ऋणानुबंध…प्रेमाचे – भाग 2

Written by

रिया ऑफिस मध्ये हळुहळु रुळु लागते.. ती तिच्या टीमबरोबर येत जात असते.. रिया रोज विनय ला भेटत असते पण विनय हा कधी रिया कडे लक्ष्य देत नसतो..

रियाला वाटते आपण खूप जास्त विचार करत आहोत विनयचा… “असेही ते आपले सर आहेत आज पासून विचार करणे सोडायचे रिया”..असे सांगून रिया कामाला लागते…

विनय हा खूप अबोल असतो .. तो कोणाशी कामाशिवाय जास्त बोलत नसतो.. विनय ने स्वतःला एका साच्यामध्ये ढाळले असते.. एका बंदिस्त जीवन तो जगत असतो .. बाहेरून कडकंआणि शिस्तप्रिय दिसणारा विनय.. आतुहून आतून तितकाच हळवा असतो पण तो त्याच्या मनाचा ठाव ठिकाणा कोणालाही लागून देत नसतो.. त्याला कारण ही तसेच असते…. विनय त्याच्या आईसोबत एकटाच राहत असतो.. आईनेच त्याला लहानाचे मोठे केले असते … विनयच्या आई बाबांचा घटस्फोट झाला असतो .. आणि त्याने कधीही ही गोष्ट किंवा कारण कोणाला सांगितले नसते…

हेच कारण असते की तो सर्व रिलेशन पासून दूर राहत असतो.. त्याला कुठल्याही बंधनात  अटकायचे नसते. रियाला त्याच्या मनाचा कधीच ठाव ठिकाणा लागत नसतो..
रिया आणि विनय रोज एकत्र काम करत असतात पण विनय रोज रीयाच्या चुका काढत असतो.. रिया ला कधी विनयचा राग ही यायचा पण तो असे का वागत असतो हे तिला समजत नसते .. तसेच विनयला ही माहिती असते की खूप कमी वेळात रिया ने खूप काही शिकून घेतले असते..तरीही आपण तिच्यावर चिडत आहोत.

एकदा  लंच ला उशीर झाल्यामुळे विनय कॅन्टीन मध्ये येऊन जागा शोधत असतो आणि त्याला कुठेच बसायला भेटत नाही.. आणि नाईलाजाने तो पुन्हा मागे फिरतो त्याच क्षणी त्याचे लक्ष एका बँच कडे जाते तिथे चेअर वर रिया बसली असते लंच करत.. विनयला वाटते जाऊन बसावे कारण ती एकटी असते पण तो संकोच करतो..पण त्याच्या कडे काही ऑप्शन नसल्याने तो रियाला जाऊन विचारतो की मी इथे बसू का.. रिया आपला  हेडफोन्स लाऊन गाणे ऐकत बसली असते … तिचे लक्ष्य जाते आणि रिया भानच विसरून विनय कडे बघत राहते.. विनयला कळतच नाही आता हिला काय बोलावे.. मग तो पुन्हा टेबल वर नोक नोक करतो तेव्हा कुठे रिया भानावर येते.. आणि विनय ला बोलते..”हो हो नक्की बसा.. मला आवडेल”.. विनय मनातल्या मनात बोलतो …,” अशी काय ही”…

विनय लंच करायला लागतो .. आणि रियाचे लंच होऊन ती निघत असते पण असे अचानक त्याला सोडून कसे निघावे म्हणून थांबली असते.. हे विनयला समजताच तो रिया ल बोलतो.. ” you can carry on ..   मी येतो झाले का माझे.. मग आपण आपल्या प्रोजेक्ट वर काम करू….

रिया मग निघून जाते..

इथे विनय विचार करत असतो.. आज पर्यंत आपण हिला कधी पहिले नव्हते जवळून .. किती साधी आहे ही आणि किती स्वच्छ मनाची आहे पण मी हीचा का इतका विचार करत आहे …आणि जेवण संपवून विनय केबिन मध्ये पोहचतो.. पाहतो तर काय रिया आधीच तिथे येऊन सर्व नोट्स काढत असते..

हे बघून विनय खूप इम्प्रेस होतो पण तिला कळून देत नाही. आज रियाला  खूप काम असते म्हणून रिया उशिरापर्यंत थांबली असते .. इथे विनायलही काम असते तो ही थांबला असतो .. रात्री नऊ वाजत आले असतात तरी रिया आपल्या डेस्क वर बसून काम करत असते आणि विनय आपले लॅपटॉप बंद करून घरी जायला निघतो आणि बघतो की रिया अजून काम करत असते तो रियाच्या डेस्क कडे येतो पण तिला समजत नाही ..

”  मिस रिया तुम्ही अजून घरी नाही गेल्या .. आज काम पुरे झाले.. उद्या करा उरलेले काम”..  असा विनयचा आवाज ऐकून रिया ने मागे पाहते तर विनय उभा होता.

ति ” हो म्हणते आणि  निघते” .. विनय ही मग पार्किंग एरिया मध्ये निघून जातो. रिया ने सिस्टम बंद करून .. बाहेर येते .. आणि बस स्टॉप वर जाऊन बस ची वाट पाहू लागते.. त्याच क्षणी विनय आपल्या कार ने येतो , त्याने रियाला एकटीला बस स्टॉप वर बघतो आणि कार स्टॉप करतो आणि विंडो ओपन करून रियाला  म्हणतो.. तुम्हाला  घरी सोडू का. खूप रात्र झाली आहे ..

रिया  “नको मी जाईल”.. पण विनय तिला विचारतच राहतो.. आणि ती नाही नाही करत असते..

त्याच वेळेस रिया ल घरून कॉल येतो की तिच्या मावशीची तब्येत बिघडली आहे.. आणि काका ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले होते त्यामुळे तिला काही सुचत नाही .. हेच विनयला कळते आणि तो तिला कार मध्ये बसायला सांगतो.. रियाकडे काही ऑप्शन नसतो ती कार मध्ये बसते आणि दोघे रियाच्या  घराकडे निघतात.. रस्त्यामध्ये दोघेही काहीच बोलत नाही …

इथे घरी आल्यावर मावशीला बघून रिया रडायला लागते कारण घरी कोणी नसते ..तिला काही समजत नाही काय करू ते.. विनय तिला बोलतो  आपण मावशीला हॉस्पिटल ला घेऊन जाऊ पण ती विनयला  नको बोलते आणि तुम्ही घरी जा पण विनय तिचे काहीच ऐकत नाही आणि अंबुलान्सला  कॉल करून बोलवून घेतो आणि मावशीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो.. इथे रिया काकांना कॉल करते पण त्यांचा काहीच कॉल लागत नाही .. काका ऑफिस प्रोजेक्ट साठी यूके ल गेले असतात पंधरा दिवसांसाठी…

हॉस्पिटल मध्ये मावाशी वर लगेच उपचार चालू करतात.. विनयला रियाला असे रडताना पाहून खूप दुःख होते . तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण ती खूप रडत असते . तिची आई ही तिला सोडून गेली असते म्हणून तिला वाटते आता मावशीला काही झाले तर ती पुन्हा एकटी पडणार.. … विनय तिला खूप समजावतो.

थोड्या वेळाने डॉक्टर येऊन रियाला कळवतात की मावशी ची तब्येत खूप क्रिटिकल आहे .. हे ऐकुन ती खूप रडू लागते..विनय तिला समजवायला येतो तेव्हा ती विनयला  मीठी मारून रडायला लागते .. विनयला  वाईत वाटते तो ही तिला जवळ घेऊन समजावू लागतो. असेच थोड्यावेळाने रियाला  समजते की आपण विनयच्या मिठीत आहोत ..  तसे ती भानावर येते आणि विनय ही लगेच दूर होतो..दोघे खूप अस्वस्थ होतात.. एक मेकांना बघण्याचे टाळतात..

थोड्या वेळाने विनय रिया करिता आणि त्याच्या करिता कॉफी  घेऊन येतो पण रिया विनयला नको बोलते.. तेव्हा विनय तिला  समजावतो की जर तू तुझी काळजी नाही घेतली तर मावशीची काळजी कशी घेशील ..काका ही येऊ शकणार नाही आहेत..आणि मग ते दोघे कॉफी घेतात..

रात्र खूप झाली असते म्हणून रिया विनय ल सांगते की ” सर तुम्ही घरी जा .. घरी तुमच्या वाट बघत असतील”.. पण विनय काहीच बोलत नाही आणि थांबून राहतो .. पूर्ण रात्र ते जागे असतात .. पहाटे डॉक्टर येऊन त्यांना मावशी नीट असल्याचे सांगतात.. तेव्हा रिया फक्त देवाचे आभार मानते आणि मग विनयला  धन्यवाद बोलुन घरी जायला सांगते..

विनय घरी येऊन झोपत असताना त्याला रियाची आठवण येत असते.. त्यालाच समजत नाही का तो रियाला मिस करत असतो?.. आणि विचार करता करता त्याचा कधी डोळा लागतो तेही त्याला समजत नाही. सकाळी ऑफिसला जायला  उशीर झाल्याने विनय ऑफिसला जाऊन मग हॉस्पिटल मध्ये संध्याकाळी जायचे ठरवतो. पूर्ण कामात वेळ गेल्याने विनयला काम लवकर संपवून रिया भेटायला जायचे असते…

इथे रिया लाही कुठे तरी विनय ची प्रतीक्षा असते.. तिचे एक मन बोलत असते की विनय सर येणार  दुसरे मन बोलत असते आता का?..  विनय सर नाही येणार.. मावशीची तब्येत आता स्थिर असते पण अशक्तपणामुळे मावशीला ६-७ दिवस दवाखान्यात राहायचे असते म्हणून रिया तिच्या ऑफिस मध्ये कॉल करून कळवते.. आणि मावशीकडे येते… अचानक विनय येतो .. विनय आणि रिया एकमेकांकडे बघतात आणि हसतात.. त्या हसण्याचे रहस्य फक्त दोघांनाच माहिती असते.. मावशीची विचार पुस करून दोघेही बाहेर येतात .. विनय रियाला विचारतो.. ” काही खाले का तुम्ही?.. नसेल तर आपण काही तरी खाऊन घेऊन कॅन्टीन मध्ये किंवा इथे जवळच हॉटेल आहे तिथे जाऊन नाश्ता करू” रियाला ही ते योग्य वाटते कारण धावपळीमुळे तिने सकाळ पासून काही जास्त खाल्ले नसते.. ते दोघे कॅन्टीन मध्ये जातात.. आणि थोडा नाश्ता करून पुन्हा येतात..

असेच रोजच विनय रियाला आणि मावशीला बघायला येत असतो.. त्यांना रोज सवय झाली असते एकमेकांची … पण दोघांना ही समजत नसते हे काय आहे.??.. रिया आणि विनय खूप विचार करत असतात एकमेकांचा…

एकदा रात्री विनय झोपत असताना विचार करतो “आपण असे का करत आहोत ती तर फक्त ऑफिस मधील सहचारी आहे आपण का तिच्या कडे खेचले जात आहोत.. नाही .. नाही .. हे योग्य नाही… या मुळे मी खचत चाललो आहे एका बंधनात .. मला हे नको आहे.. पुढे जाऊन मीही माझ्या बाबा सारखा रियाला  त्रास दिला तर.. मी चुकीचे वागेल.. माझ्या आईला जो त्रास झाला तो मी रियाला नाही देऊ शकत आणि असे विचार करत त्याला झोप येते…” सकाळी उठून तो हॉस्पिटलला  नाही जाण्याचे ठरवतो..

रियच्या मावशिला घरी सोडणार असतात..रिया आज खरेच विनय ची वाट बघत असते पण विनय कॉल ही करत नाही किंवा येत ही नाही… असेच दोन दिवस निघून जातात तिला काहीच समजत नाही.. रिया अता खूप दिवसांनी ऑफिसला  जाणार असते.. ती विनयला भेटणार असते… मनात एक हुरहूर असते… एक आनंद असतो ..

रिया ऑफिस मध्ये जाते आणि पहिला विनयच्या केबिन मध्ये जाते आणि गूड मॉर्निंग म्हणते … विनय रिया कडे बघतो आणि खूप रागवतो.. आणि बोलतो..” मिस रिया, तुम्हाला मॅनर्स नाही का ? आत येताना डोअर नॉक करून यावे …” रिया शॉक होते.. आज पुन्हा तिला विनय सरांचा ओरडा भेटला असतो खूप दिवसांनी… पण तिला राग नाही येत ती सॉरी बोलुन आपल्या जागे वर जाते.. आज विनयची खूप खूप चीड चीड होत असते … त्यालाही समजत नाही का असे होत असते… रिया आज समोर असते पण तो खूप वाईत वागत असतो तिच्याशी.. कामामध्ये ही तिच्या चुका कडून तिला ओरडत असतो… रियाला ही समजत नाही नक्की विनय सरांन्हा काय झाले आहे … नक्की ते सर ज्यांनी मला मदत केली आणि आज हे सर जे माझ्यावर इतके ओरडत आहे विनाकारण..कुठले सर खरे होते… माझी काय चूक आहे.. का सर मला दुर्लक्ष करत आहेत..??
..

लंच टाईम मध्ये रिया विनयच्या केबिन मध्ये जाऊन त्याला जेवणासाठी विचारते तर तो काम आहे असे सांगून तिला टाळतो.. तिला हे समजते की विनय मला टाळत आहे म्हणून ती वाईट मानून निघून जाते..

असेच खूप दिवस होतात … विनय आणि रिया मधला दुरावा वाढत असतो पण मनातून ते जवळ येत असतात.. रात्री त्यांना झोप लागत नसते.. दोघे ही एकमेकांचा विचार करून झोपत असतात. रियाला समजत नसते विनय सर असे का वागत असतात.. ती एक निर्णय घेते आणि उद्या जाऊन विनयला  विचारणार असे  आणि झोपून जाते.

सकाळी ऑफिसला गेल्यावर ती विनय सरांचा कॅबीन मध्ये जाते आणि विनयला सांगते “मला सर तुमच्याशी बोलायचे आहे”..

“थांब रिया… मला माहिती आहे तुला काय बोलायचे आहे.. तुला वाटत असणार मी असे का वागतो.. तर मी तुला सांगतो .. की मी असाच आहे.. मला समजत  आहे तुला माझ्यामध्ये आकर्षण वाटू लागले आहे… पण हे शक्य नाही.. मी तुझा असा कधीच विचार केला नाही…” असे विनयच्या शब्द ऐकल्यावर रिया रडत विनयच्या कॅबिन मधून निघून जाते.. रियाला रडताना बघून विनयला खूप वाईट वाटते…त्याला जाऊन रियाला थांबावे वाटते पण  विनय खूपच कठोर बनतो..

त्या दिवसापासून विनय आणि रिया एकमेकांशी कामाशिवाय बोलत नाही.. असेच खूप दिवस जातात.. याच वेळामध्ये रीयच्या  टीम मध्ये आरव ची एंट्री होते.. आरव खूप मनमोकळा आणि चांगला मुलगा असतो ..तो रिया शी खूप छान बोलत असतो.. रिया ही त्याची कंपनी एन्जॉय करत अस्तेपण कुठे तरी कोणाला ह्या गोष्टींपासून त्रास होत असतो … कोणाला ?? का??? विनय???

पाहायचे आहे का पुढे विनय , रिया आणि नवीन आलेल्या आरव मध्ये काय झाले.. विनय आणि रिया येतात का एकत्र…???

भक्ती

..

Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा