ऋणानुबंध…प्रेमाचे – भाग १

Written by

“आई, मला आज डब्याला काय देणार”.. असे म्हणून छोट्याश्या रियाने आपले हात तिच्या आईच्या गळ्यात टाकले.. आई ने रियाचां छोटासा पापा घेऊन बोलली” पोळीचे लाडू ” केले आहेत ..

“पोळीचे लाडू” ऐकुन  रियाला आपल्या लहानपणीचा प्रसंग आठवला.. आई बरोबर घालवलेले ते क्षण आठवले… तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले.. खरंच किती दिवस झाले आईला जाऊन.. पाच वर्ष अशीच निघून गेली आयुष्यातली.. अजूनही तो दिवस आठवतो.. माझ्या हातात आईने  प्राण सोडले होते.. तिचे शेवटचे शब्द अजूनही कानावर पडतात… “सुखी राहा बाळा.. तुझा सुखी संसार बघायला मला आवडले असते…”..” कुठे गेली आई तू.. कसे सांगू ग तुला … माझ्या सुखी संसाराचे स्वप्न कधी पूर्ण च होणार नाही ग.. संसार रुपी गाडीला लागणारी दोन चाके..त्यामधील ..एक चाक कुठे तरी हरवून गेले आहे आई… कसे शोधू त्याला.. “

“रिया ..रिया.. कुठे हरवली ग… हा घे लाडू.. खाऊन चल पटकन … शुभंकर सरांनी मीटिंग ठेवली आहे सकाळीच.. ” साक्षीचे शब्द ऐकले आणि रिया भानावर आली…

साक्षी आणि रिया एकाच कंपनी मध्ये काम करत होत्या.. गेली तीन वर्ष त्या एकमेकांना ओळखत होत्या…रिया एक हुशार तितकीच बघताच क्षणी नजरेत बसावी अशी.. कामामध्ये स्वतः ला  झोकून देणारी अशी होती.. रिया मुंबई मध्ये भाड्याने राहत होती..तीची आई गेल्यापासून रिया एकटीच पडली होती…

दोघी पटकन उठून कॅन्टीन मधून ऑफिस कडे वळल्या..जाता जाता रिया ने साक्षीला विचारले.. “कसली मीटिंग आहे साक्षी.. सकाळ सकाळ.. तू काही गडबड केली आहे का रिपोर्ट्स मध्ये…? “…”नाही तर.. I think. कोणी न्यू बॉस येणार आहे.. ” साक्षी म्हणाली. रिया मनात विचार करते.. “हिच्याकडे नेहमीच इन्फॉर्मेशन असते.. कसली भरी आहे ही”.. मला काहीच माहिती नसते या ऑफिस मधले..”

पूर्ण टीम कॉन्फरन्स रूम मध्ये एकत्र जमलीअसते. शुभंकर सर येतात..  “Good morning everyone..Any guess? why we have meeting today?  ”  शुभंकर सरंचा आवाज ऐकून सर्व शांत होतात..”उद्या आपल्याकडे न्यू टीम हेड जॉईन होणार आहेत.. ते आपल्या बँगलोर ब्रांचला असतात… आपल्या इंडियन रिजनल हेड    MR. Mathew  यांनी त्यांना इथे अॅपॉइंत केले आहे..  He is brilliant guy..because of his knowledge and experience in technical project..we have achieved lots of big projects in Banglore branch..” so..  tomorrow ..be on time.. I don’t want single excuse from anyone.

“okay let’s back to work now.. ohhh.. sorry  मी तुम्हाला त्यांचे नाव सांगायलाच विसरलो.. शुभांकर सर पुन्हा थांबले. His name is विनय देशमुख.

“विनय देशमुख”.. हे नाव ऐकून .. रिया जागीच थांबली.. खरंच मी हे नाव ऐकले का??  रिया विचार करू लागली…

” रिया .. आंग रिया..काय झाले चल ना … थांबली का आहे इथे ? सक्षीचे शब्द ऐकून रिया भानावर आली..आपल्या जागेवर जाऊन बसली.. पण कुठे लक्ष नीट लागत नव्हते.. विनय हे नाव ऐकून हरवली होती कुठे तरी.. ” हा खरंच विनय असेल का..?? तिचे एक मन ..हो म्हणत होते.. आणि एक मन नाही म्हणत होते.. जर विनय असेल तर तो बँगलोरला  कधी गेला??  नाही ..नाही.. मी का इतका विचार करत आहे.. ? जाऊन दे असे म्हणून ती कामाला लागली..

संध्याकाळी, काम झाल्यावर साक्षी ने रियाला आपल्या बाईक वरून घेऊन घराकडे निघाली.. रिया काहीच बोलत नव्हती..साक्षी ने बाईक थांबवली.. ” रिया..रिया.. घर आले तुझे..उतर्तेस ना.. काय झाले कुठे हरवली आहे..? सकाळपासून पाहते आहे तुला..” रिया उतरली.. ” नाही नाही काही नाही ग .. येते मी म्हणून निघून गेली …” साक्षी ने तिच्या विंडो मध्ये पहिले लाईट ऑन झाली होती.. साक्षी किक मारून निघून गेली.

रिया फ्रेश होऊन किचन मध्ये जाऊन काय बनवावे विचार करू लागली.. तेवढ्यात घराची बेल वाजली.. अरे इतक्या रात्री कोण आले?.. म्हणून रिया जाऊन बघितले तर समोरच्या काकू होत्या.. “रिया थोडे दूध आहे का ग .. तुझ्या काकांना चहा हवा आहे आणि दूध संपले आहे”.. “आहो काकू आहे ना ..थांबा आणांते”..असे बोलून रिया ..दूध आणून देते..

जेवायला  काय करावे … असा प्रश्न असताना .. तिला फक्त मॅगी आठवते.. आणि मॅगी खाऊन ती आपल्या रूम मध्ये जाऊन बेड वर पडते.. काही केल्या रिया झोप येत नसते.. कोण आहे हे नविन बॉस.. खरंच का ” विनय देशमुख” असेल त्याचे नाव.. ??  विचार करता करता रियाला तिचा तिच्या फर्स्ट जॉब मधले पहिला दिवस आठवला…

घाई घाई करत.. रिया घरून निघाली होती… ऑफिसचा पहिला दिवस होता.. आणि रियाला उशीर झाल्याने ने ती धावतच होती.. कशीबशी रिया ऑफिस कडे पोहचली असते.. आणि लिफ्टकडे जातच असते की लिफ्ट बंद होताना तिला दिसते..” अरेरे.. आता अजून लेट होणार… त्याचा क्षणी लिफ्ट ओपन होते.. रिया खुश होऊन लिफ्ट मध्ये शिरते… समोर लक्ष्य जाताच एक छान हसून .. Thank you . म्हणते.. समोर एक तरुण , उमदा मुलगा उभा असतो. रियाला  पाहून किंचितसा हसला .. रिया ने त्या हळूच तिरक्या नजरेने पाहिले . पाहताच क्षणी कोण असेल हा.?. मस्त आहे…स्मार्ट, हँडसम, परफेक्ट बॉडी आणि गव्हाळ रंगाचा .कोणीही हरवून जाईल त्याच्यामध्ये… अशा काही छटा उमटल्या तिच्या मनात..

त्याने हळूच विचारले , ” which floor?” रियानें seventh म्हंटले…दोघे ही seventh  floor la उतरले .. रियचा पहिला दिवस असतो , तिला उशीर झाला असतो.. ती धावतच तिच्या ऑफिस मध्ये जाते..आणि एच आर ला जाऊन भेटते.. एच आर सर्व formalities करून घेते..आणि तिची जागा दाखवते.. रिया आपल्या जागी येऊन बसते.. तिचा हा first job असतो.  तिने आपल्या सोबत गणू बाप्पालाही आणले असते.. त्यांना तिच्या टेबल वर ठेवून नमस्कार करते”… हे कोण तरी समोरच्या केबिन मधून बघत असते.. त्यांना खूप नवल वाटते हीचे..

थोड्यावेळाने एच आर येऊन तिला एका केबिन मधे घेऊन जाते ..तिथे जाताच क्षणी रियाला थोडा शॉक लागतो..”अरे हा तर तोच आहे.. लिफ्ट्वाला.. wow.. अशा असे चुकून रीयाच्यां तोंडातून निघते.. आणि हळूच ओठ चावून थांबते.. एच आर तिला ओळख करून देते..

“Riya, he is your boss..his name is Vinay Deshmukh.. onwards he will assign you all the work to you…”

Mr.Vinay, She is Riya Sonak” she is the new joinee here..She will work under you from today.. “

असे म्हणून एच आर निघून जाते.. रिया तिथेच उभी असते.. विनय तिला बसायला सांगतो.. आणि पाच मिनिट आपल्या लॅपटॉप मध्ये काम करत राहतो… रिया बसून विनय चे हावभाव भागात असते… तिला वाटते .. विनय ने तिला ओळखले नसते.. पण रिया तर त्याला पाहताच क्षणी जणू हरवून गेली होती.. विनेने ही रियाला पहिले असते.. पण तो तिच्या लक्षात आणून देत नसतो.

हळूहळू दिवस जात असतात.. रिया आपले काम परफेक्ट करत असताना छोट्या मोठा चुका होत असतात.. विनय तिला मध्ये मध्ये खूप ओरडत असतो.. तिला खूप वाईट वाटत असते पण तरीही ती आपले काम करत राहायची.. तिला नेहमी वाटायचे विनय सर मला नेहमीच ओरडतात.. कधी मला चांगले बोलत नाही.. मी त्यांचा खूप विचार करते का..?? का मला असे होत आहे.. आज इतके दिवस आले पण विनय सर कधीच माझ्याकडे बघत नाही.. त्यान्हा माझ्या डोळ्यात काहीच दिसत नाही का..??  रिया कुठे तरी विनय ल लाईक करून लागली असते.

पुढे काय होणार रिया आणि विनय चे … विनय ला  रिया चे प्रेम समजले होते का??  जाणून घ्या भाग २ मध्ये

Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा