेली कावेरी (नाव बदललेल आहे). दत्तक बाळाला स्वीकारू की नाही या द्विधा मनस्थितीत असलेलं तिच मन,त्यानंतर हिम्मत करून मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय… आणि ती मुलगी पाच वर्षाची झाल्यावर आणि लग्नाला दहा वर्ष झाल्यावर अचानक आलेली प्रेग्नेसीची गोड बातमी मिळाली आणि गोकुळाष्टमीच्या  दिवशी तिला मुलगा झाला.. काल्पनिक वाटत असली तरी ही घटना खरी आहे..

धन्यवाद ?  दत्तक घेण्याआधीची स्त्रीच्या मनाची घालमेल मांडली आहे.. आवडल्यास like करा कमेंट करून तुमच्या कडू.. गोड प्रतिक्रिया नक्की कळवा… शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा.. ??©®जयश्री कन्हेरे -सातपुते

फोटो.. साभार गुगल ?

प्रतिक्रिया व्यक्त करा