ऋणानुबंध…प्रेमाचे – भाग 12 (अंतिम भाग)

Written by

माई चा कॉल आल्याने रिया धावतच त्याच्या घरी जायला निघते..तिला अजुनही माहिती नसते..की आर्या ही विनय ची मुलगी आहे..आणि त्याच्याच घरी जात आहे..

रिया घरी पोहचते…बेल वाजवता च माई येऊन दार उघडते…माई ..काय झाले आर्या ला..रिया विचारते..

माई – माहिती नाही ग ..अचानक असे कसे झाले…संध्याकाळ पर्यंत तर ठीक होती आणि अचानक ताप भरला …मला काही कळलेच नाही.  तिचे बाबा..पण नाही आहेत..मला तुझी आठवण आली अचानक ..आणि आर्या पण मध्ये आंटी आंटी बोलत होती..म्हणून म्हंटले तुला कॉल करावा..

रिया – बरे झाले माई..चला आपण बघू…

दोघी बोलत बोलत घाईत तिच्या रूम मध्ये जातात…

रिया बघते तर आर्या झोपली असते…तिला खूप ताप असतो..झोपेतही काहीतरी बडबडत असते…रिया माई ला विचारते तुम्ही डॉक्टर ना कॉल केला..माई बोलते नाही ..तिला मी औषध दिले आहे..तिच्या बाबा ला कॉल करते पण लागत नाही आहे..

” थांब मी डॉक्टर ना कॉल करून इथेच बोलावते” असे बोलून रिया डॉक्टर ना कॉल करते…आणि डॉक्टर येण्याची वाट बघू लागते…

माई विनय ला कॉल करते…विनय च कॉल लागतो..हॅलो दादा…हो..माई बोला….दादा आर्या ताप आला आहे…काय??? माई कधी आला ..औषध दिले का..कशी आहे ती..? झोपली आहे..औषध दिले ..मला डॉक्टर चा नंबर नव्हता माहिती म्हणून मी ती गार्डन ची ताई येते ना तिला बोलावले….ती आली आहे तिने डॉक्टर ना कॉल केला आहे…येतील इतक्यात…

अरे बाप रे माई…त्यांना  कसा त्रास दिला…विनय बोलला

हो दादा..पण मला थोडी भीती वाटली..काय करणार मी एकटी..रात्री काय झाले असते तर..माई बोलली

हो ..हो..बरोबर आहे..त्यांना देतात का? मी बोलतो त्यांच्याशी..विनय ने माई ना सांगितले..

माई बोलली हो…देते हा आत आहेत त्या आर्या कडे…थांबा..म्हणून माई बेडरूम कडे यायला लागतात…

इथे रिया आर्या च्या  जवळ जाऊन बसते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असताना..तिचे अचानक बेड जवळ च्याच टेबल जवळ जाते..आणि रिया बघत  राहते…

विनय ….म्हणजे आर्या विनय ची मुलगी आहे…अरे बापरे ..असे कसे झाले…??? मला समजले कसे नाही..विनय ने जेव्हा आर्यचे नाव सांगितले ..तेव्हा मला जराशी ही कल्पना आली नाही की ही तीच आर्या असू शकते…..माई रूम मध्ये येते…रिया तेव्हाच पूर्ण रूम निरखून बघत असते..तिला वॉल वरही खूप सारे विनय आर्या आणि विनय च्या आई चे फोटो दिसतात…

पाठून माई च आवाज येतो…आर्याचे बाबा चा फोन आहे..घ्या जरा बोलता का???

रिया – हो..हॅलो…

विनय – हॅलो…मी आर्या चे बाबा…तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना..I am really very sorry..मी  असे पर्यंत ती चांगली होती..संध्याकाळी काही झाले कळले नाही…तुम्ही हवे तर जाऊ शकता घरी माई आहे न त्या बघतील…

रिया – विनय!!!!

विनय – कोण ?? कोण बोलते आहे ..रिया ???

रिया – हो विनय..मी रिया च बोलत आहे…

विनय – पण तू…म्हणजे…तू…गार्डन आंटी…म्हणजे sorry.. रिया आर्या असेच बोलते तुला..

रिया हसायला लागली. पण मला कुणी कधी संगितले नाही..

रिया – हो..मला ही आताच कळले…आर्याच्या रूम मध्ये खूप सारे फोटो पाहिले…मी तुमचे..

विनय – हो..खरे सांगू रिया..तू आहेस तिथे ऐकुन माझे मन खूप हलके झाले नाही तर आता रात्रीच्या फ्लाईट ने मी निघणार होतो…काही प्रॉब्लेम आहे का??? मी येऊ का??

रिया – नाही ..नाही…विनय ..डॉक्टर आताच येऊन गेले..तू ये नंतर.  मी आहेच इथे ..मी नाही  कुठे जाणार..आर्या पण आता झोपली आहे..

विनय – sorry Riya माझ्यामुळे तुला किती त्रास झालं..

रिया – कम ऑन…त्यात काय त्रास…माझी फ्रेंड झाली आहे आर्या…आम्ही अल्मोस्त रोज भेटायचो गार्डन मध्ये..आज माई ने कॉल केला तेव्हा घाबरली मी..आणि तिने म्हंटले आर्यांचे बाबा घरी नाही म्हणून धावत च आले..तू नको काळजी करू ..मी आहे इथे..

विनय – thanks Riya.. खरच !!! आई पण नाही आहे ..नाही तर काही प्रोब्लेम नव्हताच..

रिया – अरे मी आहे ना..!!! जित पर्यंत रिया नीट होत नाही तिथं पर्यंत मी इथेच राहणार…तू ये आम्ही वाट बघू तुझी..चल आता  ठेवते…रिया ला खिचडी भरवते..

विनय – ओके ..bye Riya..!!

विनय कॉल ठेवतो!!

माई – तुम्ही विनय दादा ना ओळखता ताई..आणि डॉक्टर येऊन गेले असे का बोलले?

रिया – हो. ओळखते..आणि तो काळजी करेल ना म्हणून..आम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करतो..

माई – बरेच झाले मग…विनय दादा ना कसे तरी वाटत होते…तुम्ही इथे थांबले म्हणून…

तेव्हाच डॉक्टर येतात…

डॉक्टर येतात…आर्या ला check करतात..तिला इंजेक्शन ही देतात…रिया ला औषध देऊन काळजी घ्यायला सांगतात…तुम्ही काही काळजी करू नका डॉक्टर ..मी आहे ना ..रात्री मी बघत राहील…आर्या ला… रिया बोलते..

माई तुम्ही जाऊन झोपून घ्या ..तुमची पण दगदग झाली ना खूप..थकलेल्या वाटतात…

नाही ग पोरी..बसते ..मी …थोडी खिचडी टाकली आहे ..थोडी आर्या ला पण भरवू..आणि आपण पण थोडी थोडी खाऊन घेऊ…माई बोलल्या..

हो..तिनेही काही खले नसेल ना..तिला औषध  द्यायचे आहे…

रिया – आर्या… ए..बाळा थोडे उठ ना …चल आपण छान खिचडी खाऊन घेऊ..चल मी भरवते तुला…

आर्या – कोण??  कोण आहेस तु??बाबा …बाबा कुठे गेला माझा…

रिया – ए बाळा…मी तुझी रिया आंटी..

आर्या.- लगेच डोळे उघडून बघते…आंटी तू..आली तू ..बरे झाले बघ ना ग बाबा पण नाही आहे ..आजी पण नाही आहे…मी आणि म्माई च होतो..

रिया – हो ग बाळा मी आली आहे ना आता..

आर्या – तू जाऊ नका हा आता कुठे इथेच रहा…

रिया – नाही जाणार हा ..कुठे माझ्या आर्या ला सोडून..पण तू आता जेवणार ना?

आर्या – हो..चल..आणि आर्या उठू लागते..

रिया – अग..उठू नको..माई आणत आहेत इथेच खिचडी तुला…

मग आर्या तियाच्या कुशीत शिरून पडून राहते..

माई ने खिचडी आणल्यावर..आर्या खिचडी खाऊन घेते …आणि मग माई आणि रिया ही थोडे थोडे जेवून घेतात तिथेच बसून…

रात्री थोड्यावेळाने माई ला रिया झोपायला सांगते…आणि रिया आर्या कडे झोपते…

सकाळी उठल्यावर रिया छान फ्रेश होऊन आर्‍याला बघते..तिचा पण थोडा ताप कमी झाला असतो…रिया आर्या घेऊन येतो सर्व dinning table  वर बसून सर्व नाश्ता करतात…

तितक्यात माई ला विनय चा कॉल येतो..

“माई …उठले का सर्व?? कशी आहे आर्या…ताप गेला का?? मी निघू का आता” विनय लगेच बोलू लागला..

माई – दादा ..आर्या पिल्लू छान आहे आता..थोडी थकली आहे..पण उठली आता..आणि ताप पण कमी आहे आता…आम्ही नश्टा करत आहोत…रिया ताई व्हात्या इथे..म्हणून मला पण थोडा आधार भेटला…थांबा हा …आर्या ताई ला बोलायचे आहे..देते मी..

आर्या बोलू लागते…बाबा..बाबा..तिला थोडे रडायला येते…

पिल्लू रडू नको बाबा येणार रात्री उद्या …सकाळी..तुझ्या सोबत असणार बाबा…

बाबा…तुम्हाला माहिती आहे माझी गार्डन आंटी…माझ्यासोबत होती ..आपल्या इथे घरी आली आहे राहायला…आम्ही दोघी झोपले होते ..माहिती आहे का तुला??

विनय – हो का ..माझ्या आहे बाबा…. एका पोरीची… हो पण त्रासनको  देऊ हा..आणि काय ग ..गार्डन आंटी की बोलते…रिया आंटी बोलायचे…नाही तर फक्त आंटी बोल हा बेटा..

आर्या – ओके बाबा..तू लवकर ये ना…

विनय – हो पिल्लू ..येणार मी …रात्री…

आर्या. – wow……रात्री.. मस्त मग आपण सर्व मज्जा करू तू मी माई आणि आंटी पण…आजी पण हवी होती ना रे..आता आंटी इथेच राहणार ना आपल्यासोबत…

माई रिया कडे बघू लागते..तिला कसे तरीच होते.. ती लक्ष्य दुसऱ्या ठिकाणी नेते..

विनय चा कॉल कट झाल्यानंतर माई बोलते रिया ला…ताई एक विचारू??

तुम्ही विनय दादा ला कश्या ओळखतात..फक्त ऑफिस मध्ये आहेत की आधीपासून ओळखत आहेत..म्हणजे मला माहिती आहे एवढ्या छोट्या ऑफिस च्या ओळखी साठी कोणी इतकी मेहनत घेणार नाही..

रिया – हा माई..आधीपासून ओळखते..

माई – तुम्ही एकटे राहतात…इथे??

रिया – हो..सध्यातरी…मावशी बाहेरगावी असते…आई बाबा नाही आहेत मला..

माई – अच्छा..

संध्याकाळी आर्या चा ताप उतरला असतो…छान… रिया आणि आर्या बाहेरच्या खोलीत बसून खेळत असतात…मी जेवणाची तयारी करत असते…

रिया आर्या ला बोलते..चला एका मुलीचे बाबा येणार..मग काय आम्हाला कोणी तरी विसरणार बाबा..आता…

नाही काय आंटी…असे कसे होईल ..तुला तर मी जाऊच देणार नाही..तू इथेच राहायचे..आता आपण सर्व एकत्र राहु..तू मी बाबा..माई आणि आज्जी..आजी ला पण मी सांगितले की आंटी आपल्यासोबत राहणार आता..

अग..बेटा काय बोलते.. आंटी ला.. का त्रास देते…माई बाहेर बोलत आल्या…

ताई …आर्या चे मनावर घेऊ नका हा तुम्ही..

नाही हो माई… मला काही नाही वाटत…रिया बोलली..

आता माझे बाबा …येणार…आर्या ने तेच तेच गाणं लावले होते…होहो बा ई… येणार हा तुझे बाबा…रिया बोलली

थोड्यावेळाने विनय येतो…आर्या जाऊन त्याला बिलगते ..कुठे होता रे..तू बाबा..मिं किती वाट पहिले… आजी पण नव्हती…

सॉरी ना पिल्लू…मी आलो आता..कुठे कुठे नाही जाणार तुला सोडून…विनय बोलू लागला..

रिया त्याला बघत होती…किती बदलला आहे विनय…किती काळजी घेतो.. ..आज खऱ्या अर्थाने तो आर्या चा बाबा झाला आहे…किती छान वाटतात दोघे जण..

विनय रियाशी बोलू लागतो..रिया..आज तूआणि माई होत्या म्हणून मी तिथे राहू शकलो..नाही तर माझे काय झाले असते मलाच माहिती..माई ने सांगितले तेव्हा मी किती घाबरालों  होतो..पण मला जेव्हा कळाले की तू इथे आहे..तेव्हा खूप हलके वाटले…पण हे कसे शक्य झाले तुला खरंच माहिती नव्हते आर्या माझी मुलगी आहे ते…

नाही विनय..माझी तर ओळख यांची गार्डन मध्ये झाली होती…आणि माई चा कॉल आला आणि मला राहवले नाही..

हो खरच Thank you Riya!!!!


… अरे काय असा करतो…माझी फ्रेंड आहे आर्या तिच्यासाठी तर मी एवढे करणारच ना आर्या ला उचलून घेत रिया बोलली..आर्या तिला पप्पी घेऊन विनय ला चिडवते…

माई – चला चला ..मी जेवण आणते… आपण जेवून घेऊ…

रिया – माई मी निघते आता..

विनय – अरे इतक्या रात्री कुठे जाणार…जेवून घेऊ आणि इथेच रहा आज…

तेवढ्यात आर्या पण ओरडायला लागते..नाही …नाही ..आंटी तू जायचे नाही इथेच रहा.. प्लीज ना…इथेच …

मी पण बोलते रिया ताई रहा व्हा..इथेच आज..उशीर झाला आहे..

ठीक आहे..राहते…रिया बोलून सर्व जेवायला जातात…

जेवण झाल्यावर …आर्या ला माई झोपायला घेऊन जातात…रिया पण माई ला मदत म्हणून किचन मध्ये साफसफाई करत असते..

विनय किचन मधे येतो..रिया त्याला पाठमोरी असते…तिला तो बघतच बसतो…

आज मला माझे घर पूर्ण वाटत आहे..मी कधी हा विचारच केला नव्हता..की आर्या ला पण आई ची गरज असेल…आर्या किती खुश होती रिया कडे…रिया मुळे मी किती बिनधास्त राहू शकलो…रिया ही आर्या शी किती attach  झाली आहे…तेवढ्यात माई पाठून येतात..हळूच..विनय ला विचारतात…काय दादा काई…ईचार करतात…मी पण तोच इचार करत आहे…तुम्हास रिया ताई आवडतात ना… मला दिसतंय ते…त्यांना पण तुम्ही आवडत असावे…आणि आर्या तर तिला  सोडतच नाही आहे…तिला सांगत होती तू आंटी इथेच रहा आता आमच्या सोबत…

नाही नाही माई ..तुम्ही चुकीचे समजतात..मी तर सहज..आणि बाहेर निघून जातो.. गॅलरी मध्ये जाऊ उभा राहतो..छान थंड वारा सुटला असतो..रात्रीचे चांदणे पडले असते ..तो बाहेर बघत ..उभा असतो..आणि त्याला हळूच हाक ऐकू येते….विनय ..तो पाठी वळून बघतो..आणि बघतच राहतो…रिया…असते…गॅलरी मध्ये लावलेला पिवळा लाईट मुळे ..रिया आणखीन उठून दिसत असते…तिचे केस वाऱ्यावर उडत असतात…ती हाता त  ट्रे घेऊन दोन कॉफी चे मग घुन आली असते…विनय कॉफी घेणार ना!!! रिया च आवाज ऐकुन विनय भानावर येतो…

अरे ..रिया ..तुला कसे माहिती मला रात्री कॉफी आवडते म्हणून…

रिया ..विसरलीं नाही अजून मी. आणि त्याच्या कडे बघू लागते….

विनय फक्त… रिया..बोलतो…नी शांत होतो…

विनय…खरंच नाही विसरली तुला …मी तुझीच वाट बघत होती रे..पण मला कळले की तुला एक मुलगी आहे तेव्हा मला वाटले..सर्व संपले…म्हणून मी तुला काहीच सांगत नव्हती.. पण तू मला जेव्हा सांगितले की तू आर्या ला दत्तक घेतले..तेव्हा तू माझ्यासाठी खूप मोठा झाला होता…आणि मला खरंच माहिती नव्हते रे की आर्या तुझी मुलगी आहे असे..अगदी तुझ्या घरी येई पर्यंत ..जेव्हा घरी आले आणि रूम मध्ये आर्या चे फोटो पाहिले तेव्हा कळले…

हो रिया …तू का मला एक्सप्लानेशन देतेस…आज तुझ्याच मु
मुळे..आर्या चांगली झाली…पण रिया…आता खूप सारे बदलले आहे ग…मी खूप पुढे आलो आहे..माझे पूर्ण जबाबदारी आता आर्या आहे..मी तिला नाही दूर करू शकत …पण विनय…रिया असे बोलून थांबते…मला माहिती आहे..विनय…मी तुला साथ देऊ इच्छिते..आर्या मला खूप आवडते…आणि बघ ना…मला माहिती नसताना आर्या ची माझी ओळख झाली..कसले तरी आपले सर्वांचे ऋणानुबंध असतील ना रे…म्हणून भेटले..आपण ..एकत्र..आणि आर्या ने ही. मला खूप प्रेम दिले रे..तिच्या मुळे मी थोडी हसायला शिकले रे या ४-५ दिवसात….नाही तर जसे का ही जगणे च विसरली होती…मी…

रिया शांत होते आणि बाहेर बघू लागते..दोघे कॉफी पिऊ लागतात..कोणीच काही बोलत नाही…रिया कॉफी संपल्यावर मग खाली ठेवते आणि जाऊ लागते…विनय अचानक येऊन तिचा हाथ पकडतो..ती दचकून थांबते..आणि पाठी वळून विनय कडे बघते..तर विनय रडत असतो..त्याच्या डोळ्यांमधून पाणी  निघत असते…रिया लाही रडायला येते…ती विनय ला घट्ट जाऊन मिठी मारते…दोघे किती तरी वेळ तशीच असतात…कोणीच काही बोलत नाही….हळूच रिया विनय ला बोलते कानामध्ये.. सॉरी विनय…त्यावेळी मी जर लवकर decision घे तले असते तर आज काही वेगळे असते…विनय … really I love you..I can’t leave without you…विनय मी इतकी वर्ष कशी राहिली मलाच माहिती….मी तुझ्या जुन्या नंबर वर एक तरी कॉल करायची इतकी वर्ष पण कधीच तो बंद झाला होता..किती तरी वेळा तुझ्या जुन्या घरी जून आली होती पण नेहमीच घर बंद असायचे…तुला किती शोधले होते रे..कुठे निघून गेलास ..मझी कधीच आठवण नाही आली का तुला????

रियु …..

विनय…आज किती दिवसांनी हे ऐकेले..पुन्हा बोल…रिया बोलली

रियु…खरंच सांगतो..मी तुला खूप मिस केले..पण मला वाटले तू तुझ्या लाईफ मध्ये खुश असेल..म्हणून मी तुला कधीच कॉन्टॅक्ट करायचे नाही असे ठरवले होते…पण त्या पहिल्या दिवशी तुला ऑफिस मध्ये पहिले आणि बस. संपले..सर्व…फक्त तू आणि तू च विचार करत होतो…आणि जेव्हा तू बोललीस की तू एकटीच आहेस..तेव्हा मला माझी चूक कळली रियु… मी खूप मोठी चूक केली रियु…मला माफ कर…

नको ना असे बोलू…काही नाही झाले…दोघेही एकमेकांकडे बघत असतात…सर्व जसे काही थांबले असते… हॉल मध्ये त्यांच्या आवडीचे गाणे लागले असते…

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो
लग जा गले से …

हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से
फिर आपके नसीब में ये बात हो न हो
फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो
लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो

पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार
बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार
आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो
लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो

आज खऱ्या अर्थाने विनय आणि रिया एकत्र आले असतात…विनय हळूच तिला जवळ खेचतो..रिया ही लाजून डोळे बंद करतो…विनय तिच्या ओठावर हलकेच ओठ टेकवून त्याचे दीर्घ चुंबन घेतात…आज ते दोघे एकत्र झाले असतात… चंद्राच्या मंद प्रकाशाने ते दोघे नाहुन निघाले असतात…कसले तरी ऋणानुबंध होते प्रेमाचे म्हणू ते आज आर्या मुळे एकत्र आले होते.

समाप्त!!!

धन्यवाद!!

Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा