ऋणानुबंध…प्रेमाचे – भाग 10

Written by

रिया चि आणि आर्या माई ची भेट होते…दोघांमध्ये एक नवीन नाते निर्माण होण्याच्या सीमेवर असते…

…..

रिया घरी गेल्यावर फ्रेश होऊन कड क  चहा बनवते…तिला आज खूप फ्रेश वाटत असते..कधी नवे ते स्वतःसाठी छान स्वयंपाक बनवते…काही तरी गोड बनवावे म्हणून मुगाच्या डाळीचा शीरा ही बनवते..शीरा बनवताना थोडासा उद्या आर्या आणि माई साठी घेऊन  जावा असाही विचार लगेच येऊन जातो तिच्या मनात..छान पैकी जेवण झाल्यावर…ती टीव्ही बघत बसते…तेव्हाच अचानक तिला विनय चां मेसेज येतो..

विनय – हाय रिया…झोपलीस का??

रिया – नाही..जेवण झाले.??

विनय – distrub नाही केले ना??

रिया – नाही रे… सहज  मेसेज केलास??

विनय – हो..actually .. सहज उद्या मॉर्निंग ला लवकर येशील..?? आज सांगायला विसरलो..मॉर्निंग ला थोडे discussion करायचे आहे…यूके च्या  प्रोजेक्ट बद्दल बोलायचे आहे..

रिया – ओके ..नो प्रॉब्लेम!!🙂

विनय – येऊ का तुला घ्यायला घरी..सकाळी..

रिया –  नको नको… मी येईल

विनय – ओके…good night 😊

रिया – good night

रिया ही झोपते..इथे विनय विचार करतो..मी का रिया कडे attract  होत आहे. मला असे वाटते  की ती मला टाळत असावी..बरोबरच आहे. . असेही लग्न झाले आहे तिचे..का कुठल्या नात्यात गुंतत जायचे..???

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच विनय आणि रिया ऑफिस ला पोहचतात आणि मीटिंग चालू करतात..रिया ला न्यू प्रोजेक्ट साठी presentation बनवायचे असते आणि ह्या साठी विनय ची मदत घेणार असते…दोघांना मिळून त्यांना हे presentation शुभंकर सरां ना  present करायचे असते..दोघे ही दुपार पर्यंत कामा मध्ये गुंथुन गेले असतात…जेवणाची वेळ होऊन कधी ३ वाजले असतात हे समजत नाही दोंघना.

मानव रिया ला बोलतो.. अग किती काम करतेस भूक नाही लागली का .??.चल जाऊ जेवायला.

नको..नको..विनय just 10 minutes… मग जाऊ …

चालेल पण मी सांगेल तिथे जायचे..विनय बोलला

रिया – म्हणजे..??

विनय – घाबरु नको रिया..जेवायला बोलतो आहे मी..एक रेसटॉरंट आहे इथे जवळच ..चल जाऊ..

रिया – अरे पण मी टिफीन आणला आहे..

विनय – चालेल ग एक दिवस…संध्याकाळी खा घरी जाऊन..

आणि दोघेही हसतात…थोड्या वेळाने दोघे ही लंच करायला जातात..

रेस्टॉरंट मध्ये दोघे सामोरासमोर बसले असतात…विनय विचारतो काय घेणार रिया..??.काहीही चालले..तुम्ही ऑर्डर द्या..ओके बोलून विनय वेटर ला तिच्या आवडीची ऑर्डर देतो..

रिया विनय बोलू लागतात..

रिया – विनय प्रेझेंटेशन होईल ना नीट ..मला शुभंकर सरां ची भीती वाटते..

विनय – अरे खूप छान ppt बनवला आहे.. नक्की होईल..आणि मीही आहे ना ..you don’t worry..

रिया – thanks…

विनय – thanks  काय बोलतेस..मी नेहमीच असेल तुझ्यासोबत..रियच्य डोळ्यामध्ये बघत विनय बघू लागतो..

रिया ला कळते ..पण ती न समजल्या सारखे दाखवते..

विनय – एक विचारू रिया..

रिया – बोल ना!!!

विनय – तुमचे सर्व नीट चालू आहे ना??

रिया – म्हणजे??

विनय – म्हणजे तुझे आणि मानव चे??
रिया अचानक शांत होते… विनय विचारतो काय झाले..काही बोलत का नाही..

रिया – विनय तुला काही तरी सांगायचे होते खूप दिवसापासून पण कधी भेटलाच नाही इतक्या वर्षात..आणि आता भेटला आहेस तर इतके दिवस होऊन गेले की मी काही सांगण्याने तुझ्या लाईफ मध्ये काही प्रोब्लेम यायला नकोत…

विनय – अशी का बोलते रिया ? बोल ना तू??

तेव्हाच त्यांची ऑर्डर वेटर घेऊन येतो..आणि त्यांना जेवण सर्व्ह करतो…दोघेही जेवण घेऊ लागतात…एक विचित्र शांतता असते…दोघांमध्ये…

विनय च बोलायला लागतो..”रिया मला चुकीचे नको समजू ..पण मला तुला इतक्या वर्षांनी बघून खूप बरे वाटले..मी खर तर मुंबई ला कधी येणारच नव्हतो..जे काही झाले त्या मुळे..मी सर्व जुने संपर्क संपवून नवीन दिशेकडे निघालो होतो..इतक्या वर्षात खूप काही बदलले.. पण आई चे म्हणणे होते की बस झाले आता बँगलोर ला ..परक्या सिटी मध्ये ..परकी माणसे…सर्व वेगळं झाले होते तिच्या साठी…आमचे सगळे नातलग इथे होते…म्हणून office  मधून  खूप फोर्स झाला आणि इथे आपल्या ऑफिस ला माझी गरज ही होती म्हणून इथे आलो…आई ही खुश झाली..आणि माझे पिल्लू पण..

रिया – पिल्लू ????

विनय – अग तुला सांगायलाच विसरलो…मला एक मुलगी आहे!!

हे ऐकताच रिया ला खूप शॉक लागल्यासारखे झाले …काय बोलावे आणि काय नाही हे तिला कळतच नव्हते..

रिया..रिया…काय झाले..विनय ने रिया ला हाताला हात लावून हलवले…

नाही नाही…. काही नाही..वाह .. छान.. किती वर्षाची आहे..रिया बोलली…३ वर्षाची…विनय ने सांगितले..

मस्त विनय …खूप छान वाटले ..ऐकुन…रिया च्या डोळ्यात पाणी आले होते पण तिने ते अडवून  ठेवले….

रिया विनय ला ..excuse me म्हणून वॉश रूम ला जाऊन आली आणि तिथे…तिच्या अश्रूंना मोकळे केले..थोड्यावेळाने रिया फ्रेश होऊन आली…

काय झाले रिया..everything is ok??  distrub  वाटत आहेस?? नाही रे काही नाही….रिया बोलली…

रिया एक विचारू विनय बोलला… तुझे कसे चालू आहे…???

रिया उठू लागली..तसे विनय ने तिचा हात पकडला…रिया काय झाले?? मी तुला आधी ही विचारले…तू बोलत का नाही या विषयावर???

अरे काही नाही विनय …चल उशीर होत आहे ..सर वाट बघत असतील…रिया बोलते

चालेल रिया थांब थोड्यावेळ ..आज तुला सांगावे लागेल…विनय बोलला

तशी रिया बसली..आणि बोलू लागली काय सांगू तुला..??

चिडते का इतकी.??..माझी सवय लागली का.??.आणि विनय हसू लागला… अग ..फक्त इतकेच विचारायचे होते की तुझे नीट चालू आहे ना…मानव कसा आहे.???.इथे कधी आली….?

थांब विनय…आणखी काही बोलायच्या आधी मला तुला काही सांगायचे आहे….रिया बोलली

विनय ..काय झाले ??

रिया बोलू लागली..”माझे आणि मानव चे लग्न झालेच नाही कधी…किंबहुना मी कोणाशीच लग्न केले नाही…”.

विनय शॉक होतो आणि तो जवळ जवळ ओरडतोच …काय???  कसे??? असे कसे झाले..रिया..आणि तो रिया कडे पाहतो…रिया काहीच बोलत नसते..??
खूप मोठी स्टोरी आहे विनय..चल आपल्याला उशीर होत आहे..already I received a messaged from shubhankar sir..

विनय फक्त ओके बोलतो आणि बिल पे करून दोघे निघतात…ऑफिस ला जाता जाता दोघे ही खूप शांत असतात..कोणीही काहीच बोलत नाही..किंबहुना विनय चे मनामधेच संघर्ष चालू असतो स्वतःशी…का?? असे झाले..मला का नाही कळले..? रिया खरे बोलत असेल का..पण ती आता का खोटे बोलेल..??

क्रमशः

भक्ती

धन्यवाद!

Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा