ऋणानुबंध…प्रेमाचे – भाग 11

Written by

रिया आणि विनय जेवण करून ऑफिसला येतात…रिया ने विनयला तिचे लग्न झाले नाही असे सांगितले ..पुढे काय होणार????

……

” माझे लग्न कधी झालेच नाही…” हे रीयाचे वाक्य विनय च्या कानामध्ये घुमत असते..असे का केले रिया ने…की मानव ने रियाला नकार दिला होता का?? त्याला माहिती पडले असेल का?? रिया ला काही त्रास झाला असेल का तेव्हा???  रिया ने काही कळून दिलेच नाही मला…पण??? मी होतो कुठे??? मी सर्वच सोडून गे लो  होतो…असे कसे झाले??? मला तिला विचारायलाच लागेल..मला समजलेच हवे?? नाही नाही…मी असे विचार करून करून वेडा होईल रिया…मी इतके वर्ष समजत होतो की तू सुखी असेल आता…हे का असे झाले….???

“आपल्यातले नाते संपले होते रिया ..पण माझे प्रेम तसेच होते”

मी तुला असे दुःखी नाही पाहू शकत…माझ्याशी बोल रिया… तुला बोलावे लागेल..

तेव्हाच रिया येते विनय च्या केबिन मध्ये..विनय ला अस्वस्थ पाहून ती त्याला विचारते..काय झाले?? are you ok? ..विनय  तब्येत ठीक नाही का विनय??

नाही नाही रिया ठीक आहे..काय झाले..काही काम आहे का? विनय रिया ला विचारतो.

“हो रे .. सरना आताच प्रेझेंटेशन बघायचे आहे..कारण उद्याच क्लाएंट येणार आहे”. रिया बोलते.

ओके..चल जाऊ..म्हणून दोघे ही कॉन्फरन्स रूम मध्ये जातात..

“very well Mr. विनय and Riya.. खूप छान झाले प्रेझेंटेशन मला तुमच्या कडून हीच अपेक्षा होती आता उद्या क्लाइंट आल्यावर रिया तू आणि विनय दोघांनीच प्रेसेंटेशन द्यावे कारण हे तुम्हीच बनवले आहे आणि तुमच्या पेक्षा बेटर हे कोणाला कोणी करू शकत नाही सो विल्ल मी ट  टुमारो मॉर्निंग चला आता खूप लेट झाला आहे आपण घरी जाऊ या तुम्ही निघा असे बोलून शुभांकर सर आपल्या केबिनमध्ये जातात

रिया आणि विनय ही आपल्या केबिनमध्ये जाऊन बॅग पॅक करतात . रियालाही थोडी घाई असते तिला ऑफिस मधून निघून गार्डनमध्ये आर्या जाऊन भेटायचे असते पण या कामाच्या गडबडी मध्ये ती विसरूनच गेली असते कि तीने आर्याला प्रॉमिस केले आणि तिच्या साठी शीरा आणला असतो .  रिया बॅग घेऊन घाईघाईतच ऑफिसमधून निघते आणि ऑटो पकडून निघून जाते …विनय बाहेर येतोच आणि पाहतो तर काय??? रिया आधीच निघून गेलेली असते… विनायक उदास होऊन पार्किंग मधून त्याची गाडी काढून घरी जायला निघतो.. ड्रायव्हिंग करता करता  विचार करू लागतो… ही अशी का वागते?? सर्वच राखून बोलत आहे मला तिला विचारायलाच लागणार हे कळल्याशिवाय मला कळणार नाही नक्की काय झाले आहे?? तो ही घरी पोहचतो…

रिया गार्डन कडे रिक्षा थांबवून लवकर उतरून जाते..सूर्यास्त होत आला असतो..रिया इथे तिथे बघते..तिला आर्या आणि माई कुठेच दिसत नाही…ohhh.. शीट…मला उशीर झाला वाटते…आता काय करू…ती वळून घरी जायला लागते तेव्हाच तिला आर्या येऊन जोरात पाठीमागून मिठी मारते…

रिया आंटी ….कुठे होती तू ग…किती वाट पाहिली मी…आर्या बोलू लागते..

रिया तिला लगेच उचलून घेत बोलू लगते.. सॉरी बाळा…मला ऑफिस मधून निघायला लेट झाले…माई तुम्ही अजून गेल्या नाहीत …

नाही ग..ही खूप हट्ट करत होती..मी जाणारच नाही असे…रिया आंटी आल्या शिवाय.. सॉरी माई माझ्यामुळे तुम्हाला थांबायला लागले..

नाही ग…जातच होतो आम्ही…माई बोलल्या.

माई थांबा हा..मी तुम्हा दोघांना मुगाचा शीरा आणला आहे..

wow …..शीरा..मला खूप आवडला..तुला कसे कळले..आर्या म्हणते..

हो..काही..मल सर्व माहिती आहे..आता हा डब्बा घेऊन जा..मी उद्या येईल कदाचित …चालेल…म्हणून सर्व गार्डन मधून निघतात..

रिया त्यानं रिक्षा ने सोसायटी जवळ सोडते आणि घरी जाते…

विनय माई आणि आर्याची वाटच बघत असतो..ती घरी येते..बाबा…बाबा..तू आज आमच्या आधी आला..ये…..
आर्या धावत जाऊन त्याला उचायला सांगते…विनय तिला हलकेच उचलतो…आणि पापा घेतो…

माई – आर्या ..चल पहिला .. हात पाय धुवायला…मग देव बाप्पाला नमस्कार करणार ना…

आर्या – हो ग माई..चल

दोघी ही फ्रेश होऊन दिवा बत्ती करतात.. माई तिथं पर्यंत शीरा गरम करून आणते हल्ल मध्ये ..थोडा विनय ला ही देते…तिघे मिळून खायला बसतात..

wow..माई. ..किती छान आहे…तुम्ही बनवला..

नाही हो बाबा…माई ने नाही माझ्या गार्डन आंटी ने दिला आहे मला…आर्या बोलते

विनय – गार्डन आंटी… हे काय आहे??

माई – दादा .. काल ना एक ताई ने…आर्या ताईला पडल्यावर लगेच उचलून घेऊन पाणी वैगरे पाजले आणि आम्हाला  घरी सोडले…तीची ओळख झाली आहे..ती आज पुन्हा भेटली होती…तिने दिला..

विनय – पण माई…असे कोणाकडूनही कडे तुम्ही घेतले .आपण इथे सद्या नवे आहोत..आणि कोणाला ओळखत नाही…ती कोण..कुटली..असे लगेच कसे घेतले तुम्ही…??

माई – नाही हो दादा…मी माणसे ओळखते…

विनय – हो माई..पण नका घेऊन असे…

माई – ठीक आहे दादा..

बाबा नाही रे आंटी चंगली आहे माझी..आर्या बोलू लागली

हो आर्या…बाबांनी सांगितले आहे ना strangers शी नाही बोलायचे ..

sorry  बाबा..पण आंटी नव्हती रे तशी..खूप छान होती…तुला माहिती आहे तिने मला उचलून घेतले..तिथेच कोणी नवते..मी पडली तेव्हा…मा झी  फ्रेंड आहे ना मायारा…तीची मम्मी आहे ना तशीच सेम टू सेम…मला खूप आवडली ती…आपण ती ला आणु का इथे..घरी??

माई – काय बोलते बाळा…चला जावूया जेवायला…मी रियाला घेऊन जाते…

विनय विचार करू लागतो ..कोण होती की माहिती..पण कधीतरी असे वाटते…रियाला आईची कमी जाणवते..मी तिला आपुरा पडतो का…?? काय करू मी???

सर्व जेवून झोपायला जातात..माई तिच्या रूम मध्ये जाते..आर्या विनय कडेच झोपली असते …झोप लगत नसते म्हणून..विनय ही जागा असतो..मोबाईल घेऊन काही तरी सर्फिंग करत असतो आणि गाणी ऐकतअसतो..

मुझाको इरादे दे दे
कस्मे दे वादे दे दे
मेरी दुआई को इशारो को सहारे दे
दिल को ठिकाणे दे दे
नये बहाणे दे दे
ख्वाबोकी बरिशोको
मौसम के पैमाने दे दे

अपने करम की कर अदाएं ….
कर दे इधर भी तू निघायें…

सून रही हे ना तू…
ती रहा हू मे..
सून रहा हे ना तू..
क्यूँ  रो रहा हूं मे…

सूना रही हे ना तू….

गाणे ऐकत ऐकत..विनय ल रिया ची आठवण येते.. मी तुला खोटे बोलला होता ..रिया..मला माहिती पडले होते की तू मावशीला आणि आई च्या शेवटच्या इच्छा तोडून माझ्यासोबत सुखी राहू शकली नसती म्हणूनच मी खोटे बोललो…मला वाटले होते तू मानव शी लग्न करायला हवे होते..म्हणून मी तुला दुबई चे सांगितले तेव्हा..पण मी आधीच ठरवले होते..की तुला न सांगता इथून निघून जायचे..म्हणून मी आईला ही घेऊन गेलो..आणि तिला ही काहीच सांगायला सांगितले नाही तुला..पण मझे चुकले रिया..मी थांबायला हवे होते..हे असे का झाले आपल्यासोबत…आणि आता इतके अंतर आले की आपण नीट बोलू ही शकत नाही.. मी सर्व सोशल मीडिया अकाउंट्स पण बंद केले होते..माझा नंबर बदललं होतं…तू मला कॉल केला होता का रिया…मी चुकलो आता की करू…

इतक्यात बाबा…बाबा..असा आर्याचा आवाज आला आणि विनय भानावर आला…

अरे..हे काय…नाही ..असे नाही होऊ शकत आता..मी इतका विचार करत आहे .. रीयाचं…का तर तिचे लग्न झाले नाही म्हणून..पण माझे काय ….माझ्यावर तर आर्या ची जबाबदारी आहे..ती मी कोणावर लादू शकत नाही..विचार करतच विनय झोपला..

दुसऱ्या दिवशी रिया ऑफिस ला जाते..विनय आधीच येऊन कामावर लागला असतो..विनय च्या केबिन मध्ये जाते..

रिया – Good morning विनय

विनय – Very Good morning Riya

रिया – आज लवकर आलास?

विनय – हो..थोडे काम होते..आणि घरी लवकर जायचे आहे…..दोन दिवसांनी मी २ दिवसासाठी कामानिमित्त बँगलोर का जाणार आहे…

रिया – ओके..काही मदत लगली तर सांग नक्की..

विनय – sure…lunch la jau..

रिया – ओके ..असेही मी आज लंच नाही आणला

विनय – done

दुपारी दोघे ही लंच का जातात…राहून राहून रिया ला काहीतरी बोलायचे आहे असे विनय ल वाटते..तो तिला विचारतो काही बोलायचे आहे का?? मला असे का वाटते तुला काही बोलायचे आहे असे??

नाही नाही …. काही नाही रिया बोलते…

दोघे शांत जेवत असतात…

मग रियाच बोलते…एक विचारू विनय…?

बोल ना..

कुठे होतास तू इतकी वर्ष?? मी किती शोधले तुला..?? आणि ती चिठ्ठी??

रिया …I am sorry…. तुला मला दुखवायचे नव्हते…मल माहीत होते की तू मावशीला दुखवून नाही राहू शकली असती म्हणून कोणाला ही न सांगता मी येथून जाण्याचा निर्णय घेतला..आणि कोणाशीच कॉन्टॅक्ट ठेवले नाही..

पण रिया तू का नाही केले लग्न..असे काय झाले…विनय रिया ला विचारतो..

नाही केले विनय …मी सांगितले मानव  ला आणि तो ही तयार झाला..

पुढे दोघांना काय बोलावे ते कळलेच नाही..

मग रीयाच म्हणाली…तू ..तुझी मुलगी …किती वर्षाची  आहे ..३ का??

हो…विनय बोलला

रिया – गोड असेल ना खूप..काय नाव?

विनय – आर्या

रिया ..छान आहे..आणि …..

एवढे बोलून रिया थांबते…

विनय ल कळते…तो बोलतो…नाही आहे….

रिया – म्हणजे…

विनय – हेच जे तुला विचारायचे आहे ते…आर्या ची आई नाही आहे…

रिया – म्हणजे…का?

विनय – आर्या ला मी दत्तक घेतले आहे..

रिया – काय?

विनय – हो..

रिया – म्हणजे..म्हणजे..तुझे …???

विनय – हो रिया माझे लग्न नाही झाले..नी किंबहुना होणार ही नहीं कधी…आर्या ही माझी जबाबदारी आहे…ती मी कोणावर लादू शकत नाही…

रिया.. फ्कत ..ओके बोलते..पण मनातून थोडी सुखावली असते

विनय बोलू लागतो पुन्हा..बँगलोर ला गेल्यावर मी स्वतःला कामामध्ये झोकून दिले होते…आई ही गावी गेली होती..मी एकटा असायचो…मग कधी कधी रात्री उशीर होयचा.  …

एकदा असेच रात्री येताना..मल एका रस्त्याच्या कडेला ….  कसलासा आवाज आला रडण्याचा…आणि कुत्रे ही होते तिथं …मला रहावले नाही म्हणून बघितले तर…मला धक्काच बसला सर्व बघून…एका छोट्या बॅग मध्ये एक लहान बाळ होते ..ते रडत होते ..आणि कुत्रे त्याला त्रास देत होते…मी धावत जाऊन कुत्र्यांना हाकलले…आणि बाळ जवळ घेतले…मला काय करावे सुचत नव्हते…मग मी थोड्यावेळ त्याला  घेऊन गाडीत बसलो आणि विचार केला …पोलिसांकडे जाऊ..म्हणून पोलिस स्टेशन ला गेलो..तेथे झालेला प्रकार सांगितला .. त्यांनी रीतसर कम्प्लेंट करून घेतली…मग त्यांनी एक अनाथ आश्रम ला कॉल करून सर्व सांगितले .. पुढे काही कळेपर्यंत त्या बाळाला अनाथ आश्रमात  ठेवायला सांगितले.. मी सर्व सोपस्कार पूर्ण करून रात्री घरी गेलो आणि झोपलो सकाळी उठल्यानंतर मला त्या बाळाची आठवण यायला लागली त्यामुळे वाटलं की जाऊन एकदा बघून या वें आश्रमामध्ये म्हणून सकाळीच मी त्या आश्रमामध्ये गेलो तिथे सगळ्यांना मी भेटलो आणि त्या बाळालाही भेटलो….. ती छोटी मुलगी होती ….छान होती ती… तिला थोडं लागलं होतं त्यामुळे शांत होती …सहा महिन्याचं बाळ होतं ते असेच हळूच खूप दिवस मी तिथे जात राहिलो …आणि तिथे मला तिच्यासोबत एक लगाव निर्माण झाला होता ….त्या आश्रमातल्या लोकांनी तिचं नाव आर्या म्हणून ठेवलं होतं…

माझ्या वरचेवर जाण्याने तीही मला ओळखू लागली होती मी गेलो की हसायची माझ्याकडे यायची आम्ही खेळायचो आणि जाताना मात्र ती फुगुन बसायची हळूहळू ती मोठी होत होती…. तिच्या पहिल्या वाढदिवसाला मी तिला एक गिफ्ट म्हणून एक छोटी बाहुली दिली होती ….माझ्या आईलाही मी तिथे घेऊन गेलो होतो तिलाही ती खूप आवडली आणि म्हणूनच मी डिसाईड केलं की तिला दत्तक घायचे आणि यासाठी माझ्या आईनेही मला खूप मदत केली …माझे तेव्हा लग्नही झाले होते पण माझ्या आईमुळे मला दत्तक घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम आला नाही…

रिया फक्त ऐकत होती…तिचे डोळे भरून आले होते..

विनय – काय झाले?

रिया – काही नाही रे…मन भरून आले…इतक्या लहान  बाळाला कोण कसे सोडू शकते रे..

विनय – हो ..तेच ना …पण आता आर्या माझ्या जीवनाचा एक भग झाली आहे…तिला हे आठवत ही नाही की ती अनाथ आहे असे…आता मी आई आणि आर्या..बस हे माझे आयुष्य आहे..

रिया – आणि लग्न??? लग्न का नाही केले…इतके वर्ष?

विनय – तुला माहिती आहे का ते???? आणि ..आता तर फक्त आर्या…तिला कोण सांभाळणारी भेटेल का??…ती तिला accept   करेल का? आणि आता एक मन नाही वाटत लग्न करावे कुणाशी असे…

चल जायचे….का उशीर होत आहे..??

हो चल रिया म्हणाली..

दोन दिवसांनी विनय निघून गेला ऑफिसच्या कामाशी…रिया ही ऑफिस मध्ये बिझी होती. .तिला गार्डन मध्ये ही जायला भेटले नव्हते…अचानक संध्याकाळी काम करताना..तिला एक कॉल येतो…

समोरून – रिया बोलत आहेत का???

रिया – कोण बोलत आहे?

मी माई…
रिया – माई …कश्या आहेत…आर्या कशी आहे..मला यायला भेटले नाही हो २-३ दिवस कामामुळे…

माई रडायला लागल्या….

रिया – काय झाले माई…

माई – तू येते का ग ..घरी आर्या ची तब्येत बिघडली आहे…आणि घरी तिचे बाबा नाही आहेत…

रिया – काय ?? तुम्ही एकटे आहेत??

माई – हो

रिया – माई मी येते अर्धा तासात…मला एड्रेस द्या ना..

माई –   हो …

माई रिया ला एड्र्स देते…

रिया घाई घाई करत ऑफिस मधून निघते…

क्रमशः

धन्यवाद

भक्ती

Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा