एकाच चाकावर चालणारा संसार #कथालेखन

Written by

“काय म्हणायचे. काय बाई आहे ही.” पहिली बाई
“हो ना. मी तर हिला चांगली समजत होते. पण कुठलं काय आता तर चांगुलपणाचा जमानाच नाही” दुसरी.
“किती तयार होऊन ती ऑफिसला जाते.”
“काय बाई आहे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पुरुषाबरोबर येते.” असे एक नाही अनेक शब्द तिच्या कानावर येतात. पण ती गप्प बसते काही एक अक्षर बोलत नाही. पण आज तिची मुलगी प्रिया बाहेर येते आणि तिला या बायकांचे आवाज कानावर पडतात. तिला खूप राग येतो आणि ती त्या बायकांच्या गराड्यात जाऊन म्हणते,

“तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या आईचा तेच कळत नाही. ती बाई इतकी वर्ष आमचं सांभाळ एकटी करते. अगदी व्यवस्थित. नीटनेटकी राहते. कधी इकडची बातमी तिकडे करत नाही तुमच्यासारखं. ठीक आहे ना एखाद्या वेळेस ऑफिसमधून यायला उशीर झाला तर एखाद्या ऑफिसमधील कलिगने तीला ड्रॉप केलं तर बिघडलं कुठे? तुमच्या मुली बाहेर कुठे कुठे दिवे लावतात हे माहिती आहे का तुम्हाला? आणि तिची प्रगती बघून तुम्ही खुश व्हायला पाहिजे तर तुम्ही उलट तिलाच नाव ठेवता? तिने इतक्या वर्षात आम्हाला कसं सांभाळलं? आमचं पालनपोषण कसं केलं? हे आमच आम्हालाच माहित. तेव्हा तुम्ही आला होता का आमच्या मदतीला? ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि आता जरा चांगले दिवस आले तर लागल्या बोलायला काय वाटेल ते? असं परत संशयाने माझ्या आईबद्दल बोललात तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. चल ग आई” असे म्हणून दोघेजण आत जातात.

आत आल्यावर सुमन रडायला लागते. प्रिया सुमनला म्हणजे तिच्या आईला म्हणते, “आई हे पाणी पी आणि लक्ष देऊ नकोस. बायका काय पण बोलतात. तसं पण बोलतातच.”
सुमन प्रियाला “मी म्हटलं तरी सतीश मामाला की माझे मी जाते तर तो म्हणाला इतक्या रात्री बसने कशी जाणार? मी सोडतो त्यापेक्षा. मुली वाट बघत असतील. असे म्हणून त्याने सोडले ग मला.”

प्रिया “अग आई मला माहिती आहे ना आणि एक मुलगा, एक मुलगी जर बोलले तर त्यांच्यामध्ये काही तसला संबंध असतो का? भाऊ बहिणीचं नातं नसतं का? बायकांना काय वाटेल ते बोलायला विषय नुसता? आई मला माहिती आहे ग बाबा सोडून गेल्यानंतर तू एकटीने हे घर कसं उभं केली आहेस ते? आपल्या घरासाठीच तर तू जॉब करायला सुरुवात केलीस ना. तेव्हा कुठं आम्ही दोघी जणी शिकलो. आता पुढच्या वर्षापासून मी पण जॉब करेन आणि तुझा तर आता जॉब आहेच. आपला पगार मिळून आपण आपलं स्वतःचं असं एक घर घेऊ. आपण आपली स्वप्न पूर्ण करूया. लोकांच्या बघण्याकडे, बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचे नाही. लोक काय बोलतच असतात.”
आई बरं म्हणाली.

प्रिया म्हणाली “चल आता जेवू या मला खूप भूक लागली आहे. उशीर पण झाला आहे.”
सगळं आवरून सुमन झोपायला जाते आणि ती भूतकाळात जाते. जेव्हा तिचा नवरा हे जग सोडून गेला होता. तेव्हाची परिस्थिती तिला आठवू लागते. त्यावेळी कोणीही तिच्याजवळ नव्हते मदतीसाठी. काय करावे काय नको हे तिला समजत नव्हते? आणि पदरात दोन मुली होत्या. ती एका भाड्याच्या घरात राहू लागली. तसं तिचं शिक्षण बीकॉम झालेलं. त्याआधारे ती सुरवातीला कमी पैशांमध्ये जॉब करू लागली. हळूहळू पगार वाढू लागला आणि तिने मुलींना चांगल्या शाळेत घातले. मुली आता शिकू लागल्या. हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले. आता तिची बदली दुसरीकडे झाली होती आणि तिथे काम भरपूर होतं. कामाहून यायला घरी वेळ होणार होता म्हणून तिला आज तिच्या कलिगने ड्रॉप केलं होतं. तर या बायका तिच्यावर संशय घेऊ लागल्या होत्या.
जगात अशा कितीतरी स्त्रिया असतील ज्या एकट्याच परिस्थितीशी दोन हात करून लढत आहेत.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.