एका पुनर्जन्माची कथा (भाग 2)

Written by

मंजिरी ने सांगितलेल्या रस्त्याने ड्रायव्हर ने गाडी घेतली, आणि बरोबर त्या ठिकाणी पोहोचले…मंजिरी ला रस्ता कसा माहीत होता हा अजूनच प्रश्न होता…सर्वजण विचारत तेव्हा “मला खरच माहीत नाही” हे एकच उत्तर तिला देता येत होतं…

सर्वजण बसमधून उतरले..

मंजिरी जमिनीवर पाय टाकताना थरथरत होती…

जसा तिने जमिनीवर पाय टेकवला तसा सुसाट वारा वाहू लागला, झाडांची जोरदार सळसळ व्हायला लागली, पक्षी आवाज करत वेगाने घिरट्या घालू लागली..जणू निसर्गालाही तिच्या पुनरागमनाची चाहूल लागलेली…

मंजिरी ने जसा पाय टेकवला तसं तिच्या अंगात एक वीज शहारून गेली, तिच्या आठवणी आणि जाणिवा हळू हळू जागृत होऊ लागल्या…

त्या सर्व शिक्षकांनी एक गाईड सोबत घेतलेला..

सर्वांनी एका ठिकाणी बसून चहा घेतला…

मग गाईड त्या सर्वांना महालाची ओळख करून देऊ लागला..

“महाल इसवी सन 1289 च्या काळातला होता..असं म्हणतात की राजा विरदत्त आणि त्याची राणी चित्रांगना इथे राज्य करत होता..देवनगर त्यांच्या राज्याचं नाव.. त्यांचा राज्यात प्रजा खूप सुखी होती..राजा आणि राणी अगदी पोटच्या मुलाप्रमाणे प्रजेला सांभाळायचे…विरदत्त नावाप्रमाणे वीर होता, प्रत्येक लढाई त्याने जिंकली होती आणि राणी चित्रांगना सुद्धा युद्धात तरबेज होती…

एकदा युद्धवरून परतत असतांना राजाचा मृत्यू झाला, तेव्हा राणीने ने शिताफीने हे राज्य सांभाळले, पण आजारपणामुळे त्यांचाही लवकर मृत्यू झाला…”

अशी तोकडी माहिती गाईड ने दिली..

“चित्रांगना…देवनगर..युद्ध…”

 मंजिरी ला काही पुसटश्या गोष्टी आठवू लागल्या…”

आता तो महालाचा प्रत्येक कोपरा आणि त्याची माहिती देऊ लागला..

“या जागेवर विरदत्त प्रार्थना करीत असे, इथे राणी चित्रांगना स्नान करीत असे, तिथे राजा आणि त्याचे सैनिक युद्धाचा सराव करीत असत…”

“आणि हीच ती जागा जिथे राणीला ला मृत्यू आला” मंजिरी एक ठिकाणी थांबून किंचाळली…तिच्या डोळ्यातून संताप वाहत होता…डोळे लालबुंद झालेले..ती ओरडली तसे सर्वजण मागे झाले…

मंजिरीने दुसऱ्या जागेवर धाव घेतली…

“इथेच…हो इथेच…त्या राणीला वाचवायला आलेल्या शकुंतला बाई ला मारण्यात आलं”

मंजिरी ला आता सर्व आठवले..

मागच्या जन्माची एकूण एक गोष्ट अवगत झाली…

बरोबरच्या शिक्षिका घाबरल्या…काय चालत होतं कुणालाच समजत नव्हतं..

मंजिरी एका ठिकाणी बसून स्तब्ध झालेली, शून्यात नजर बसवून बसून होती, बरोबरीच्या शिक्षकांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला..पण ती काहीही प्रतिसाद देत नव्हती…

परिस्थिती गंभीर आहे हे ओळखून त्या सर्वांनी मंजिरी च्या नवऱ्याला खबर दिली..

मंजिरी चा नवरा मुलांना आजीकडे ठेवून तातडीने महालात पोचला..

संध्याकाळ झाली होती, मंजिरी च्या नवऱ्याने सर्वांना परत जायला सांगितले…

तो मंजिरी जवळ गेला तशी मंजिरी रडू लागली…

“तुम्हाला सांगत होती ना काहीतरी बाकी होतं, काहीतरी मी भूतकाळात मागे सोडून आलेली…ते हेच होतं… याचसाठी कित्येक जन्म मी वाट पाहिली…कित्येक वर्षे याच गोष्टीसाठी मी थांबुन राहिलेली…”

मंजिरी च्या नवऱ्याला सर्व हकीकत कळली तसा त्याला धक्का बसला…आपण मंजिरी च्या जाणिवांना हसण्यावारी नेट होतो पण त्या जाणीवा एका पूर्वजन्मीच्या अधुऱ्या राहिलेल्या गोष्टीसाठी होत्या याची जाणीव त्याला झाली…

तो म्हणाला,

“मंजिरी, जे झालंय ते अगदी अतर्क्य आहे, तू एका मोठ्या इतिहासाचा एक भाग होतीस, आणि आज तुला त्याची पुन्हा एकदा ओळख झाली, पण तो भूतकाळ होता आणि या जन्मात तुला एक नवीन आणि वेगळं आयुष्य मिळालंय… आता ते नवीन पद्धतीने जग…”

“नाही समीर, गोष्ट एवढीच नव्हती…त्या गाईड ने जे सांगितलं तेवढाच इतिहास लोकांना माहीत आहे, त्या पलीकडे खूप काही राजकारण घडलं होतं..जे आजतागायत अंधारात होतं…विरदत्त युद्ध जिंकून आलेला पण येताना त्याचा हाती एक मोठी गूढ गोष्ट तो घेऊन आला, पण वाटेतच त्याला कोणीतरी मारले आणि विरदत्त सोबतच ती गोष्ट एक गूढ बनून राहिली, परत येत असतांना वाटेतल्या लोकांना तो भेटत होता आणि सर्वांना सांगत होता की चित्रांगना पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल… “

ती गोष्ट आता मला या जन्मात शोधायची आहे…त्याचसाठी निसर्गाने पुर्वजन्मीची जाणीव माझ्यामध्ये जिवंत ठेवली…

कोणती गूढ गोष्ट होती ती? खरा इतिहास काय होता?? मंजिरी ती गोष्ट परत मिळवू शकेल काय…वाचा पुढील भागात… लेख कसा वाटला यासाठी लाईक आणि कमेंट जरूर करा

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत