एका पुनर्जन्माची कथा (भाग 3)

Written by

मागील भागात आपण पाहिलं की मंजिरी ला पूर्वजन्मीच्या जाणीवा जागृत झाल्या होत्या..इतके दिवस जी स्वप्न पडायची त्याची उपरती आज झाली होती.. समीर मनातून घाबरला होता, आपली साधी भोळी बायको या कुठल्या कचाट्यात सापडली, आपल्या पासून बायको दुरावते की काय याची भीती वाटू लागली.. “मंजिरी मला तुला गमवायच नाहीये, हे सगळं ऐकून आणि पाहून मी घाबरलोय, तू प्लीज आपली आधीची मंजिरी म्हणून वाग ना…” मंजिरी म्हणाली, 

“समीर, माझा वर्तमान हेच माझे आयुष्य आहे, पण गतजन्मीच्या अपूर्ण गोष्टी पूर्ण केल्याशिवाय हा जन्म सार्थकी लागणार नाही..” समीर म्हणाला, 

“त्या गाईड ने जो इतिहास सांगितला तो बरोबर होता ना? मग त्यात वेगळं असं काही आढळलं नाही..काही बाकी होतं असं तर काही दिसत नाही..” “नाही समीर, त्या गाईड ने सांगितलेली माहिती निराधार आहे, किती वर्षे लोटली, खरा इतिहास सांगणारही कोणी उरला नाही” “मग नक्की घडले तरी काय होते? कुठली अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्यासाठी तू जन्म घेतलाय?” “ऐका तर मग, मागील जन्मातील माझे पती विरदत्त आणि मी चित्रांगना. देवनगर ला विरदत्त च्या वडिलांनी खूप उन्नत बनवले होते, प्रजेत उच्च आचार विचार रोवले होते, खूप खडतर परिस्थिती राज्याला खूप उन्नत बनवले…विरदत्त जरी शूर असला तरी काही वेळा तो अचानक आजारी पडे, एका दुर्धर आजाराने त्याला ग्रासले होते, पण वैद्यांनी सांगितले की हा आजार दिलेल्या जडी बुटींनी बरा होऊन जाईल…रामदास शास्त्री… विरदत्त च्या वडिलांचे मित्र आणि प्रमुख मंत्री, प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय वडील पुढे जात नसत…त्यांची पत्नी शकुंतला बाई, त्यांनी अगदी पोटच्या मुलाप्रमाणे आमचा सांभाळ केला…

विरदत्त च्या वडिलांना दैवी संकेत मिळत असत.. एकदा राम नगर म्हणजेच माझ्या माहेरी येण्याचा प्रसंग आला, त्यांनी मला आणि माझ्या युद्ध कलांना पाहिले आणि म्हणाले की देवनगर ला अशाच विरांगणेची गरज आहे..त्यांना दैवी संकेत मिळाला तशी त्यांनी विरदत्त साठी मला लग्नाची मागणी घातली…विरदत्त च्या आजाराचीही जाणीव दिली..मी मान्य केले आणि माझे लग्न वीरदत्त सोबत झाले..वडिलांचे वय झाले तसे त्यांनी राज्य आम्हा दोघांवर सोपवले आणि आम्ही राज्याची धुरा पेलू लागलो. आम्ही अत्यंत महत्वाकांक्षी होतो, आम्ही अनेक राज्ये आणि अनेक लढाया जिंकत होतो, पण दुसरीकडे राज्यातला आपला दरारा कमी होतोय म्हणुन रामदास शास्त्री दुखावले गेले, त्यांचं असं मत होतं की इतक्या मोठ्या राज्याची धुरा विरदत्त सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्तीला न देता त्यांचा स्वतःच्या मुलाला द्यावी…कारण विरदत्त ला कधीही मरण येईल, आणि युद्धात त्याचा काय टिकाव लागेल?? पण त्यांना कधी हे बोलून दाखवायची हिम्मत झाली नाही,वडिलांनी राज्यातला आपला हस्तक्षेप कमी केला आणि आमच्यावर जबाबदारी टाकली…राज्य विरदत्त च्या हवाली करत त्याचा राज्याभिषेक केला…हे पाहून रामदास शास्त्री खवळले…पण मुकाट्याने सगळं पाहत बसले… रामदास शास्त्रींना विरदत्त च्या हाताखाली काम करणे नकोसे झालेले, विरदत्त नविन नवीन कल्पना अमलात आणी, प्रजेच्या हिताचे नवीन उपक्रम राबवी…रामदास शास्त्री वाट बघत होते की विरदत्त कधी एकदा आजाराने मरण पावतो आणि कधी राजकारण करून राज्य त्यांचा मुलाच्या ताब्यात देतो ते… एकदा वैद्यांनी विरदत्त चे निदान केले आणि सांगितले की विरदत्त आजारातून पूर्ण बरा झालाय, आता कसलीच चिंता नाही… सर्वत्र आनंदी आनंद झाला मात्र रामदास शास्त्री चा संयम सुटला..ते आता जीव घेण्याचा विचार करू लागले… काही दिवसात विरदत्त चे वडील स्वर्गवासी झाले.. एकदा विरदत्त राज्याची टेहळणी करायला निघाला होता, त्यावेळी एक अंधाऱ्या रात्री एका मंदिरातून लक्ख प्रकाश त्याला दिसला..तो मंदिरात गेला..तिथे शेजारी एक पुजारी शांत निजला होता…पुढे काय घडलं हे कोणालाच माहीत नाही… फक्त एवढं कळलं की येतांना कोणीतरी विरदत्त वर हल्ला केला आणि त्याला मारून टाकले… मला हे समजताच मी गर्भगळीत झाले, माझ्यात त्राण उरले नाही पण राज्याची जबाबदारी म्हणून स्वतःला सावरले आणि एकटीने राज्य चालवायला घेतले…रामदास शास्त्री ना वाटलेले की विरदत्त नंतर त्यांचा मुलाला गादीवर बसवण्याशिवाय पर्याय नसेल, पण चित्रांगना राज्य हातात घेईल याची कल्पना त्यांना नव्हती, त्यांचा संताप झाला… मी राज्य खूप चांगल्या पद्धतीने चालवत होते, प्रजा माझा जयजयकार करत होती… काही दिवसांनी अशी खबर मिळाली की ह्या मंदिरातून विरदत्त परत येत असतांना त्यांना ज्या मंदिरातमारले गेले तिथल्या पुजाऱ्यालाही मारण्यात आलं…

असं नेमकं काय घडलं होतं त्या मंदिरात?? आणि त्या पुजाऱ्याचा काय संबंध??

मी त्याचा शोध घ्यायचा ठरवला…

मला अशी माहिती मिळाली की विरदत्त ला एक खूप मोठे आणि महत्वाचे गुपित मला सांगायचे होते, जे त्याच्या मृत्यूपूर्वी त्या मंदिरात त्याला गवसले होते…

पण हे सर्व होत असताना एकदा रामदास शास्त्री अचानक माझ्या समोर आले आणि तलवार काढून मला मारायला धावले,

सोबतच आमच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली, 

रामदास शास्त्रींनी अजून दोन धारधार शस्त्र काढले, मी अखेरपर्यंत झुंज देत राहिले, रामदास शास्त्री पराभूत होण्याची चिन्ह दिसू लागली, युद्ध महालाच्या मधोमध होत होते, इतक्यात रामदास शास्त्री चा मुलगा मागून प्रहार करायला आला, शकुंतला देवी मध्ये आल्या आणि त्याही मारल्या गेल्या…शेवटी दोघांच्या प्रहारापुढे माझा टिकाव जास्त काळ लागला नाही आणि माझा मृत्यू झाला… मग मंदिरात नेमकं काय घडलं होतं?? इतक्या वर्षांपूर्वीचा शोध आजच्या युगात मंजिरी कसा घेते?? कसलं गुपित दडलं होतं विरदत्त च्या मनात? मंजिरी कशी पोहीचते त्यापर्यंत… पहा पुढील भागात… लाईक, शेयर जरूर करा….

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत