“उशीर”

Written by

‘श्री’ ला जरा आळसल्यासरखे वाटत होते आज ,कशातच लक्ष लागत नव्हते..काय करावें काही समजत नव्हते.. तो नेहमीच्या जागेवर विचार करत बसला….

तेवढ्यात एक ओळखीचा आवाज त्याच्या कानी पडला..
“अरे काही सूचत नसेल किंवा टेन्शन असेल तर फार विचार करु नये माणसाने… गपचुप झोपी जावे.. झोप झाली की आपोआप मार्ग सापडतात…”
आणि ती हसायला लागली..

स्वप्न होतं ते ‘श्री’ चे…
‘श्री’ विचारात एवढा गढून गेला होता की त्याला कळलेच नाही कधी डोळा लागला….

ती आली होतीं …. त्याच्या स्वप्नात! अचानक अशी ध्यानी मनी नसताना… तो हसायला लागला, त्याच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. ती आठवली आणि तो भूतकाळात हरपून गेला..

जुन्या आठवणी अश्या अचानक आल्या की होतं असं कधी कधी नाही का?

फार साधी सरळ होतीं ती. तशी फार काही सुंदर नव्हती पण लोभस होती.. एक मैत्रीण म्हणून खुप चांगली होती. ‘श्री’ साठी तरी ती अगदी मैरिज मटेरियल म्हणतात ना तशी होती.

‘श्री’ विचार करत होता की, “आता कुठे असतील हे सगळे माझे फ्रेंड्स??असतील ही की नाही?? भेटतील का सगळे??”

त्याचे काही कॉलेज चे मित्र अजूनही संपर्कात होते, तो त्यांच्याशी बोलला. त्याला मन हलकं झाल्यासारखे वाटलें. त्या सर्वांन्नी ठरवले की ग्रुप चा get- together ठेवू या..

‘श्री’ ने लगेच सगळ्यांना संपर्क केला. availability विचारली. सगळेच वयस्कर झाली होतीं. बऱ्याच वर्षांन्नि सगळ्यांना भेटणार म्हणून ‘श्री’ ही उत्सुक होता.

Plan ठरला. सगळेच येणार होते एक दोघ जण सोड़लेत तर . परत तोच कॉलेज चा माहोल तैयार होणार होता. ‘श्री’ त्या दिवसाची च वाट बघत होता.

आणि तो दिवस आला…
‘श्री’ छान तयार झाला. ठरलेल्या जागी गेला. सगळे हळूहळू येऊ लागले.

सगळेच उत्सुक होते एकमेकांना भेटायला, बोलायला..
खुप गप्पा रंगल्या.. कॉलेज च्या.. मग एकामेकांची secrets, ते चिडवणे, चिडणे सगळेच रंगले होते आपापल्या आठवणीं मधे…

पण ‘श्री’… ‘श्री’ तीला शोधत होता.. ती आलीच नव्हती..
‘श्री’ ने सगळ्यांना विचारले पण तिच्या बद्दल कोणाला च काही माहिती नव्हती…’श्री’ परत विचारात पडला..

कार्यक्रम अगदी छान झाला होता. सगळे आनंदाने परतले, पुन्हा असच भेटु, या आशेने…

‘श्री’ ने ही तिला अनेकदा फ़ोन केलेत पण संपर्क झालाच नाही.. ‘श्री’ परत हताश होऊन बसला आपल्या नेहमी च्या जागेवर .. परत ती च उदासीनता, आळस… त्याला काही सुचेनासे झाले..

तेवढ्यात ‘श्री’ चा मित्र आला आणि म्हणाला-
” काय झाले??”
“सगळ्यान्ना भेटून आनंद नाही का झाला??”

“झाला रे आनंद.. असं वाटत होतं की ते कॉलेज चे दिवस परतले… खुप छान वाटले.. आणि सगळ्यांनी तुझ खुप कौतुक केलं बरं का??” ‘श्री’ म्हणाला ..

त्यावर ‘श्री’ चा मित्र म्हणाला , “काय तु , म्हणतोय खरं की आनंद झालाय म्हणून, पण चेहऱ्यावर हवा तसा दिसत नाही आहे तो.”

“हम्म!” ‘श्री’ नाराज स्वरात बोलला..
“अरे काही जण आले नाहित ना म्हणून असेल कदाचित.”

“हां !!! असेल असेल …” ‘श्री’ चा मित्र चिड़वण्याच्या स्वरांत बोलूंन निघून गेला…

‘श्री’आपल्या जागेवर येऊन, खिड़कितुन चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत निपचित पडून रहिला..

“तिला फार वेड होतं या अशा चमचमणाऱ्या आकाशाचं…ती बोलायची या चांदण्यांशी…
तिच्या अंगणातल्या झोपाळ्यावर ती बसायची.. ती तिची आवडती जागा होती.”

तशी ती ‘श्री’ ची बालमैत्रिण… एकाच शाळेत,एकाच कॉलेज मध्ये होते ते दोघंही, पण तीचा ग्रुप च वेगळा.. त्यांच्या त कधी फार बोलणं होत नसे..

ती वर्गात कमी आणि मैदानावर जास्त असायची.. खोखो, फूटबॉल व्हॉलीबॉल, स्विमिंग सगळेच खेळ कसे तिच्या मुठीत असायचे. स्विमिंग आणि व्हॉलीबॉल तर तिचे आवडते खेळ. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या तिने.

ती एक खेळाडू म्हणून प्रसिद्ध आणि अभ्यासात पण पहिल्या पाचात येणारी.. आणि ‘श्री’ एक मागच्या बाकांवर बसणारा.. अभ्यासात जेमतेम तरी firstclass मध्ये च येणारा.

असंच एकदा कॉलेज च्या टूर मध्ये ‘श्री’ late पोहोंचला. बस मध्ये सर्वांनी आपापल्या जागा घेऊन बसलेले आणि ‘श्री’ ला एकही सीट मिळेना बसायला तर ही एकटीच बसलेली खिडकीत मग ‘श्री’ ने विचारले “मी इथे बसू का?” ती लगेच “हो” म्हणाली आणि ‘श्री’ बसला.. तिचा सगळा ग्रुप तिला बोलायला लागला, “काय ग आम्ही बसतो म्हटलं तर नाही म्हणालीस, तुला एकटीला खिडकीत बसायचं म्हणाली, मग या ‘श्री’ ला कशी जागा दिलीस???” त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही.
थोड्या च वेळात गाडी निघाली आणि सगळे अंताक्षरी खेळण्यात मग्न झालें. ‘श्री’ ही अधून-मधून खेळत होता. तिच्या चेहऱ्यावर मात्र फक्त एक smile…

‘श्री’ तिच्याशी बोलायला लागला, ती ही हळूहळू मोकळी झाली आणि बोलायला लागली, आणि तिथून त्यांची मैत्री वाढत गेली..

मग ‘श्री’ तिच्या प्रॅक्टिस च्या वेळी मैदानावर जात होता, कधी तिला घरी सोडून द्यायचा.
तिच्या स्पर्धा असल्या की ‘श्री’ ही तिच्यासोबत जायचा ती कधी नाही म्हणत नव्हती यायला.

पुढे दोघंही जॉबसाठी एकाच शहरात असायचे त्यामुळे पण त्यांच्या भेटी नेहमी होत असे.

तिच्या मैत्री चे प्रेमात रूपांतर झाले, ते ‘श्री’ ला कळत होतें. तिला ‘श्री’ आवडायला लागला. प्रत्येक गोष्ट ती ‘श्री’ शी शेअर करायला लागली. पण ‘श्री’ च्या मनात वेगळाच खेळ सुरू होता. तो प्रत्येक पाऊल तिच्याकडे टाकत होता पण फार विचारपूर्वक..

तिची एक गोष्ट खूप आवडायची ‘श्री’ ला ते म्हणजे तिचीे राहणी आणि ती एक ‘मुलगी’ होती. खरं तर हेच कारण होतं त्याचं मैत्री वाढवण्याचं.
स्वतःचा फायदा होणार असेल तर ‘श्री’ काहीही करायला तयार होत असे..

‘श्री’ तिला मैत्रीण म्हणून मिरवत होता. पण त्याचं प्रेम वगैरे या गोष्टींवर विश्वास नव्हता. लग्न करायचं तर एखादया श्रीमंत, खूप सुंदर मुलीशी अस त्याचं मत होतं.
ती ‘श्री’ च्या अटीत बसणारी नव्हती. म्हणून ‘श्री’ ने तिला सरळ सांगितले की,
“तू माझी मैत्रीण आहेस , तू मला आवडते पण मी लग्न नाही करू शकत तुझ्याशी…”

ती रडली , ‘श्री’ ला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न ही केला पण ‘श्री’ आपल्या मतावर ठाम होता. ‘श्री’ तिला म्हणाला “हे बघ ,माझी प्रेमाची आणि लग्नाची व्याख्या खूप वेगळी आहे. माझ्यासाठी पैसा खुप महत्त्वाचा आहे. प्रेम वगैरे दुय्यम गोष्ट आहे माझ्यासाठी. मला खूप श्रीमंत व्हायचे आहे. आणि आयुष्य हे एकदाच मिळतं त्यात मला सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे.”
” ‘या’ च आयुष्यातला गर्लफ्रेंड चा अनुभव मी तुझ्यासोबत घेतला. तू एक मुलगी आहे हेच माझ्यासाठी महत्वाचं होतं.” एवढं सांगून ‘श्री’ तिथून निघून गेला.
तेव्हापासून तर आजपर्यंत ‘श्री’ ने कधी तिचा विचार केला नाही की कधी तिला भेटला ही नाही.

‘श्री’ विदेशात च स्थायिक झाला. खूप पैसा कमावला. लग्न केलं, ‘श्री’ ची बायको एका श्रीमंत घराण्यातील एकुलती एक मुलगी, सुंदर , आणि मोठ्या कंपनीत नोकरी करणारी..

‘श्री’ च आजपर्यंत च आयुष्य खूप सुखात आणि मजेत गेलं असलं तरी ‘श्री’ समाधानी नव्हता.. त्याला कसलीतरी कमी जाणवत होती. त्याची बायको अनंतात विलीन होऊन बराच काळ लोटला होता. त्यानंतर तो त्याच्या मुलांसोबत राहिला. मूलं मोठी झाली आणि आपापल्या विश्वात रमली..
पण आज त्याला एकटेपणा जाणवत होता. अशावेळी तो बायको नव्हे तर ‘तिच्याच’ आठवणीत जास्त रमला होता…

आज ‘श्री’ ला कळलं की तो ‘तिच्याशी’ जे वागला ते चुकीचं होतं. तो स्वतः शीच बोलू लागला- “मी तिला खूप दुखावलं. माफी मागावी म्हटलं तरी कशी?? कारण ती आता मला कधीच भेटणार नाही.”

पण आता तिची भेट होणे ‘श्री’ ला खूप गरजेचं वाटत होतं. त्याचं चुकीचं वागणं त्याला च सलत होतं.

परत तिचा आवाज ‘श्री’ ला आला..
‘श्री’ काही बोलण्याआधीच ती ‘श्री’ ला म्हणाली, “तू माझा, माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा, माझ्या स्त्रीत्वाचा,माझ्या चांगुलपणा चा, माझ्या शालीनतेचा, माझ्या सहनशीलतेचा अपमान केलास.”
“अरे मी तर तुला कधीच माफ केलंय, पण मी स्वतःला कधीही माफ करणार नाही. कारण चूक माझी होती की, मी तुझ्यावर विश्वास ठेवला.”

दारात ती पाठमोरी उभी होती…
तिच्या त्या पाठमोरी आकृतीकडे ‘श्री’ बघत होता.. ती आकृती ‘श्री’ पासून दूर जात होती पण तिचा आकार तेवढाच मोठा होत होता.

स्वप्न होतं ते परत ‘श्री’ चं.. पण तिचं स्वप्नातला एकूण एक शब्द ‘श्री’ च्या मनाला लाजवणारा होता.
त्याचं मन त्यालाच खात होतं.

‘श्री’ ची चूक त्याला कळली होती पण आता खुप खुप उशीर झाला होता.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा