ऋणानुबंध…प्रेमाचे – भाग ८

Written by

सकाळी रात्रीच्या आठवणी नंतर रिया साक्षी सोबत ऑफिस ला जायला निघाली असते…खरंच विनय असणार का ऑफिस ला….???

साक्षी आणि रिया ऑफिस ला पोहचतात आणि आपल्या कामाला लागतात…रिया चे मध्ये मध्ये लक्ष्य शुभंकर सरांच्या केबिन कडे असते…पण केबिन मधून काही हालचाल जाणवत नसते तिला..

थोड्या वेळाने सर्व टीम ला कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवणे येते…पूर्ण टीम तिथे जमली असते…रिया ही आपल्याच विचारात तेथे बसली असते…आणि अचानक शुभंकर सर कोणाला तरी घेऊन आत येतात….सर्वांचे लक्ष्य तिथेच असते पण रिया आपल्या मोबाईल मध्ये काही तरी करत असते…१० टीम members  एकाच ठिकाणी असतात…रिया पाठी बसली असते…शुभंकर सर बोलायला लागतात..

good morning everyone…As discussed yesterday, we have our new team head here… he is Mr. विनय देशमुख… आणि विनय कडे बघून बोलू लागतात… हे आपल्या बँगलोर ब्रांच ला होते..आता आपली technical team  पूर्ण यांच्या सोबत काम करणार आहे..

विनय देशमुख बोलू लाग तात…हॅलो everyone … मला खूपच excitement आहे तुमच्या सोबत काम करायला…आपण सर्व मिळून या कंपनी ला खूप पुढे नेऊ.. आणि त्याचे लक्ष पाठी बसलेल्या रिया कडे जाते…आणि विनय शॉक होतो..त्याच्या तोंडून हळूच रिया असे निघते… रिया ला ऐकायला येते… ती त्याच्या कडेच बघत असते कधीपासून … डोळेही भरून आले असतात…सर्व शांत असतात…. शुभांकार सराना ही कळत नाही मध्येच विनय का थांबले म्हणून ..ते पुन्हा विनय ला हाक मारतात…विनय everything is ok??

विनय जरा नॉर्मल होत त्यांना काही नाही असे बोलून गप्प राहतो… शुभंकर सर सर्वांची ओळख करून देत असतात…रिया सोबत साक्षी ही विनय कडे बघत असते…विनय ला बघून साक्षी जरा खुश झाली असते..विनय च्या personality  वर खूष असते ती..साक्षी हळूच रिया ला बोलते.. वाह.. काय छान टीम हेड सोबत काम करायला भेटणार आहे…रिया तेव्हा कुठे थोडी भानावर येते…इथे शुभंकर सर प्रत्येकाला विनय सोबत introduce करत असतात..आणि शेवटी रिया कडे येतात… mr. विनय …here is our one of the best project manager  Riya..

रिया फक्त थोडेसे हसते आणि हॅलो सर म्हणून त्याला हात मिळवण्यासाठी..हात पुढे करते…विनय फक्त तिच्या कडे बघत असतो…विनय खूप शांत असतो..त्याला काय बोलावे समजत नसते…आज असे अचानक रिया समोर आल्याने विनय ला स्वतःवर कसे कंट्रोल करावे समजत नसते… विनय तिच्या हातात हात घेऊन हळूच तिला hi Riya  म्हणतो..कशी आहेस??. हे ऐकुन शुभंकार सर विनय ला बोलतात ..तुम्ही ओळखतात का एकमेकांना??

तो..हो बोलतो…आम्ही एकाच ऑफिस मध्ये होते खूप आधी…शुभंकर सर ओके बोलतात…मग चांगलेच आहे…रिया तुला यांच्या सोबतच पुढे काम करायचे आहे…
विनय ..रिया खूप छान employee  आहे..विनय तिच्या कडे बघत बोलतो ..हो मला माहिती आहे..रिया फक्त विनय कडे बघत असते…कोणाचे लक्ष नसताना हळूच ती डोळ्यात आलेले पाणी पुसते..हे फक्त विनय ने पहिले असते ..पण विनय काही बोलत नाही ..

शुभंकर सर विनय ला बोलतात..चला मी तुम्हाला तुमचे केबिन दाखवतो..विनय आपल्या केबिन मध्ये जाऊन बसला असतो..रिया आणि साक्षी ही आपल्या जागेवर येतात ..साक्षी आणि रिया चे बोलणे चालू होते…

रिया…हे विनय सर खूप हँडसम आहेत ग..मला तर खूप आवडले…किती कमी वयात ते टीम हेड झाले आहेत..मी तर फिदा आहे त्यांच्या वर….साक्षी बोलते.

रिया फक्त तिला hmm म्हणते..रिया तू त्यांना ओळखते का..? ते बोलले ना ..तुम्ही आधी एकाच ऑफिस मध्ये होतो…कसे होते ग…त्यांचे लग्न वैगरे झाले आहे का???.रिया तिच्याकडे बघत आणि हस्ते…मला नाही माहिती….

ओके…girlfriend  होती का ग त्यांची…..?? असेल तर कदाचित लग्न ही झाले असेल ना त्यांचे… शीट….मजा चान्स गेला वाटतो…आणि छोटासा चेहरा करून रिया कडे बघू लागते…रिया थोडी हस्ते आणि तिला कामाला जायला सांगते..

साक्षीला कळते रि याचे काही तरी बिनसले आहे…रिया काय झाले मी काल पासून बघत आहे तुला ..तू अशी उदास..शांत का आहे..?? काय झाले आहे नक्की??

रिया – काही नाही ग..चल काम कर ..माझी मीटिंग आहे शुभंकर सर आणि विनय सारांसोबत…थोड्यावेळाने..खूप सारे पॉइंट्स discuss करायचं आहेत…

ओके..ओके…म्हणून साक्षी कामाला लागते..

इथे रिया का काहीच सुचत नसते… विनय कसा आला इथे.  कसा असेल तो…आज इतक्या दिवसांनी मी पाहत आहे विनय ला.. माझी आठवण नाही का रे आली तुला..कशी आहे मी …कुठे आहे.???. कधीच आठवावे किंवा शोधावे वाटले नाही का तुला ..एका चातकाप्रमाणे तुझ्या येण्याची वाट पाहत राहिली रे मी…मावशीने मला किती समजावले होते रे…का नाही मला थोडा वेळ दिला…मी आली ना रे तुझ्यासाठी सर्व सोडून पण तू …तू कुठेच नाही होता ..माझ्या एका चुकी साठी तू इतकी मोठी आयुष्य भरासाठी शिक्षा दिली आहे विनय…

आज ही तुझे डोळे मला खूप शुष्क वाटले रे..त्या मध्ये कुठेच मला प्रेम नाही दिसले माझ्यासाठी..दिसली ती फक्त आपुलकी..कसली आहे ती आपुलकी…खूप बोलायचे आहे तुझ्या सोबत विनय…खूप काही ऐकायचे आहे मला..बोलशील का रे तू माझ्याशी…तुला नाही का बोलायचे माझ्याशी..तुझी रिया  तिथं थांबली आहे रे …चार वर्ष आधी जिथे होती तिथं…तू गेला का रे पुढे.???… असो…पण मी नाही विसरू शकत तुला विनय….असे विचार करत करत रिया लेडीज रूम कडे जात असते…आणि विनय कॉन्फरन्स रूम मधून बाहेर येत असतो आणि एकमेकांना ते धडकातात…आणि पाहतच राहतात…दोघांसाठी जणू आजूबाजूचे जग थांबले असते…. रिया ला हळूच विनय पकडतो..पडण्यापासून…आणि म्हणतो ..अरे रिया सावकाश ..अजुनही तशीच आहेस ग.. वेंधळी…!!!!आणि हसतो..रिया ही किंचितशी हस्ते..आणि फक्त आजूनही मी तिथेच आहे विनय…म्हणजे.???..विनय बोलतो…काही नाही म्हणून रिया बोलून लेडीज रूम मध्ये निघून जाते…

रिया अशी का बोलली.??..हे विचार करत करत ..विनय आपल्या केबिन मध्ये जातो…रिया ला काय बोलायचे होते…आज ही रिया किती तशीच आहे…तोच निरागसपणा..तेच चेहर्या वरचे भाव..पण तिचे हसू कुठे तरी हरवले आहे…ती ठीक असेल ना..आणि कधी आली ती US
पण. वरून..मानव पण आला असेल का??? सुखी असेल ना रिया… शिट…मी तिला विचारायला हवे होते मानव बद्दल..कसे वाटले असेल तिला…???मी खूप formal बोललो का ग रिया??…आजही तुझी आठवण येते तेव्हा तुझ्या फोटो शी बोलतो मी रिया…तुला नाही विसरलो मी…तुला मुद्दामून न सांगता मी गेलो तुझ्या लाईफ मधून ..मला माहित होते रिया…तू तुझ्या आईसाठी मानव सोबत लग्न करायला तयार झाली होती..मला तुझी जबाबदारी कळत होती  रिया आणि म्हणूनच मी तुझा मार्ग सोपा केला होता…तुझ्यासाठी हेच योग्य आहे.. विचार करत असताना शुभंकर सर येतात..

विनय .. मे आय कम इन?

सर ofcourse तुम्ही फॉर्मालिटी का करत आहात…

सर हसतात..आपण १० मिनिट मध्ये मीटिंग स्टार्ट करू..you know Riya right..?? she will assist you in our future prospective projects..

विनय ला थोडेसे बरे वाटते…तो सरान्हा ओके बोलतो…१० मिनिटं विनय रिया आणि सर कॉन्फरन्स रूम मध्ये जमले असतात…

शुभंकर सर दोंघनही फ्युचर प्लॅन्स सांगत असतात. विनय आणि रिया दोघे मन लावून सर्व ऐकत असतात आणि आपली मते प्रदर्शित करत असतात..त्यांची मीटिंग एक तास चालू असते…मीटिंग संपल्यावर सर्व जायला निघतात..तेव्हा विनय सर ना सांगतो.. सर तुम्ही हरकत नसेल तर मला रिया शी थोडे बोलायचे आहे कामाच्या बाबतीत..हो हो विनय बोल ना..मी येतो..असे बोलून सर जातात…रिया पुन्हा येऊन बसते….विनय ही तिच्या बाजूला येऊन बसतो…

थोड्यावेळ कोणीच काही बोलत नाही….

काय झाले सर ..काही राहिले आहे का आपले discuss करायचं..रिया बोलते…

आजूनही सर बोलणार रिया मला..??.एवढे विनय चे ऐकुन …रिया ल रडायला येते….तिचे डोळे गच्च पाण्याने भरतात..तिला आधीचे दिवस आठवतात..जेव्हा विनय हेच वाक्य तिला बोलला होता…ती त्याच्या कडे लक्ष्य न देता कुठे तरी बघत  बसते…

विनय पुन्हा बोलतो…नाही बोलणार का तू??

रिया – विनय… इतकेच बोलून रिया आपले तोंड एका बाजूला घेऊन हात ठेवून रडू लागते..इतक्या वेळ ….जमवून ठेवलेलं मनात सर्व बाहेर येते…

रिया ..री यू… काय झाले ..का रडते…??नको ना रडू..

विनय कुठे होता इतके दिवस…? तुझ्या पासून दूर गेलो होतो…तुला सुखी बघावे म्हणून…

विनय बोलतो पुन्हा ते जाऊन दे..तू कशी आहेस…US  वरून तुम्ही कधी इथे शिफ्ट झाले…मानव कसा आहे..?

हे ऐकुन रिया शांत होते …काहीच बोलत नाही…रिया काय झाले बोल ना…काही नाही रे …रिया विचार करून बोलते.. मी जाते विनय काम आहे खूप…असे बोलून रिया निघते आणि तिच्या जागेवर जाते…

का अशी वागली रिया..?? मानव चा विषय काढल्यावर..निघून का गेली…सर्व ठीक असेल ना…?? भेटू का तिला संध्याकाळी .पण ….मला ही घरी लवकर जावे लागेल..?? घरी आर्या वाट बघत असेल माझी…नाही नको..बघतो आज नको..लगेच ..रिया ला काय वाटेल?

विनय कामाला लागतो..संध्याकाळी….पार्किंग मधून निघताना विनय ला रिया थांबलेली दिसते… तो कार घेऊन तिला विचारतो…”रिया..वाट बघत आहे का कोणाची..?? घरी सोडू का तुला..?? “

रिया – नाही नाही..मी जाईल विनय..?साक्षी येईल आता ती मला सोडते रोज..

विनय – are you sure?? ..मी  सोडतो नाही तर तुला..

रिया – नको ..मी जाईल खरेच…ही बघ आलीच साक्षी… साक्षी आल्यावर रिया विनय ला bye .. करून लगेच साक्षी सोबत बसून निघून जाते..

विनय बघतच बसतो… ही मला अवोइड करत आहे का?? अशी का वागत आहे रिया…आपण आता friends  पण नाही राहिलो का?? हो…तुझे बरोबरच आहे…तुला न  सांगताच मी तुझ्या लाईफ मधून गेलो होता ना..पण तेच योग्य होते रिया..मी तुला नाही पाहू शकलो असतो..तुझे लग्न होताना कोणासोबत…आणि कदाचित आता तुला वाटत असावे मी तुझ्या लाईफ मध्ये प्रोब्लेम करेल ….नाही रिया तसे नाही होणार…आदिही तसे झाले नाही आणि आताही नाही…!!!!

रिया घरी न जाता साक्षी ला एका जवळच्या उद्यानात गाडी थांबवायला सांगते…साक्षी तिला विचारते काय झाले..इथे का उतरते…रिया बोलते..”सहजच ग …. इथे आले का जरा बरे वाटते… मोकळे वाटते.. तू जा घरी तुला उशीर होईल…”
रिया उद्यानात जाते…रिया इथे वरचे वर येत असते…उद्यानात चां लहान मुलांना खेळायला पाळणे, घसरगुंडी, शिसो…आणि इतर गोष्ठी असतात..एका ठिकाणी छोटे प्लेन ट्रॅक केला असतो लहान मुलांना स्केटिंग साठी…एक जॉगिंग ट्रॅक असतो…थोडे पुढे गेल्यावर एक नैसर्गिक छोटे तलाव असते..त्यांची सजावट केली असते…तलावात कमळ.. बदक अस् तात छोटी छोटी..रिया ला नेहमी एकटे वाटले का ही..इथे येत असते..लहान मुलं खेळताना . स्केटिंग करताना बघून तिला खूप बरे वाटत असते..आगदी तास दोन तास रिया इथे बसून राहायची…आणि मग कधी तरी घरी जायची…आज ही अशीच बसली असते…सूर्यास्त होताना बघून तिला खूप भरून येत असते..जुने दिवस आठवताना तिला खूप आठवण येत असते विनय ची….विनय किती बदलला वाटतो…खूपच  शांत झालेला वाटतो..पहिला किती रागवाय चा छोट्या छोट्या गोष्टीवरून…असा विचार करून तिलाच हसायला येते…सूर्य मावळतीला आलेला पाहून रिया घरी जायला निघते..

क्रमशः

भक्ती

…. . तुमच्या comments खूप प्रोत्साहन देतात..काही चुकत असल्यास कळवावे.. जेणेकरून मी माझ्या लिखाणात सुधार करेल.. धन्यवाद!!!!!

…..

Article Tags:
Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा