ऋणानुबंध…प्रेमाचे – भाग 9

Written by

विनय ही घरी जातो…घरी पोहचल्यावर …बेल वाजवता च माई येऊन दार उघडतात..  “माई ….आज जरा उशीर झाला यायला..पहिला दिवस होताना …उद्या पासून येईल हो लवकर…” विनय बोलतो..

” चालेल हो दादा..थोडा उशीर झाला तरी…मी जवळ च राहते…आर्या काय करते..?राहिली का हो.?.तिला सवय नाही झाली ना तुमची अजून…माझ्या आई आहेत पण त्या जरा तीर्थयात्रेला गेल्या आहेत ना..म्हणून जास्त त्रास नाही ना दिला तुम्हाला…”

“बाबा …बाबा…तू आलास का रे??? किती उशीर केला…??मी तुझी वाट बघत होती…” ३ वर्षाची छोटीशी आर्या धावत धावत आपल्या रूम मधून येते.. कुरळे कुरळे केस …गोरी गोरी पान …हसल्यावर गालावर पडणारी खळी… घारे घारे डोळे… कोणालाही आपल्या प्रेमात पाडणारी गोंडस बाळच ते!!!!

“आर्या…माझे पिल्लू…कशी आहेस ग..???.त्रास नाही ना दिला … माईन्हा…” विनय आर्याला बोलला..

“नाही हो बाबा..मी काय त्रास देते का कोणाला….??फक्त तुझी आठवण येत होती..तू लवकर यायचे ना रे.. इथे माझे कोणीच फ्रेंड्स नाहीत..तू पण नव्हता ..माई ला गार्डन ही नाही हो माहिती” आर्या बोलली.

“माई…मी येताना इथे जवळच गार्डन बघितले हो… जाव्हा हा माझ्या पिल्लू ला घेऊन…ओके आर्या..!!!.माई घेऊन जातील हा तुला…”

ओके बाबा…

चल आता ..मी जरा फ्रेश होतो..मग आपण आजीला कॉल करू..माई जरा चहा करतात हो. कडकं..??

हो ..करते आता..चल आर्या..माई आर्या ला  घेऊन किचन मध्ये जातात.

विनय फ्रेश होऊन …चहा घेतो..आर्या पाळण्यावार बसून आपल्या बाहुलीसोबत खेळत असते..

दादा जाते मी आता…जेवण करून ठेवले आहे…अच्छा माई.. विनय बोलतो.. माई एक सांगू का…???तुम्ही पण एकटेच राहता…तर इथेच का नाही येत तुम्ही…इथेच रहा… आमच्यासोबत..आर्या ला ही सोबत भेटेल आणि आई आली का तिला ही तुमच्या सोबत भेटेल..काय वाटते तुम्हाला?.   पण दादा ..कशाला त्रास तुम्हाला…जाते मी… आहो त्रास काय …आर्या बघा ना तुमच्यासोबत एका दिवसात रुळली..

हो ना ते तर आहे..जीव लावला बघा पोरीने…किती छान बाळ आहे माझे..एका छान सा पापा घेत आर्या च्या डोक्यावरून हात फिरवते माई..

आर्या तिच्या गळ्यात पडत …”नको ना जाऊ माई रहा ना माझ्यासोबत..हा …बाबा काय ..लवकर येतच  नाही ऑफिस मधून”

बरे ..बरे …पण आता जाते ..एक दोन दिवसात…समान वैगरे घेऊन येते हो…दादा सकाळी येते मी आता…bye Arya!!!! माई असे बोलून निघून जातात…

“आर्या चल लवकर आपण थोड्या खेळायला जाऊ…”

“कुठे नाही बाबा… नको ना …मी थकली आहे तू…”

“अच्छा तू थकली आहे का ???? मला वाटतं मी कामाला जाऊन आला …मीच थकलो असेल… पण माझं बाळ थकलेले आहे का? नो प्रॉब्लेम ….आपण उद्या जाऊया… आपण जेवूया का आता?? माई ने  काय केलं हे माझ्या पीलू साठी… चला चला बघुया…” असे बोलून विनय आर्या ला घेऊन किचन मध्ये जातो…जेवण घेऊन येऊन ते बाहेर dinning room  मध्ये येऊन बसतात…विनय आर्यला जेवण भरवतो…खूप साऱ्या गोष्टी. ऐकत आर्या जेवते आणि मग थोड्या वेळाने झोपायला जाते…आर्या झोपल्यावर.. विनय थोडे ऑफिस चे काम घेऊन बसतो..त्याला रीयाचि आठवण येते…काय करत असेल रिया..आजूनही तशीच आहे …पण कुठे तरी हरवलेली दिसली…सर्व ठीक असेल ना तिच्या घरात…मानव ..तो नीट वागत असेल ना तिच्या सोबत..?? मी तिला विचारले तर काहीच बोलली नाही ..अशी काय ही?? काहीच बोलली नाही!!! रिया मी नाही तुझ्या जीवनात ढवळाढवळ करणार ..मी फक्त मैत्रीच्या नात्याने तुला विचारले ग!!! तुला त्रास झाला असेल तर माफ कर मला…मला तिची उद्या माफी मागायलाच लागेल..

हे विचार करत असताना आर्या येते डोळे चोळत चोळत..”काय रे बाबा..अजून आला नाहीस झोपायला..चल ना रे…मला झोप नाही येत आहे..आजी पण नाही आहे..चल ना!!”

“चल आर्या..आलो ..आलो…” म्हणून विनय झोपायला जातो पण काही केल्या त्याला रिया चा चेहरा  डोळ्यासमोरून जात नाही…” विनय विचार करत असतो..” मी का विचार करत आहे इतका..रिया चा…? का नाही अजुनही विसरू शकत तिला…?? नाही नाही ..हे योग्य नाही…I have to forget her!! ” रात्री कधीतरी त्याला झोप लागते..

….

इथे रिया विचार करत असते घरी…मी सांगायला हवे होते का विनय ला…मानव कुठेच नाही माझ्या जीवनात…त्याने तर मला एक अनमोल भेट दिली असते …लग्न न करून !!!  मी त्याचे हे उपकार कधीच विसरणार नाही…पण ह्या मुळेच आमचे जीवन खराब होता होता वाचले होते..मी का नाही विनय ला सांगू शकली…इतकी वर्ष मी त्याला शोधायचा प्रयत्न करत होती .. आणि आज भेटला तर मी काहीच बोलू शकली नाही…असे का झाले…??  हो कदाचित …विनय चे लग्न झाले असावे…किती वर्ष होऊन गेली..तो का थांबला असेल माझ्यासाठी…त्याच्या मते तर मी त्याची फसवणूक च केली होती…आता काय राहिले आहे???  विचार करता करता करताच तिला साक्षी चा कॉल येतो…

“अग…रिया…मी fb वर विनय सारान्हा शोधले..पण त्याचे अकाउंट नाही भेटले..हो माहिती आहे..रिया बोलली…काय??? तुला माहिती..तूही शोधले…naughty!!!!! ohhh..sorry  तू तर त्यांना आधी पासून ओळखते ना??? रिया फक्त हो म्हणते…चल बाय फोनेठेवते मी असे बोलून रिया झोपायला जाते.

सकाळी उठून रिया नाश्ता  करून टिफीन घेऊन ऑफिस ला जाते..आज रिया शिफॉन ची आबोली कलर ची प्लेन साडी नेसली असते…विनय ने येताच तिला पहिले असते..पण काही नाही बोलता तो आपल्या केबिन मध्ये जाऊन बसतो…
विनय ला जेव्हा फर्स्ट टाइम रिया साडी नेसून घरी आली असते तेव्हा चा दिवस आठवतो…आज विनय चा दुसरा दिवस असतो office मध्ये…तो खूप बिझी झाला असतो…पण रियाचि खूप चल बीचल चालू असते..काय करू विनय ला जाऊन विचारू का जेवायला…टिफीन तर आणला आहे …नको पण त्याला काय वाटेल…म्हणून ती न जाता तशीच बसून जाते…तेव्हाच विनय केबिन मधून निघतो…रिया ला बघून तो तिच्या डेस्क कडे येतो..अ रे .. रिया जेवलीस का तू???? मला खूप भूक लागली आहे..तू जेवली नसशील तर चल जाऊ कॅन्टीन ला?  येतेस??
रिया ला ही मनातून बरे वाटते..हो चला सर..!!! विनय हसायला लागतो..पुन्हा सर..रिया ही हस्ते…दोघे ही कॅन्टीन ला जातात… रिया टिफीन ओपन करते आणि विनय ला बोलते…तू काही ऑर्डर करू नको मी आज जास्त आणला आहे टिफीन…चालेल ना तुला…माझ्या हातचे जेवायला..???

विनय खुश होत… वाह..चालेल म्हणजे काय धावेल…..दोघेही हसायला लागतात….पण रिया तू इतके जेवतेस…. जाडी होशील ग!! आणि विनय पुन्हा हसतो…रिया लटक्या रागात नाक मुरडून. ..तुझ्याच साठी आणला होता एक्स्त्रा…पण तुलकाशी विचारू म्हणून विचारलेच नाही….तूच आला मला विचारायला ..बघ….telepathy…

हो म्हणून दोघे ही हसायला लागतात…विनय बोलू लागतो जेवता..जेवता…रिया आपण अजूनही फ्रेंड्स आहोत.. अशी काय ग …एवढी का घबरतेस.??..माझ्याशी बोलायला…मी तोच विनय आहे रिया..बस फक्त काही काळ गेला आहे इतकी वर्ष कसे निघून गेली कळलेच नाही…

रिया फक्त हो बोलते…आणि हळूच स्वतःला बोलते मला तर खूप कळले…

काही बोलली का?? विनय विचारतो

रिया फक्त काही नाही बोलते…

रिया थोड्यावेळाने विचारते ..आई कशी आहे???

विनय – ठीक आहे…ती आता तीर्थ यात्रेला गेली आहे तिच्या बहिणी सोबत…तुझी मावशी आणि काका कसे आहेत…?

रिया – छान आहेत… विनय चल निघायचे ..थोडे काम आहे..

विनय ओके बोलतो..

जाता जाता..रिया विचार करते… अजून जर मी थांबले असते तर ह्याने माझा आणि मानव चा विषय काढला असता..पण मी किती दिवस हा विषय अवॉइड करणार..कधी ना कधी जे सत्य आहे ते मला सांगायलाच लागणार..

संध्याकाळी रिया घरी न जाता गार्डन मध्ये जाऊन बसली असते…लहान मुले खेळत असतात..कोणी जॉगिंग करत असते…काही जणी गप्पा मारत बसल्या असतात..हिला रोजच असेच सर्व बघत राहणे आवडत असते..  सूर्यास्त होत आलेला असतो….सर्व ठिकाणी छान सोनेरी प्रकाश पडला असतो…तिला वाटते आता निघावे म्हणून ती उठते तर अचानक तिला “ढाप” असा आवाज येतो…आणि रडण्याचा ही आवाज येऊ लागतो…ती मागे वळून बघते तर काय एक छोटी मुलगी पडली असते..आणि रडत असते…रिया लगेच जाऊन तिला उचलते….

रिया तिला विचारते “लागले का ग तुला??  अशी कशी पडली तू बाळा..एकटीच आहेस का ??? तुझी मम्मा नाही आहे का?? कोणासोबत आली आहेस..?? हे घे पाणी घे” रिया तिला उचलते आणि बाजूला बाकड्यावर बसते तिला रुमालाने पुसते….

ती छोटी रडतच असते…तितक्यात त्यांच्याकडे पळतच कोणी तरी येते आणि तिला विचारते …. अग पिल्लू लागले का ग तुला…आणि तिला जवळ घेते…

“तुम्ही आणली का हिला इथे…पडली ही..कोणाचं नव्हते तिच्यासोबत..असे कसे तुम्ही हिला एकटे सोडले…?” रिया बोलली.

त्या आजी बोलू लागल्या ” अाहो..नाही हो ताई…मी तिथे बसली व्हती…आणि ही बाय ..इथे धावत आली आणि पडली..मी म्हातारीला पाय लई दुखतात.  ..उठून येतच होती की  तुम्हाला  मी तिला उचलून घेताना पाहिले.. थांकु”…म्हणून तिने छोटी ला जवळ घेतले…

“. नाव काय बाळा तुझे” रिया ने तिला विचारले..

“मी आर्या आणि ही माझी माई” असे म्हणून ते पिल्लू हसायला लागले…

रिया हसून बोलते…मी रिया..”

आर्या – thank you Riya aunty..

माई – मी हिला सांभाळते…घरी बसून कंटाळा आला व्हता हिला म्हंटले चल ..बगीच्यात घेऊन येती तुला म्हणून आणले व्हते..

रिया – छान नाव आहेस ग ..तुझे .. आता तुम्ही कश्या जाणार…

माई – जातो आम्ही..जवळच राहतो..

रिया – पण माई हिला नाही होणार चालायला आणि तुम्हाला उचलायला नाही होणार ..चला मी सोडते तुम्हाला घरी…आर्या येणार माझ्यासोबत..???

आर्या – हो म्हणते..मला आवडेल..

सर्व हसू लागतात..

रिया आर्या ला उचलते..माई पाण्याची बाटली आणि आर्या ची बॅग उचलून त्यांच्या पाठी पाठी चालते…

रिया आर्या ला विचारते…तू स्कूल ल जाते का ग?

आर्या – हो आंटी….मी playgroup ला आहे आता..

रिया – वाह छान…तुझी आई बाबा कुठे आहेत… ऑफिस ला गेले आहेत का?
आर्या काही बोलणार तेव्हाच माई पाठून बोलते..पोरीस आई नाई तिचे बाबा ऑफिस ला गेले आहेत आणि आज्जी हाय ती बाहेर गेली आहे..

रिया ला कसे तरीच वाटते..असे विचार ल्यावर… आर्या शांत होते ..काही बोलत नाही…

काही बोलायचे म्हणून रिया ने विचारले..तुम्ही रोज येतात का ?

माई बोलल्या ..नाही हो ताई..आजच आलो…खर तर हे २-३ दिवस झाले इथे आलेत..म्हणून आज हिने हट्ट केला म्हणून घेऊन आली मी.. पण आता येऊ रोज..तितकाच  विरुंगला मिळतो..

रिया आणि आर्या हसतात दोघी..अगदी कमी वेळात दोघांची चांगली ओळख झालेली दिसते…

चालत असताना आर्या रिया ला विचारते..आंटी तू येते का ग इथे रोज..उद्या पण भेटशील मला..?

रिया हो बोलते..आपण उद्या भेटू हा पिल्लू…

आर्या.. ये….म्हणून तुला गच्च मीठी मारते…

माई बोलतात…चल आर्या बेटा…घर आले आपले उत र  आता आंटी कडून…

आर्या – नाही आंटी ..तू पण चल ना घरी..

रिया – नाही बेटा आज नको..खूप उशीर झाला आहे..येतेमी आता..उद्या भेटू ना आपण ..

आर्या तोंड लहान करून ओके बोलते

माई आर्याळा घेते आणि दोघी ही तिला बाय करतात आणि सोसायटी मध्ये जातात..

रिया आपल्या घरी निघून जाते…

क्रमशः

भक्ती

 रिया आणि विनयच्या नात्यातला दुरावा दूर होणार का…?? बघुया पुढे..

Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा